-
ऋजुता लुकतुके
मोबाईल फोन स्मार्ट झाल्यानंतर मोटोरोला कंपनीने पहिला फोल्डिंग फोन बाजारात आणला. मोटो रेझर श्रेणीतील ६० अल्ट्रा फोन आता कंपनीने आणला आहे. अनेक बाबतीत हा फ्लॅगशिप फोन म्हणता येईल. ७.१ इंचांचा डिस्प्ले, १६५ हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १० बिट्ची रंग घनता यामुळे आधीच्या रेझर ५० अल्ट्रा आणि आताच्या अल्ट्रा फोनमध्ये झालेली सुधारणा लगेच कळते. स्नॅपड्रॅगन ८ एलिट या चिपसेटवर हा फोन चालतो. (Moto Razr Ultra)
फोनमधील तीनही कॅमेरे ५० मेगापिक्सेलचे आहेत. अगदी अल्ट्रावाईड कॅमेराही या क्षमतेचा आहे. तर सेल्फी कॅमेरा ३२ मेगापिक्सेलचा आहे. यात ऑटोफोकसची सोय मात्र नाही आणि फोनची बॅटरी ४,७०० एमएएच क्षमतेची आहे. रेझर ६० फोन प्रमाणेच अल्ट्रामध्येही तीन प्रकारची कव्हर कंपनीने देऊ केली आहेत. पेन्टोन प्रकारच्या फोनमध्ये तुम्हाला लाकडा सारखं भासणारं कव्हर, व्हिगन लेदरचं कव्हर आणि अल्कान्टारा फिनिश असलेलं कव्हरही मिळू शकेल. (Moto Razr Ultra)
(हेही वाचा – Moto Razr 60 : मोटोरोला कंपनीचा नवीन फोल्डिंग फोन ४९,९९९ रुपयांमध्ये मिळणार)
Have to say the battery life on Moto razr 60 Ultra is pretty good, even only on mobile data.
Took a morning flight to Mumbai so only on mobile data from 6 AM used a lot of gps in Mumbai, now back at the airport to catch Hyd flight and still at 60% left.
That front screen is so… pic.twitter.com/JSDWwZwfbd
— Ranjit (@geekyranjit) May 21, 2025
मोटो रेझरला ॲल्युमिनिअम फ्रेम आहे. त्यामुळे तो दिसायला दिमाखदार दिसतो. फोनबरोबर युएसबी केबल देण्यात आली आहे. फोनच्या केसमध्ये एक तारेची रिंग आहे. त्यामुळे फोल्ड केलेला छोटा फोन हातात धरताना चांगली पकड मिळते. फोनबरोबर चार्जर देण्यात आलेला नाही. पण, मोटोरोला कंपनीचाच ६८ वॅट क्षमतेचा चार्जर तुम्ही फोनबरोबरच ऑर्डर करू शकता. (Moto Razr Ultra)
रेझर ५० मालिकेच्या तुलनेत कंपनीने ६० मालिकेत अनेक चांगले आणि आधुनिकता आणणारे बदल केले आहेत. तसंच अल्ट्रा फोन रेझर ६० च्या एक महिना आधी लाँच करून त्यांनी आपली आक्रमकताही सिद्ध केली आहे. फोनमध्ये किमान १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज आहे. अँड्रॉईड १५ प्रणालीवर आधारित या फोनची प्रणाली ३ वर्षांपर्यंत तुम्ही मोफत अपग्रेड करू शकता. (Moto Razr Ultra)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community