Olectra Greentech Share Price : ओलेक्ट्रा ग्रीनटेक शेअरवर तज्ञांनी काय दिला सल्ला?

Olectra Greentech Share Price : मागच्या आठवडाभरात शेअर ५ टक्क्यांनी पडला आहे.

24
Olectra Greentech Share Price : ओलेक्ट्रा ग्रीनटेक शेअरवर तज्ञांनी काय दिला सल्ला?
  • ऋजुता लुकतुके

ओलेक्ट्रा ग्रीनटेक ही इलेक्ट्रिक बस बनवणारी देशातील आघाडीची कंपनी आहे. अलीकडेच रिलायन्सने हायड्रोजन बसचा संकल्प सोडला तेव्हा या प्रकल्पातही ही कंपनी सहभागी होणार आहे. २०२४ मध्ये खराब काळ पाहिल्यानंतर हा शेअर आता वर जाताना दिसतोय. एप्रिल महिन्यात ओलेक्ट्रा ग्रीनटेकने चांगली कामगिरी नोंदवताना सलग तीन सत्रांमध्ये ५ टक्क्यांची वाढ अनुभवली आहे. (Olectra Greentech Share Price)

१६ एप्रिलच्या एका दिवशी या कंपनीच्या १.७१ शेअरची खरेदी आणि विक्री झाली. तर या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात रोज सरासरी ५६,००० शेअरची उलाढाल होत होती. नवीन आर्थिक वर्षांत हा जोर पकडल्यानंतर आता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेअरमध्ये थोडी नफारुपी विक्री दिसली. शेवटच्या ५ दिवसांत यात ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. शुक्रवारी हा शेअर ६६ अंशांनी कोसळून १,१०४ वर बंद झाला. इथून पुढे जाणकारांचा या शेअरवर काय सल्ला आहे समजून घेऊया. जोखीमपूर्ण गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठीचा शेअर अशीच याची ओळख आहे. (Olectra Greentech Share Price)

(हेही वाचा – जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची घोषणा )

New Project 2025 05 10T211844.269

वेल्थमिल्स सेक्युरिटीजचे क्रांती बथानी यांनी सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा होत असलेला मोठा वापर पाहता या शेअरकडून अपेक्षा व्यक्त केली आहे. ‘उच्चांकानंतर हा शेअर चांगल्यापैकी खाली आला आहे. त्यामुळे थोडी गुंतवणुकीची संधी इथं निर्माण झाली आहे. पण, या क्षेत्रात स्पर्धा कमी नाही. ओलेक्ट्रालाही ती जाणवणार आहे. त्यामुळेच जास्त जोखीम उचलायची तयारी असेल तर यात गुंतवणूक करा,’ असं बथानी यांनी स्पष्ट केलं. (Olectra Greentech Share Price)

तर शेअरचा तांत्रिक अभ्यास करता, १,३०० रुपयांच्या वर स्थिरावल्या, पुढे तो १,६०० रुपयांची मजल मारु शकतो, असा सल्ला एंजल वनच्या ओशो कृष्णन यांनी दिला आहे. ‘या शेअरची किंमत फिरून पुन्हा एकदा वाढू शकेल असा रिव्हर्सल चार्ट तयार झाला आहे. पण, त्यासाठी किंमत १,३०० रुपयांच्यावर काही काळ स्थिरावावी लागेल. त्यानंतर तो पुढे दमदार वाटचाल करू शकेल. पण, तीच किंमत खाली आली तर शेअर १,१०० रुपयांपर्यंत खालीही येऊ शकतो,’ असं कृष्णन म्हणले. (Olectra Greentech Share Price)

(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. गुंतवणूकदारांनी स्वत:च्या जोखमीवर गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी अथवा विक्रीचा कुठलाही सल्ला देत नाही.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.