Motilal Oswal : मोतीलाल ओस्वाल कंपनी नेमकं करते काय?

Motilal Oswal : या कंपनीचे संस्थापक कोण आहेत?

47
Motilal Oswal : मोतीलाल ओस्वाल कंपनी नेमकं करते काय?
  • ऋजुता लुकतुके

ज्या व्यक्तीचा आर्थिक व्यवहारांशी संबंध येतो त्यातील बहुतेकांना मोतीलाल ओस्वाल फायनान्शिअल सर्व्हिसेस ही कंपनी माहीत नाही असं होणार नाही. देशात ५५० शहरं आणि गावांत कंपनीच्या २,५०० शाखा किंवा डिलरशिप आहेत. १२,५०० कर्मचारी इथं काम करतात. मुख्यत्वे आर्थिक नियोजनाच्या क्षेत्रात ही कंपनी काम करते. १९८७ मध्ये पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या मोतीलाल ओस्वाल यांनी रामदेव अगरवाल यांच्या सहकार्याने ही कंपनी सुरू केली आहे. शेअर ब्रोकिंग बरोबरच असेट मॅनेजमेंट, रिटेल ब्रोकिंग, इन्स्टिट्युशनल इक्विटीज, प्रायव्हेट इक्विटी, प्रायव्हेट वेल्थ मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट बँकिंग या क्षेत्रात लोकांसाठी सेवा पुरवण्याचं काम ही कंपनी करते. (Motilal Oswal)

(हेही वाचा – Devendra Fadnavis and Raj Thackeray यांच्या भेटीनंतर संजय शिरसाट यांची खुली ऑफर !)

कंपनी पुरवत असलेल्या वित्तीय सेवा विस्ताराने समजून घेऊया : 

असेट मॅनेजमेंट – याला मालमत्ता व्यवस्थापन असं म्हटलं जातं. तुमच्याकडे असलेली संपत्ती, मिळकत यांचं योग्य नियोजन, बचन, गुंतवणूक आणि देखभाल यांचं तंत्र म्हणजे मालमत्ता व्यवस्थापन. विविध आर्थिक गरजा समजून घेऊन त्याप्रमाणे पैशाची सोय करणे हा या व्यवस्थापनाचा गाभा आहे. मुदतठेवी, बाँड्स, शेअर बाजार, म्युच्युअल फंड अशा गुंतवणुकीच्या माध्यमातून हे साध्य केलं जातं. (Motilal Oswal)

वेल्थ मॅनेजमेंट – वेल्थ मॅनेजमेंट खासकरून जास्त मिळकत असलेल्या लोकांसाठी आहे. याला संपत्ती व्यवस्थापन असंही म्हणतात आणि असेट मॅनेजमेंटची ही पुढची पायरी आहे. इथं फक्त मिळकतीचं नियोजन नाही तर तुमचं कर दायित्व आणि इतर दायित्वही लक्षात घेतलं जातं. संपत्ती किंवा मिळकतीबरोबरच इतर मालमत्तेचं नियोजनही इथं केलं जातं. (Motilal Oswal)

(हेही वाचा – Ahmedabad Plane Crash : एअर इंडियाच्या दुर्घटनेनंतर टाटा समूहाकडून पोस्ट; संवेदना व्यक्त करत अध्यक्ष म्हणाले…)

इन्व्हेस्टमेंट बँकिंग – मोठ्या संस्था, कॉर्पोरेट कंपन्या, व्यावसायिक तसंच सरकारी तिजोरीचंही नियोजन आणि आर्थिक उलाढालीत मदत करणारी सेवा पुरवणे याला इन्व्हेस्टमेंट बँकिंग म्हणतात. दोन कंपन्यांचं विलिनीकरण, अधिग्रहण अशा प्रक्रियांपासून ते पगारांचं नियोजन, कर्जाचं नियोजन, कायदेशीर आर्थिक सल्ले अशा सगळ्यात सेवा यात येतात. (Motilal Oswal)

प्रायव्हेट इक्विटी – वित्तीय संस्थेकडे लोकांनी केलेल्या गुंतवणुकीतून जमलेले पैसे हे कंपन्यांमध्ये गुंतवणे आणि त्यातून झालेला नफा गुंतणूकदारांमध्ये वाटणे या प्रक्रियेला प्रायव्हेट इक्विटी गुंतवणूक असं म्हणतात. (Motilal Oswal)

होम फायनान्स – घरगुती आर्थिक सल्ले, नियोजन आणि आर्थिक उद्धिष्टं साध्य करण्यासाठी तरतूद करण्याला होम फायन्स म्हणतात. ही सेवाही मोतीलाल ओस्वाल ही कंपनी पुरवते. शेअर बाजारात खरेदी – विक्री होणाऱ्या शेअरवर संशोधनात्मक अहवाल सादर करण्याचं कामही ही संस्था नियमितपणे करते. (Motilal Oswal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.