Realme 12 Pro : रिअलमीचा २०० मेगा पिक्सल कॅमेरा असलेला फोन 

लाँच पूर्वीच रिअलमी १२ प्रोची हवा तयार झाली आहे. 

521
Realme 12 Pro : रिअलमीचा २०० मेगा पिक्सल कॅमेरा असलेला फोन 
  • ऋजुता लुकतुके

सध्या तंत्र आणि यंत्राची आवड असलेली तरुणाई रिअलमी प्रो १२ चीच चर्चा करताना दिसत आहे. काही दिवसांत फोन भारतात लाँच होणार आहे. ५जी, ५१२ जीबी पर्यंतची साठवणूक क्षमता असलेला आणि २०० मेगापिक्सला कॅमेरा असलेला हा फोन तुलनेनं स्वस्त म्हणजे २० ते ३५ हजार रुपयांत उपलब्ध असेल. (Realme 12 Pro)

स्नॅपड्रॅगन पद्धतीचा सहाव्या पिढीतील प्रोसेसर यात बसवण्यात आलाय. त्यामुळे एकाचवेळी फोनवर अनेक गोष्टी करणं सहज शक्य होईल. फोनच्या कॅमेराबरोबरच त्याचा डिस्प्लेही तगडा आहे. ६.७ इंचांच्या डिस्प्लेची प्रखरता इतर फोनच्या तुलनेनं चांगली आहे. त्यामुळे इतर फोनपासून या फोनला वेगळं करणारं हे वैशिष्ट्य असल्याचं मानलं जातंय. (Realme 12 Pro)

फोनचा प्राथमिक कॅमेरा २०० मेगापिक्सलचा आहे. तर ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईज लेन्स बसवलेला कॅमेरा बसवण्यात आला आहे. (Realme 12 Pro)

(हेही वाचा – Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सामाजिक कार्याच्या आठवणी…)

फोनचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्झचा आहे. उच्च क्षमतेच्या प्रोसेसरमुळे या फोनमध्ये गेमिंग आणि स्क्रोलिंगचा अनुभवही चांगला आहे. १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी साठवणूक क्षमता असलेल्या फोनमध्ये बॅटरीही ५,००० एमएएच क्षमतेची आहे. त्याचबरोबर ६७ वॅट क्षमतेचा फास्ट चार्जरही देण्यात येणार आहे.  (Realme 12 Pro)

सुरुवातीला निवडक शोरुम बरोबरच फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन सारख्या ई-कॉमर्स सेवेत हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. (Realme 12 Pro)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.