-
ऋजुता लुकतुके
वनप्लस कंपनीने नवनवीन फोन बाजारात आणण्याचा धडाकाच लावला आहे. गेल्यावर्षीच्या वनप्लस १२ मालिकेनंतर यंदा ऑक्टोबरमध्ये कंपनीने आधी चीनमध्ये १३ आणि १३ आर ही मालिका लाँच केली होती. त्यानंतर आता वनप्लसचा हा फोन भारताही दाखल झाला आहे. त्याचबरोबर कंपनीने या मालिकेतील नवीन फोन १३एस साठीचं ऑनलाईन बुकिंगही भारतात सुरू केलं आहे. अधिकृतपणे १२ जूनपासून हा फोन तुम्हाला मिळायला लागेल. (OnePlus 13s)
क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन ८ एलिट प्रोसेसर असलेला हा पहिला फोन असेल. त्यामुळे कंपनीचा अद्ययावत प्रोसेसर या फोनमध्ये असेल. फोनच्या कामगिरीबद्दल त्यामुळेच कुतुहल आहे. कंपनीच्या भारतातील अधिकृत ट्विटर हँडलवर लाल आणि सफेद रंगातील वनप्लस १३ फोन दाखवण्यात आले आहेत. अगदी हात ओले असताना तुम्ही हा फोन सफाईने वापरू शकता, असं तंत्रज्ञान यात आहे. शिवाय ६,००० नीट्स एवढी प्रखरता असलेल्या या फोनमुळे नजरेलाही त्रास होत नाही, असा कंपनीचा दावा आहे. (OnePlus 13s)
(हेही वाचा – shivajinagar : ‘भांबुर्डे’ गावाचं नाव बदलून ‘शिवाजीनगर’ का ठेवण्यात आलं? छत्रपती शिवाजी महाराजांशी काय आहे संबंध?)
#OnePlus13s ( 🇮🇳 only )
Like to see the animation#OnePlus13s pic.twitter.com/zn05Qq3x1n
— Shruti Pandey 🚩 (@Pandeyshruti252) June 5, 2025
या फोनचा डिस्प्ले ६.७८ इंचांचा आहे आणि या फोनबरोबर १०० वॅटचा वायर असलेला चार्जर तर ५० वॅटचा वायरलेस चार्जर देण्यात आला आहे. फोनची बॅटरीही ६,००० एमएएच क्षमतेची म्हणजे तगडी आहे. फोनचा प्राथमिक कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा आहे. तर अल्ट्रावाईड लेन्सही ५० मेगा पिक्सेलची आहे. (OnePlus 13s)
चीनमध्ये या फोनची किंमत ४,७०० सियान इतकी आहे. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये हा फोन ५५,००० रुपयांपासून पुढे सुरू होईल अशी शक्यता आहे. पण, सध्या वनप्लस कंपनीने फोनवर एसबीआय कार्डवरील खरेदीवर ५,००० रुपयांची सवलत सध्या देऊ केली आहे. त्यामुळे हा फोन तुम्हाला ५०,००० रुपयांना मिळू शकेल. इतर बँकांबरोबरही काही सवलती फोनवर लागू होतील. (OnePlus 13s)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community