-
ऋजुता लुकतुके
एरवी जागेची कमतरता असलेल्या मुंबईत मॉलही खुराड्यासारखे बांधलेले असतात. तिथे एकाला खेटून दुसरी शोरुम उभी असते. नेमका याच बाबतीत मध्य मुंबईत परेल इथं उभा असलेला फिनिक्स पॅलेडिअम मॉल वेगळा ठरतो. पॅलेडिअम हे चांदी किंवा प्लॅटिनम सारखं दिसणारं एक रासायनिक मूलद्रव्य आहे. फिनिक्स पॅलेडिअममध्येही या रंगाची मुक्त उधळण आहे. फक्त खरेदीचाच नाही तर जेवण, चहापान आणि कलासक्त लोकांसाठी इथं जागतिक दर्जाचा अनुभव लोकांना मिळतो. (Palladium Phoenix)
(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : NIAकडून फोन नंबर जारी, माहिती शेअर करण्याचे नागरिकांना आवाहन)
फिनिक्स मॉलला भेट का द्यावी हे सांगणारी पाच कारणं पाहूया :
- जगातील अव्वल फॅशन ब्रँडचे कपडे खरेदी करण्याची संधी इथे मिळते. त्यामुळे या मॉलला भारतातील फॅशन हब म्हटलं जातं. जगातील अव्वल ३०० ब्रँड इथं आहेत. आणि फॅशन म्हणाल तर गुची, बॉश, मायकेल कॉर्स, कोच, डिझेल जिमी कू असे सगळे ब्रँड एका छताखाली तुम्हाला मिळू शकतील. खासकरून उच्चभ्रू लोकांना इथं खरेदीचा परिपूर्ण आनंद मिळू शकतो. (Palladium Phoenix)
- जगभरातील सर्व ठिकाणची खाद्य संस्कृती इथं एकत्र चाखायला मिळते. मुंबईत जपानी रेस्टॉरंट तशी फारशी नाहीत. पण, इथे मेडिरेरियन, जपानी, फ्रेंच पदार्थांसाठी विविध रेस्टॉरंट आहेत. आशियाई खाद्यपदार्थांसाठी फू, फ्रेंच पॅटिसरीसाठी पॉल आणि इशारा हे जागतिक दर्जाचं रेस्टॉरंटही इथं आहे. तर गुर्मे डेझर्टसाठी इथं छोटे छोटे स्पॉट आहेत. त्यामुळे उदर भरणाची चांगली सोय इथं आहे आणि उपलब्ध पर्यायांमध्ये विविधताही आहे. (Palladium Phoenix)
- खरेदी आणि पेटपूजेबरोबरच इथं मनोरंजनाचा तडकाही आहे. संकुलात पीव्हीआर हे मल्टिस्क्रीन थिएटर आहे. ब्रँड पॉप अप्स इतं वारंवार होत असतात. त्याचबरोबर सणासुदीच्या दिवसांत आणि हंगामात इथं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. अशावेळी फक्त ते पाहण्यासाठी लोक गर्दी करताना दिसतात. (Palladium Phoenix)
- मॉलचं नाव सार्थ ठरवणारं इथलं इंटिरिअर आहे. हल्ली तरुणांना आपल्या दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या रंगीबेरंगी गोष्टी सोशल मीडियावर शेअर करायच्या असतात. ते लक्षात घेऊन इन्स्टाग्रामवर टाकण्यायोग्य फोटो आणि व्हिडिओंसाठी इथं खास जागा निर्माण करण्यात आल्या आहेत. शिवाय विविध उत्सव आणि सणांच्या दिवशी इथं खास सजावट केली जाते. इथलं दिवाळी आणि ख्रिस्मस वातावरण खूप प्रसिद्ध आहे. मॉलने नुकताच आपला १५ वा वाढदिवस साजरा केला. त्याचं औचित्य साधून इथं साल्वाडोर दाली यांनी घडवलेल्या कांस्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. तसंच कॉस्मिक ऱ्हायनासोरसही लोकांसाठी खुला करण्यात आला. ही दोन शिल्प या मॉलची ओळख आहेत. (Palladium Phoenix)
- खरेदी आणि खानपानाच्या अनुभवाबरोबरच इथं लाईफस्टाईल अनुभवही खूप चांगला आहे. फिटनेस, सलॉन आणि स्पा तसंच स्कीनकेअर क्लिनिक्सचे जगभरातील ब्रँड इथं आहेत. नायका लक्स, टिरा ब्युटी ही फक्त दोन उदाहरणं झाली. फक्त यातील एका जागेला भेट दिलीत तरी तुमचा अख्खा दिवस तिथे जाऊ शकतो. शिवाय वेलनेस ब्रँड दसाँही इथं आहे. अनेकदा लोक फक्त वेलनेस सेंटरसाठी या मॉलला भेट देतात. मुलांसाठीही इथं वेळ घालवण्यासाठी थीम पार्क आहेत. (Palladium Phoenix)
(हेही वाचा – Maharashtra Weather : राज्यातील पुढील दोन दिवस अवकाळीचे ! वादळी-वाऱ्यासह पाऊस कोसळणार)
आधी इथे फिनिक्स गिरण ही रुईया घराण्याची मालकी असलेली गिरण होती. ती बंद झाल्यावर ३३ लाख वर्गफूट जागेवर हा विशाल मॉल उभा राहिला आहे. इथं एक पंचतारांकित हॉटेल, मल्टीस्क्रीन थिएटर, मॉलची कमर्शिअल जागा आणि एक निवासी संकुलही एकाच ठिकाणी उभं आहे. प्रत्येक्ष व्यापारी संकुलाची जागा ४,९०,००० वर्गफूट इतकी आहे. आणि इथं ५०० च्या वर ब्रँड किंवा फ्रँचाईजी शोरुम आहेत. २००७ साली हा मॉल ग्राहकांसाठी खुला करण्यात आला. चार मजली हा मॉल विस्ताराच्या निकषावर मुंबईतील सगळ्यात मोठा मॉल आहे. (Palladium Phoenix)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community