National Handloom Day : महाराष्ट्राच्या गृहिणींना भुरळ घालणाऱ्या ‘पैठणी’चा इतिहास

89

National Handloom Day हातमाग हे आपल्या गौरवशाली सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे आणि उदरनिर्वाहाचे एक महत्त्वाचे साधन आहे. वस्त्रोद्योग मंत्रालय ७ ऑगस्ट २०२२ रोजी ८ वा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करणार आहे. हातमाग दिनानिमित्त आपण महाराष्ट्राच्या पैठणीचा इतिहास जाणून घेणार आहोत.

( हेही वाचा : दुसरे महायुद्ध, मुंबईचा डबेवाला ते ऑनलाइन ऑर्डर; Food वितरण प्रणालीचा रंजक इतिहास)

पैठणीचा इतिहास

गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या पैठण या ऐतिहासिक शहरावरून या वस्त्राला पैठणी हे नाव मिळाले आहे. प्राचीन काळी पैठण हे शहर पाटन, पट्टून, पोतान, पैठान म्हणून देखील ओळखले जायचे. सातवाहन राजवंशाच्या काळात पैठणी साडीच्या निर्मितीला सुरूवात झाली असा उल्लेख ऐतिहासिक ग्रंथात आढळतो. तसेच ज्येष्ठ इतिहासज्ज्ञ डॉ. रा.श्री. मोरवंचीकर यांच्या दक्षिण काशी पैठण पुस्तकात पैठणी संबंधित उल्लेख आढळतो. पैठणीचे धागे हे मोहेनजोदडो संस्कृतीशी जोडलेले असल्याचा उल्लेखही दक्षिण काशी पैठण या पुस्तकात आढळतो. हडप्पा संस्कृतीच्या उत्खननावेळी पैठणीचे विणकाम करणाऱ्या सुयांची पेटी सापडली होती. परंतु सातवाहन काळात पैठणीला उद्योगरुपात एक नवी ओळख मिळाली.

New Project 11 1

रोमन साम्राज्याला पैठणीची भुरळ

प्लिनी या रोमन लेखकाने लिहिलेल्या पुस्तकात पैठणी उद्योगाचा उल्लेख आढळतो. रोमन लोक पैठणीचे चाहते होते. त्यांना सिल्कपासून बनवलेली वस्त्रे, सोन्या चांदीची सुंदर नक्षीकाम असलेली वस्त्रे आकर्षित करायची.

New Project 10 1

पैठणहून… येवला

भारतातील राजकीय परिस्थितीमुळे भारतातील पैठणी निर्मिती करणारे कामगार बेरोजगार झाले. परकीय आक्रमणे, इंग्रज सत्ता, हातमागाच्या जागी यंत्रे आली याचा परिणाम पैठणी व्यवसायावर झाला. कालांतराने पैठणी निर्मितीचे केंद्र पैठणहून येवला येथे स्थापन झाले. येवला शहरात हा व्यवसाय आता अस्तित्वात आहे.

आजच्या तरूणाईला पैठणीची क्रेझ

आजच्या काळात सुद्धा अनेक स्त्रिया आवर्जून पैठणी साडीचा हट्ट धरतात. होम मिनिस्टर कार्यक्रमामुळे सुद्धा गृहिणींच्या मनात पैठणीविषयी मानाचे स्थान निर्माण झाले. तसेच हल्लीच्या तरूणपिढीला पैठणीची इतकी भुरळ पडली आहे की, पैठणीचे ड्रेस, वन पिस, इरकली, खण पैठणी, घागरा, पर्स, फ्रॉक, पैठणीचा मास्क बाजारात उपलब्ध आहे.

New Project 12 1

देशाच्या इतर राज्यातील प्रमुख हातमाग व्यवसाय

 • आंध्र प्रदेश – कलमकारी
 • आसाम – मुगा सिल्क
 • बिहार – भागलपुरी सिल्क
 • छत्तीसगड – कोसा सिल्क
 • गोवा – कुंबी ( Kunbi)
 • गुजरात – बांधणी
 • पंजाब – फुलकारी
 • उत्तर प्रदेश – चिनकारी
 • तामिळनाडू – कांजीवरम
 • मध्य प्रदेश – चंदेरी
 • राजस्थान – शिशा ( Shisha)
 • केरळ – कसावू
 • झारखंड – कुचाई सिल्क
 • कर्नाटक – म्हैसूर सिल्क
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.