-
ऋजुता लुकतुके
मागच्या १८ आयपीएल हंगामाताल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल चषक यंदा पहिल्यांदाच उंचावला. पण, तरीही ही फ्रँचाईजी सगळ्यात चर्चेत आणि स्पर्धेतील सगळ्यात जास्त मूल्य असलेली आणि सगळ्यात जास्त सोशल मीडिया फॉलोइंग असलेली फ्रँचाईजी आहे. याला एकमेव कारण म्हणजे संघातील स्टार खेळाडू विराट कोहली. मागची १८ वर्षं तो फ्रँचाईजीबरोबर एकनिष्ठ आहे आणि त्याचं फळ यंदा त्याला मिळालंय. (RCB Owner)
विराट कोहली झाला संघातील दिग्गज खेळाडू. पण, फ्रँचाईजीचे मालक कोण आहेत तुम्हाला ठाऊक आहेत का? २००७ साली आयपीएल संघांच्या फ्रँचाईजीसाठी लिलाव झाला तेव्हा युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड या कंपनीने बंगळुरू फ्रँचाईजीसाठी १११.६ दशलक्ष अमेरिकन डॉलरची बोली लावली. मुंबईच्या खालोखाल ही सगळ्यात मोठी बोली होती. युनायटेड स्पिरिट्स ही मद्यसम्राट विजय माल्या यांच्या मालकीची कंपनी होती. (RCB Owner)
(हेही वाचा – India Tour of England : जसप्रीत बुमराहने कप्तानी नाकारली की त्याला कप्तान केलं नाही?)
𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍𝐒 ⭐️ RCB PLAYED BOLD! 😇
17 Years, 6256 Days, 90,08,640 Minutes later, the wait finally ends. 🙌🤯
The IPL Trophy is finally coming home. And we CANT KEEP CALM! 🤩😍❤️ pic.twitter.com/lQvtLff9o2
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) June 3, 2025
त्यामुळे सुरुवातीपासून विजय माल्या आणि त्यांचा मुलगा सिद्धार्थ माल्या या संघाबरोबर बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर नियमितपणे दिसायचे. पण, २०१२ पासून किंगफिशर एअरलाईन्स दिवाळखोरीत निघाल्यावर विजय माल्या आर्थिक अडचणीत आले. बँकांची देणी चुकवल्याबद्दल त्यांच्यावर खटलेही सुरू झाले. तेव्हा म्हणजे २०१६ साली युनायटेड स्पिरिट्सचा ताबा इंग्लंडमधील आघाडीची मद्यउत्पादक कंपनी दियाजिओनं घेतला. तेव्हापासून फ्रँचाईजीचे मालक युनायटेड स्पिरिट्स असले तरी तिचा ताबा दियाजिओकडे आहे. या फ्रँचाईजीचा कारभार पाहण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ही उपकंपनी स्थापन करण्यात आली आहे. (RCB Owner)
प्रथमेश मिश्रा हे दियाजिओचे मुख्य व्यावसायिक अधिकारी आहेत. तेच आरसीबीचे अध्यक्ष आहेत. दियाजिओ कंपनीचे भारतात स्मर्नऑफ, जॉनी वॉकर, रॉयल चॅलेंज आणि मॅकडॉवेल असे लोकप्रिय मद्याचे ब्रँड आहेत. २०२४ साली आरसीबीच्या महिला संघाने पहिली वहिली वुमेन्स प्रिमिअर लीग जिंकली. तर पाठोपाठ पुरुषांनीही २०२५ मध्ये आयपीएल विजेतेपद पटकावलं आहे. त्यानंतर या फ्रँचाईजीचं एकूण मूल्य ११७ दशलक्ष अमेरिकन डॉलरवर पोहोचलं आहे. आयपीएलमधील सर्वाधिक मौल्यवान फ्रँचाईजी ठरली आहे. संघातील स्टार खेळाडू विराट कोहलीचा हा करिश्मा मानला जातो. (RCB Owner)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community