pandharpur : पंढरपुरच्या विठ्ठल मंदिराबाबत तुम्हाला ‘ही’ गोष्ट माहिती आहे का? देवऋषी नारदांनीही सांगितलं आहे महात्म्य

46
pandharpur : पंढरपुरच्या विठ्ठल मंदिराबाबत तुम्हाला 'ही' गोष्ट माहिती आहे का? देवऋषी नारदांनीही सांगितलं आहे महात्म्य

पंढरपूर हे महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातलं एक शहर आहे. तसंच ते सोलापूर शहराजवळ चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेलं एक प्रसिद्ध लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे. पंढरपूर इथे श्रीविठ्ठल-रुक्मिणीचं मंदिर आहे. दरवर्षी जगभरातून लाखो वारकरी इथे आपल्या विठोबा माऊलीच्या दर्शनासाठी येतात. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. (pandharpur)

पंढरपूरच्या इसबावी नावाच्या भागातही श्रीविठ्ठल-रुक्मिणीचं एक छोटेसं मंदिर आहे. हे मंदिर मुख्य विठ्ठल-रुक्मिणी मंदिराइतकंच जुनं आहे. या मंदिराला वाखरी वा कोर्टी देवालय म्हणून ओळखलं जातं. तसंच विसावा मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. संत चैतन्य महाप्रभू यांनी पंढरपूर शहरात सात दिवस विठोबा मंदिरात वास्तव्य केलं होतं असं म्हटलं जातं. तसंच महाराष्ट्रातल्या अनेक संतांनी या मंदिरात विठुरायाची भावभक्तीने पूजा केली आहे. त्यांपैकी संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत निवृत्तिनाथ महाराज, संत मुक्ताबाई, संत चोखामेळा, संत सावता माळी, संत नरहरी सोनार, संत गोरा कुंभार, संत मीराबाई आणि संत गजानन महाराज हे त्यांपैकी काही प्रमुख संत आहेत. (pandharpur)

(हेही वाचा – crpf salary per month : करिअर आणि देशाची सेवा एकत्रच; CRPF म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दलात व्हा सामिल आणि मिळवा चांगले पैसे)

पंढरपूर इथल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचं आध्यात्मिक महत्त्व : 

छंदोग्य उपनिषद :

छंदोग्य उपनिषदाच्या चौथ्या अध्यायामध्ये श्री विठ्ठलाच्या पूजेच्या प्राचीन परंपरेचा एक स्तोत्र आहे. त्यामध्ये राजा जनश्रुतीची कथा आहे. या कथेत रैक्वाच्या शोधासाठी जाताना पंढरपूरला भेट देण्याचा उल्लेख आहे. राजा म्हणतो की, “तो त्या ठिकाणी पोहोचला, जिथे श्रीविष्णूचा अवतार असलेला विठुराया भीमा नदीच्या काठावर होता. या तीर्थाचं नाव बिंदुतीर्थ असं आहे. इथल्या स्थानिक देवतेचं नाव बिंदुमाधव असं आहे. भौतिक आणि आध्यात्मिक समृद्धीचा आशीर्वाद देणारा देव अजूनही तिथे राहतो.” (pandharpur)

पद्मपुराण :

पद्मपुराणातल्या वराहसंहितेत पांडुरंग किंवा विठ्ठलाचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. देवऋषी नारद आदिशेषांना पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या आगमनाबद्दल सांगतात, ते पंढरपूर इथे विठ्ठलाच्या विटांच्या उभारणीची पार्श्वभूमी आणि महत्त्व तसंच भीम नदीच्या उगमाचंही स्पष्टीकरण देतात. याव्यतिरिक्त, ते पंढरपूर इथल्या विविध देवतांबद्दल माहिती देतात. नीरा नरसिंहपूर हे प्रयागाइतकंच पवित्र आहे, कोर्टी किंवा विष्णुपाद हे गयेइतकंच पवित्र आहे आणि पंढरपूर हे काशीइतकेच पवित्र आहे. म्हणूनच पंढरपूरची यात्रा केल्याने या तिन्ही स्थानांच्या तीर्थयात्रेचे आशीर्वाद मिळतात. इथेच गया श्राद्ध आणि काशी यात्रा विधीही करता येतात. (pandharpur)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.