Pandavkada Falls : खारघरमधील पांडवकडा धबधब्याचा इतिहास घेऊया जाणून!

53
Pandavkada Falls : खारघरमधील पांडवकडा धबधब्याचा इतिहास घेऊया जाणून!

पांडवकडा धबधबा हा मुंबईजवळ नवी मुंबईतल्या खारघर इथे असलेला १०७ मीटर एवढा उंच धबधबा आहे. हा धबधबा मुंबईच्या पश्चिम घाटाच्या पर्वतांमधून वाहतो. रस्त्याने ट्रॅफिक कमी असताना मुंबईहून पांडवकडा या धबधब्यावर पोहोचण्यासाठी सुमारे ३ तास एवढा वेळ लागतो. पण नवी मुंबईहून या धबधब्यावर पोहोचण्यासाठी फक्त दीड तास लागतो.

म्हणूनच हे पर्यटन स्थळ लहान ट्रेक किंवा दिवसभराच्या पिकनिकसाठी पसंत केलं जातं. विशेषतः पावसाळ्यात. पावसाळ्यात डोंगररांगा दाट वनराईने व्यापलेले असतात. त्यामुळे त्यांच्या सानिध्यात आल्यावर दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडी विश्रांती मिळल्यासारखं वाटतं. (Pandavkada Falls)

(हेही वाचा – Deenanath Mangeshkar Charity Hospital : मंगेशकर कुटुंबावर वडेट्टीवारांचा आघात; अजित पवारांचा पलटवार)

पांडवकडा धबधबा हा पांडव आणि महाभारताशी देखील संबंधित आहे. महाभारताच्या काळात पांडवांनी आपल्या वनवासाच्या वेळी प्रवास करताना या धबधब्याला भेट दिली होती. इथे स्नान केलं होतं. काही स्थानिक लोक असंही मानतात की, पांडव डोंगराच्या आत बोगद्यातून धबधब्यावर पोहोचले होते आणि जवळच कुठेतरी राहत होते. म्हणून या ठिकाणाला पांडवकडा असं म्हटलं जाऊ लागलं.

याठिकाणी पोहोचण्याकरिता प्रति व्यक्ती ५० रुपये प्रवेश शुल्क आकारलं जातं. हे पर्यटनस्थळ विकेंड घालवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तरी पर्यटकांनी पाण्यात प्रवेश करू नये. कारण ते धोकादायक असू शकतं.

खारघर येथील पांडवकडा धबधब्यावर करण्यासारख्या गोष्टी

पांडवकडा धबधब्यावर पोहोचण्यासाठी पर्यटकांना थोडं अंतर चालून जावं लागेल. काही पर्यटकांना सोयीस्कर असेल तर धबधब्याच्या पायथ्याशी गाडीनेही जाता येतं. पांडवकडा धबधब्याच्या काही किलोमीटर आधी मुख्य रस्त्यावर असलेल्या गुरुद्वारामध्ये गाड्यांसाठी पार्किंगची जागा उपलब्ध आहे. धबधब्याच्या पायथ्याशी जाण्यापूर्वी पर्यटक गुरुद्वारामध्येही काही वेळ घालवू शकतात. पावसाळ्यात हा संपूर्ण मार्ग नयनरम्य दृश्यांनी भरलेला असतो. इथे येणारे प्रवासी त्यांना वाटेल तिथे थांबू शकतात आणि हवे तितके फोटो काढू शकतात.

पांडवकडा धबधब्याच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर पर्यटक धबधब्याखाली असलेल्या सरोवराजवळ जाऊन भव्य असा १०७ मीटरचा धबधबा पाहू शकतात. सरोवराच्या भोवती असलेल्या खडकांवर बसून हिरव्यागार निसर्गाचं निरीक्षण करता येतं. धबधब्याचा उगम डोंगराच्या माथ्यावर आहे. जिथे दोन-तीन प्रवाह एकत्र होऊन एक मोठा प्रवाह तयार होतो. त्या उंच कड्यावरून पाणी खूप वेगाने खाली वाहतं.

