-
ऋजुता लुकतुके
भारत व आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंब असलेल्या मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाने ३१ मार्च २०९२३ ला मोठा गाजावाजा करून मुंबईतील वांद्रे – कुर्ला संकुलात असलेल्या जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर उभं केलं. २,००० आसन क्षमता असलेलं मुख्य थिएटर आणि त्याच्या जोडीला दोन मध्यम आणि लहान आकाराची थिएटर असलेलं हे सांस्कृतिक संकुल आहे. या माध्यमातून रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांनी भारतात अमेरिकेतील प्रसिद्ध ब्रॉवे रंगभूमी मोहिमेतील काही नाटकंही सादर केली आहेत. संकुल सुरू झाल्यापासून त्याची चर्चा आहे. (Nita Mukesh Ambani Cultural Centre)
(हेही वाचा – Gold Bracelet For Women : ब्रेसलेट या दागिन्याच्या प्रकारासाठी सरासरी किती रुपये पडतात?)
रिलायन्स फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेकडून चालवण्यात येत असल्यामुळे या संकुलाचा भपका मोठा असला तरी सर्वसामान्य लोकांनाही त्यात प्रवेश मिळेल असे कार्यक्रम इथं नियमितपणे आयोजित केले जातात. प्रायोगिक रंगभूमीबरोबरच जागतिक दर्जाचे कार्यक्रम आणि लोकसंगीतापासून ते लोकनाट्यांचे अविष्कार इथं आयोजित केले जातात. शिवाय फॅशन शो आणि चित्रांचं प्रदर्शनही इथं नियमितपणे होतं. कलासक्त लोकांना नियमितपणे इथे होणाऱ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेता यावा यासाठी संकुलाने ‘फ्रेंड्स ऑफ नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर,’ या नावाने एक सभासद योजनाही सुरू केली आहे. या योजनेअंर्तगत वर्षभराती श्रेणीनुसार वर्गणी भरल्यावर तुम्हाला काही विशेष सवलती इथं मिळतात. (Nita Mukesh Ambani Cultural Centre)
(हेही वाचा – Adani Energy Solutions Share Price : अदानी समुहातील या कंपनीने ३ महिन्यांत कमावले ७१४ कोटी रुपये)
थिएटरमध्ये लावलेल्या कार्यक्रमाची तिकिटं प्राधान्य क्रमाने तुम्हाला उपलब्ध होणे, कार्यक्रमादरम्यान खानपान आणि जलपान सेवेत सवलत आणि तिकिटांमध्ये खास सवलत अशा सुविधा तुम्हाला इथे मिळू शकतात. शिवाय सभासद योजना घेतल्यानंतर सुरुवातीला मिळणारी स्वागतपर भेटवसतू, वर्षाला ८ मोफत तिकिटं, आर्ट हाऊसची मोफत सफर, आर्ट हाऊसमध्ये रांग न लावता थेट प्रवेश, तिथे खानपान आणि जलपान सेवेवर १० टक्के सूट तसंच सभासद योजनेच्या नुतनीककरणातही तुम्हाला खास सवलत मिळू शकते. तसंच सभासद योजनेच्या नुतनीकरणाच्या वेळी तुम्हाला ३,००० रुपयांचं गिफ्ट वाऊचरही मिळतं. फाऊंटन ऑफ जॉयला तुम्हाला मोफत प्रवेश मिळतो. जगभरातील विविध नाटकं आणि कलेविषयक कार्यक्रम, प्रदर्शनं इथे सुरू असतात. त्या सगळ्यांचे संदेश तुम्हाला वेळोवेळी मोबाईलवर दिले जातात. अशा या सभासद कार्यक्रमाची वार्षिक वर्गणी ही ८,९९९ रुपये इतकी आहे. या रकमेवर तुम्हाला अतिरिक्त जीएसटी भरायचा आहे. (Nita Mukesh Ambani Cultural Centre)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community