सावधान! कबुतरांपासून रहा चार हात लांब, अन्यथा आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

134

कबूतर हा पक्षी आरोग्यासाठी धोकादायक आहे, यावर पटकन कोणाचाही विश्वार बसणार नाही. मात्र समोर येणारे अहवाल त्यावर विश्वास ठेवायला भाग पाडतील. कबुतरांची विष्ठा, त्यांच्या पिसांमुळे दिवसेंदिवस अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे या संबंधी जनजागृती करण्यासाठी आतापर्यंत महानगरपालिकांनी अनेक पत्रके जाहीर केली आहेत.

( हेही वाचा : मुंबईत पतंगबाजी केल्यास होणार गुन्हा दाखल! )

कबुतरांपासून काय त्रास होतो?

कबुतरांमुळे पसरणाऱ्या जंतूमुळे हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनियाचे प्रमाण झपाट्याने वाढते. या रोगामुळे रूग्णाची रोगप्रतिकार शक्ती कमी होते. या रोगाची एकदा लागण झाली तर ही समस्या कधीही पूर्णपणे बरी होत नाही. कबुतराशिवाय कावळे, चिमण्या, मैना या पक्ष्यांमुळे श्वसनाचे, फुप्फुसाचे आणि छातीचे गंभीर आजार होऊ शकतात.

या भागात सर्वाधिक प्रमाण

  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • कल्याण
  • पनवेल

का वाढत आहे प्रमाण?

कबुतरांना सहज कुठेही खायला दिले जाते त्यामुळे ही कबुतरे येतात आणि तिथेच आजूबाजूला राहतात. त्यांच्या घरट्यांमुळे, गाळलेल्या पिसांमुळे, विष्ठेमुळे प्राणघातक जंतू पसरतात. कबुतरांच्या विष्टेत अमोनिया व अ‍ॅसिड असते यामुळे हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनिया, बर्ड फेन्सियर्स लंग यांसारखे रोग होण्याची शक्यता बळावते.

लक्षणे आताच लक्षात घ्या ..

  • सर्दी
  • ताप
  • सांधेदुखी
  • धाप लागणं
  • खोकला
  • अचानक वजन कमी होणं

हेच आहे तुमच्या हातात ..

पक्षी निर्मूलन रसायन

या रसायनाच्या वापरानं पक्ष्यांना कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. फक्त या रसायनाचा वास त्यांना सहन होत नाही. त्यामुळे ते त्या भागात वास्तव्य करत नाहीत.

बर्ड नेट

खिडक्यांच्या वरची मोकळी जागा, व्हरांडा, दुर्लक्षित कोपरे अशा जागेत कबुतरे घरटी बांधतात. त्यांना रोखण्यासाठी बर्ड नेटचा वापर करणे सोयीचे आहे. आता तर पारर्दशक जाळी सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे घराचे, इमारतीचे सौंदर्यही कमी होणार नाही.

पत्रा

बाजारात एक विशेष प्रकारचा पत्रा मिळतो. या पत्राच्या पुढच्या बाजूला टोक असतं. त्यामुळे तो लावलेल्या ठिकाणी जरी कबुतरे आली, तरी त्यांना तिकडे बसता येणार नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.