पर्यटकांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की, इथले वन अधिकारी पाणी असुरक्षित असल्याचं सांगतात. कारण भूतकाळात इथे माणसं बुडण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. म्हणून, पर्यटकांनी अजिबात पाण्यात उतरू नये अशी शिफारस केली जाते. इथे येणारे पर्यटक धबधब्याच्या आसपासची सुंदर दृश्यं पाहण्यात, डोंगररांगा आणि जंगल एक्सप्लोर करण्यात नक्कीच चांगला वेळ घालवू शकतात. (Pandavkada Falls)

(हेही वाचा – Oppo Find X8 Ultra : ५० मेगा पिक्सेलचे ३ कॅमेरे असलेला ओपोचा फोन जगभरात लाँच)

पांडवकडा वॉटरफॉलला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?

पांडवकडा धबधबा हा एक हंगामी धबधबा आहे. धबधब्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे हिवाळ्याच्या अखेरीस म्हणजेच जानेवारी ते मार्च आणि पावसाळ्यात जेव्हा हवामान थंड आणि आल्हाददायक असतं. या काळात तापमान २२ ते २८ अंश सेल्सिअस पर्यंत असतं आणि पाण्याचा प्रवाह खूप जोरदार असतो. म्हणूनच पावसाळ्याच्या अखेरीस आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला बरेच पर्यटक पांडवकडा इथे भेट देतात. निसर्गाचं उत्तम निरीक्षण करण्यासाठी लोक पावसाळ्यातही धबधब्याला भेट देतात. पण या काळात पर्यटकांना पाण्यात प्रवेश करण्याची परवानगी दिली जात नाही. उन्हाळ्यात पाण्याचा प्रवाह कमी असतो आणि पाणी स्थिर असते.

पांडवकडा धबधब्यावर कसं पोहोचायचं?

पांडवकडा धबधबा नवी मुंबईच्या खारघर या भागात आहे. खारघरच्या मध्यभागी हे ठिकाण फक्त १२ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. या ठिकाणी रस्त्याने पोहोचता येतं. हा मार्ग मुरबीगाव रोड – खारघर गोल्फ कोर्स रोड – रेन ट्री मार्ग – गुरु गोविंद सिंह मार्ग – खारघर हिल रोड या मार्गाने जातो. हिल रोडपासून, पांडवकडा धबधबा सुमारे ५.४ किलोमीटर एवढा पुढे आहे. इथलं सर्वात जवळचं रेल्वे स्थानक खारघर रेल्वे स्थानक हे आहे. ते ७ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना खारघरला पोहोचण्यासाठी ट्रेन सहज मिळू शकते.

ज्यांना रोड ट्रिपने प्रवास करायला आवडतो ते मुंबईला पोहोचण्यासाठी राज्य परिवहन बसने येऊ शकतात. तिथून ते पांडवकडा धबधब्यापासून ११.५ किलोमीटर अंतरावर असलेल्या खारघर बस स्टॉपवर पोहोचण्यासाठी सिटी बस घेऊ शकतात किंवा भाड्याने घेतलेल्या कॅबने थेट धबधब्यावर जाऊ शकतात. या ठिकाणी प्रवास करण्यासाठी स्थानिक टॅक्सी, ओला किंवा उबर कॅब सर्वोत्तम आहेत. खारघरमध्ये पोहोचल्यानंतर, काही ऑटो रिक्षा प्रवाशांना कमी अंतरापर्यंत निश्चित किमतीत सोडण्यास सहमत होऊ शकतात. (Pandavkada Falls)

(हेही वाचा – उबाठा पक्षाचे आमदार Sunil Raut यांच्याविरोधात गुन्हा दाखल)

पांडवकडा धबधबा इथलं सर्वात जवळचं विमानतळ मुंबई विमानतळ किंवा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे या पर्यटन स्थळापासून सुमारे ४१ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. मुंबईला बाहेरून येणारे प्रवासी विमानतळाच्या बाहेरून थेट कॅब भाड्याने घेऊ शकतात. तसंच खारघरला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी जवळच्या बस स्टॉपवर किंवा जवळच्या रेल्वे जंक्शनवरही जाऊ शकतात.

छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांना सहार रोड – एनएच ४८ – वेस्टर्न एक्सप्रेस हायवे – हंस भुगरा मार्ग – सीएसटी रोड – ईस्टर्न एक्सप्रेस हायवे – घाटकोपर मानखुर्द लिंक रोड – सायन पनवेल हायवे – वाशी क्रीक ब्रिज – सीबीडी फ्लायओव्हर/ठाणे बेलापूर रोड – सखाराम पाटील मार्ग – रेन ट्री मार्ग – खारघर हिल रोड मार्गे जाता येतं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.