पर्यटकांना MTDC कडून मिळणार भन्नाट सवलती! फिरायला जाताय, तर येथे करा आरक्षण

167

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांनी विविध प्लॅन्स बनवले आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (महाराष्ट्र टूरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – MTDC) राज्यातील सर्व निवासस्थांमधील खोल्या ९० टक्के आरक्षित झाल्या आहेत. पुणे, औरंगाबाद, कोकण अशा विविध विभागातील महामंडळाच्या निवासस्थानांना पर्यटकांची पसंती मिळाली आहे.

( हेही वाचा : रोहित शर्मासह हा खेळाडू संघाबाहेर; BCCI ने ट्वीट करत दिली माहिती)

पर्यटकांना मिळणार सवलत 

नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) पर्यटकांना सर्वोत्तम सेवा आणि आरोग्यपुर्ण सुविधा देण्यासाठी सज्ज झाले असून आरक्षणासाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. निवासी आरक्षण www.mtdc.co या वेबसाईटवर सुरु करण्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे देण्यात आली आहे. जेष्ठ नागरिकांसाठी 20 टक्के, शासकीय कर्मचाऱ्यांना आगाऊ आरक्षणासाठी 10 ते 20 टक्के सवलत आहे. आजी – माजी सैनिक आणि दिव्यांगांसाठी विशेष सवलती असणार आहेत. समूह आरक्षणासाठी 20 खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहेत. शालेय सहलींसाठी विशेष सवलती देण्यात येत आहे, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे देण्यात आली आहे.

पर्यटकांना पर्यटन विषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहिती, आसपासच्या निसर्गाची माहिती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली, तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजना यांची माहिती वेबसाईट, फेसबुक आणि व्हाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातुन देण्यात येत आहे.

MTDC निवास्थानांमध्ये आरक्षण फुल्ल

सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करण्याचे अनेकांचे नियोजन असते. विशेषतः निसर्गरम्य ठिकाणी जाऊन उत्साही वातावरणात कुटुंबीयांसमवेत आनंद साजरा करण्यावर भर असतो. पर्यटन महामंडळाची बहुतांश निवासस्थाने निसर्गरम्य ठिकाणी आहेत. तसेच गेल्या वर्षीप्रमाणे यंदा करोनाबाबत कोणतेच निर्बंध नसल्याने मोकळ्या वातावरणात आनंद साजरा करण्यासाठी पर्यटकांनी MTDC निवास्थानांमध्ये आरक्षण केले आहे. थंडीची चाहूल लागल्याने पर्यटकांची पावले पर्यटनाकडे वळत आहेत. महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबईपासूनजवळ कार्ले, भाजे, हरिहरेश्वर, दापोली, महाबळेश्वर, पानशेत, भीमाशंकर, माळशेज, नाणेघाट अशी अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत याठिकाणी पर्यटक मिनी व्हेकेशन म्हणून भेट देतात. तसेच कोकणात प्रामुख्याने तारकर्ली समुद्रकिनारा, मालवण, देवबाग परिसरातील समुद्रीखेळांना पर्यटकांकडून सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.