बाजीराव पहिले हे मराठा साम्राज्याचे ७वे पेशवे होते. बाजीराव पहिले यांचे वडील बालाजी विश्वनाथ भट हे शाहू महाराज पहिले यांच्या दरबारी पेशवे होते. त्यांच्या मृत्युनंतर शाहू महाराज पहिले यांनी वयाच्या एकोणीसव्या वर्षी बाजीराव पहिले यांना पेशवे पद बहाल केलं. भारतीय उपखंडामध्ये मराठ्यांना सर्वोच्च शक्ती म्हणून स्थापित करण्याचं आणि मुघल साम्राज्य प्रभावीपणे विस्थापित करण्याचं श्रेय पेशवा बाजीराव पहिले यांनाच जातं. (Peshwa Baji Rao)
दख्खनच्या प्रदेशामध्ये हैदराबादचा निजाम हा मराठा साम्राज्यासाठी एक मोठा धोका म्हणून ठाण मांडून बसला होता. पेशवा बाजीराव पहिले यांनी त्या हैदराबादच्या निजामाच्या विरोधात एक मोहीम राबवली होती. या मोहिमेदरम्यान पालखेडच्या लढाईमध्ये त्या हैदराबादच्या निजामाचा पेशवा बाजीराव पहिले यांनी निर्णायक पराभव केला. मराठ्यांच्या या विजयामुळे दख्खन प्रदेशात मराठ्यांचं वर्चस्व आणखी मजबूत झालं. (Peshwa Baji Rao)
(हेही वाचा – India Turkey Trade : भारतीय विमान कंपन्या तुर्कीबरोबरचा करार रद्द करतील का?)
तसंच बुंदेलखंड इथे पेशवा बाजीराव पहिले त्यांनी बुंदेलखंडचे शासक राजा छत्रसाल यांना मुघलांच्या वेढ्यातून सोडवलं आणि बुंदेलखंडला स्वातंत्र्य मिळवून दिलं. कृतज्ञतेपोटी राजा छत्रसाल यांनी त्यांच्या प्रदेशातला एक तृतीयांश प्रदेश पेशवा बाजीराव पहिले यांना बहाल केला. (Peshwa Baji Rao)
१७३० सालच्या दशकामध्ये पेशवा बाजीराव पहिले यांनी दाभोईच्या लढाईत बंडखोर त्र्यंबकराव दाभाडे याचा पराभव करून गुजरात इथे कर वसुली करण्याचे हक्क मिळवले. त्यांनी अनेक राजपूत शासकांसोबत यशस्वी राजनैतिक मोहिमांमध्येही सहभाग घेतला होता. त्यामुळे मेवाड आणि जयपूर राज्यांवर मराठ्यांचा चौथ म्हणजेच चौथा हिस्सा हा नियमित कर लादण्यात आला. (Peshwa Baji Rao)
(हेही वाचा – Ultratech Cement Price : चांगल्या निकालांनंतरही अल्ट्राटेक सिमेंटचा शेअर का गडगडला?)
उत्तरेतही मराठ्यांचं साम्राज्य प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या सतत सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे त्यांना १७३७ साली दिल्लीवर छापा मारण्याची जबाबदारी मिळाली. ही जबाबदारी म्हणजे त्यांच्या लष्करी कारकिर्दीचा सर्वोच्च बिंदू होता असं म्हणता येईल. १७३७ साली भोपाळच्या लढाईमध्ये अवध इथल्या मुघल-निजाम-नवाब याच्या संपूर्ण सैन्याचा पराभव करून पेशवा बाजीराव पहिले यांनी अधिकृतपणे मालवा हा महत्त्वाचा प्रदेश जिंकून घेतला. (Peshwa Baji Rao)
१७४० साली तीव्र तापामुळे त्यांचं निधन झालं. पेशवा बाजीराव पहिले यांना मराठा साम्राज्याच्या इतिहासातलं एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. तसंच त्यांना त्यांच्या काळातला एक महान लष्करी सेनापतीही म्हणतात. ते आपल्या कारकिर्दीत एकही लढाई हरले नाहीत. त्यांच्या साहसी जीवनावर अनेक कादंबऱ्या, पुस्तकं लिहिण्यात आली आहेत. तसंच त्यांच्या आयुष्यावर आधारित अनेक मालिका आणि चित्रपटही चित्रित केले गेले आहेत. पेशवा बाजीराव पहिले यांना काशीबाई आणि मस्तानी अशा दोन पत्नी होत्या. मस्तानीशी त्यांचं नातं हा कायमच एक वादग्रस्त विषय बनून राहिला.(Peshwa Baji Rao)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community