न्यूरोलॉजीच्या उपचारामध्ये मेंदू, पाठीचा कणा आणि मज्जासंस्थेवर परिणाम करणाऱ्या शारीरिक स्थितींचे निदान, व्यवस्थापन आणि उपचार केले जातात. न्यूरॉलॉजी हा वैद्यकीय क्षेत्रातला एक विशेष विभाग आहे. या विभागात प्रामुख्याने स्ट्रोक, मल्टिपल स्क्लेरोसिस आणि एपिलेप्सी यांसारख्या शारीरिक समस्यांवर लक्ष केंद्रित केलं जातं. (Neurologist)
(हेही वाचा – Karnataka Congress Government चे मुस्लिम लांगुलचालन; मुसलमानांचे आरक्षण आणखी वाढवणार)
न्यूरॉलॉजी या विभागाबद्दल अधिक तपशीलवार माहिती खाली दिली आहे :
न्यूरोलॉजी :
न्यूरॉलॉजी (Neurologist) हा वैद्यकीय विभाग मज्जासंस्थेच्या विकारांचं निदान आणि उपचारांशी संबंधित आहे.
न्यूरोलॉजिकल थेरपी :
न्यूरॉलॉजीकल थेरपी ही एक उपचार पद्धती आहे, जी मेंदूचे कार्य बदलण्यासाठी किंवा सुरळीत सुरु ठेवण्यासाठी न्यूरोटेक्नॉलॉजीचा (Neurologist) वापर करते. या उपचार पद्धतीमध्ये बहुतेक वेळेस न्यूरोफीडबॅक यांसारख्या तंत्रांचा समावेश असतो.
न्यूरोलॉजिकल पुनर्वसन :
यांमध्ये न्यूरोलॉजिकल (Neurologist) दुखापत किंवा रोगानंतर रुग्णांना पुन्हा पूर्ववत कार्य करण्यासाठी आणि त्यांच्या जगण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत केली जाते. यांमध्ये शारीरिक उपचार, व्यावसायिक उपचार आणि इतर उपचारांचाही समावेश असू शकतो.
न्यूरोक्रिटिकल केअर :
न्यूरॉक्रिटिकल केअरमध्ये स्ट्रोक, मेंदूतला रक्तस्राव किंवा आघात यांसारख्या गंभीर न्यूरोलॉजिकल स्थिती असलेल्या रुग्णांची अतिदक्षता विभागात काळजी घेतली जाते. (Neurologist)
(हेही वाचा – IPL News : कोची टस्कर्स फ्रँचाईजीला ५३८ कोटी रुपये देण्याचे न्यायालयाचे निर्देश)
उपचार पद्धती :
न्यूरोलॉजिकल उपचारांमध्ये (Neurologist) खाली दिलेल्या उपचार पद्धतींचा समावेश असतो :
- औषधे : रुग्णाला झालेल्या आजाराच्या लक्षणांचं व्यवस्थापन करण्यासाठी आणि रोगाच्या मूळ कारणावर उपचार करण्यासाठी औषधांचा वापर केला जातो.
- शारीरिक उपचार : रुग्णांचा स्टॅमिना आणि शारीरिक हालचाल यांचा समन्वय सुधारण्यासाठी शारीरिक उपचार म्हणजेच फिजिओथेरपी चा वापर केला जातो.
- व्यावसायिक उपचार : यांमध्ये दैनंदिन जीवनातली कामं करण्यासाठी रुग्णांना मदत करायला वैद्यकीय व्यावसायिकांची तरतूद केली जाते.
- स्पीच थेरपी : स्पीच थेरपीमध्ये रुग्णाला संवाद साधण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याकडे लक्ष दिलं जातं.
- सहाय्यक उपकरणे : रुग्णांना स्वतंत्रपणे हालचाली करण्यासाठी काही सहाय्यक उपकरणं दिली जातात.
- शस्त्रक्रिया : काही विशिष्ट प्रकरणांमध्ये आजारामुळे रुग्णांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शस्त्रक्रिया करणं गरजेचं असू शकतं. (Neurologist)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community