-
ऋजुता लुकतुके
मोटोरोला कंपनीने आपल्या फोल्डिंग फोनच्या मालिकेतील नवा फोन अर्थात, मोटो रेझर ६० भारतात लाँच केला आहे. विशेष म्हणजे कंपनीने एक महत्त्वाचा निर्णय घेताना हा फोनही आधीच्या फोन प्रमाणेच ४९,९९९ रुपये किमतीत बाजारात आणला आहे. फोनचे फिचर मात्र नवीन आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फोनमध्ये मीडियाटेक डिमेन्सिटी ७४०० एक्स चिपसेट आहे. ६.९ इंचांच्या मोठ्या डिस्प्ले बरोबरच ५० मेगापिक्सेलचा सेन्सर या फोनला आहे. (Moto Razr 60)
(हेही वाचा – Galaxy F56 : सॅमसंग गॅलेक्सी एफ५६ भारतात लाँच; २५,००० रुपयांपासून किंमत सुरू)
ग्राहकांना सुरुवातीला जेमिनी या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲपचं सबस्क्रिप्शन तसंच २ टीबीचं स्टोरेज मिळणार आहे. फोनचा डिस्प्ले ६.९ इंच इतका विशाल आहे. एलटीपीओ एचडी डिस्प्ले सह १२० हर्ट्झचा रिफ्रेश रेट आणि ३,००० नीट्सची प्रखरता आहे. फोन दुमडलेला असेल तेव्हा डिस्प्ले ३.६ इंचांचा असेल. फोनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तीन रंगांमध्ये मिळणाऱ्या या फोनमध्ये तीन वेगवेगळी डिझाईन असतील. पँटोन जिब्राल्टर सी व्हेरियंटमध्ये कापडाचा स्पर्श जाणवेल असं कव्हर आहे. तर पँटॉन स्प्रिंग टोनमध्ये व्हिगन चामड्याचं कव्हर देण्यात आलं आहे. लायटेस्ट स्काय प्रकारच्या फोनमध्ये संगमरवरी दिसेल असं कव्हर आहे. (Moto Razr 60)
Motorola Razr 60 launched in India.
📱Main Display: 6.9-inch FHD+ pOLED Display
📱External Display: 3.6-inch pOLED Display
💾MediaTek Dimensity 7400X
📸Rear: 50MP Main + 13MP Ultrawide
🤳 32MP Front Camera
🔋4500mAh Battery
⚡30W Wired Charging
⚙️ Hello UI (Android 15)Price:… pic.twitter.com/qNkgecqziw
— TrakinTech (@TrakinTech) May 28, 2025
मोटो रेझर ५० फोनमध्ये मीडियाटेक डिमेन्सिटी ७४०० एक्स हा अत्याधुनिक प्रोसेसर आहे. फोनची प्रणाली अँड्रॉईड १४ आहे. फोनची बॅटरी ४,२०० एमएचए क्षमतेची आहे. आणि ३३ वॅटचा टर्बो पॉवर फास्ट चार्जर या फोनबरोबर देण्यात आला आहे. मोटोरेझर ६० फोनचा प्राथमिक कॅमेरा हा ५० मेगापिक्सेलचा आहे. तर अल्ट्रावाईड लेन्स १३ मेगापिक्सेलची आहे. सेल्फी तसंच व्हिडिओ कॉलसाठी ३२ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. तर प्रत्येक फोनमध्ये किमान २५६ जीबींचं स्टोरेज आहे. फोनला फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तर पाण्यापासून हा फोन पूर्णपणे सुरक्षित आहे. भारतात फ्लिपकार्ट, ॲमेझॉन सारख्या ई-कॉमर्स वेबसाईटवर फोनची विक्री सुरू झाली आहे. (Moto Razr 60)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community