मोतीचूरचे लाडू हे मऊ, चविष्ट आणि तोंडात विरघळणारे असतात. हे लाडू मुख्यतः बेसन आणि साखरेपासून तयार केले जातात. आधी बेसन भिजवून त्याच्या बारीक गोळ्या तळतात. त्यानंतर त्यात साखरेचा पाक आणि ऐच्छिक ड्रायफ्रूट घालून लाडू वळवले जातात. मोतीचूरचा लाडू हा उत्तर भारतीय पाककृतींमधला एक लोकप्रिय गोड पदार्थ आहे. मोतीचूरचे लाडू सणासुदीला किंवा कोणत्याही उत्सवाला तयार केले जातात. लग्न समारंभातही सर्रास वापर होतो.
आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये मोतीचूरचे लाडू कसे तयार केले जातात त्याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर मग पाहुयात… (Motichoor Ladoo recipe in marathi)
(हेही वाचा – व्हाइट हाऊसमध्ये Donald Trump दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींसोबत भिडले ; Video Viral)
साहित्य
- १ कप बेसन (साधारणपणे ११० ग्रॅम)
- नारंगी फूड कलर
- १/२ चमचा वितळवलेलं तूप
- १/२ कप आणि ६ टेबलस्पून पाणी (वेगवेगळे घ्या. १२० मिली + ९० मिली)
- तळण्यासाठी तूप किंवा तेल, सुमारे २ कप
- टरबूजाच्या बिया (ऐच्छिक)
साखरेचा पाक तयार करण्यासाठी
- १ कप दाणेदार पांढरी साखर (२०० ग्रॅम)
- १/२ कप पाणी (१२० मिली)
- १.५ चमचे केवड्याचं पाणी किंवा गुलाबजल
- १/४ चमचा वेलची पावडर
- १ चमचा लिंबाचा रस
- नारंगी फूड कलर
(हेही वाचा – “…तर आम्ही त्यांना जिथे असतील तिथेच ठोकणार”; परराष्ट्रमंत्री S Jaishankar यांचा स्पष्ट इशारा)
पाककृती
टीप :- कृपया लक्षात ठेवा की, मोतीचूरचे लाडू करताना बारीक जाळीचा झारा वापरावा. झाऱ्याला जर मोठी जाळी असेल तर मोठी बुंदी पडेल आणि मोतीचूरचे लाडू बनू शकणार नाहीत. (Motichoor Ladoo recipe in marathi)
बुंदी तयार करणे
- एका मोठ्या भांड्यात बेसन आणि फूड कलर घाला. नंतर थोडं तूप घाला आणि चांगलं मिक्स करून घ्या.
- त्यानंतर त्यामध्ये हळूहळू पाणी घालायला सुरुवात करा. सुमारे १/२ कप घाला जेणेकरून गुठळ्या नसलेलं जाड पीठ तयार होईल. मग त्यात आणखी ३ टेबलस्पून पाणी घाला आणि चांगलं एकजीव करा. तयार झालेलं पीठ १५ मिनिटं तसंच राहू द्या.
- १५ मिनिटांनंतर त्यात उरलेलं ३ टेबलस्पून पाणी घालुन आणि मिक्स करा. (या पिठामध्ये साधारणपणे वापरलेलं पाण्याचं एकूण प्रमाण १२० मिली + ४५ मिली + ४५ मिली = २१० मिली असं आहे.)
टीप :- पिठ गरजेपेक्षा जास्त पातळ नसावं. तसंच ते गुठळ्या नसलेलं असावं.
- पीठ तयार झाल्यानंतर मध्यम आचेवर एका कढईमध्ये तेल किंवा तूप गरम करा.
- तेल किंवा तूप गरम झाल्यावर झाऱ्याला तेलाच्या किंवा तुपाच्या पृष्ठभागापासून ३ ते ४ इंच वर धरा आणि झाऱ्यातून पीठ ओतण्यास सुरुवात करा. वाटल्यास कोणाची तरी मदत घ्या.
- झाऱ्यातून पडलेली लहान बुंदी ३० ते ४० सेकंद तळून घ्या. बुंदीचा रंग बदलता कामा नये. सगळी बुंदी तळून होईपर्यंत तळलेली बुंदी एका मोठ्या चाळणीत काढून ठेवा. (Motichoor Ladoo recipe in marathi)
(हेही वाचा – gulab jamun recipe in marathi : ही सामग्री घालून घरच्याघरी बनवा दुकानासारखे सुगंधी गुलाबजाम)
साखरेचा पाक तयार करण्यासाठी
- साखरेचा पाक तयार करण्यासाठी एका मोठ्या भांड्यात साखर आणि पाणी घाला.
- साखर वितळायला लागली की त्यात, वेलचीची पूड आणि केवड्याचं पाणी किंवा गुलाबजल घाला.
- मग त्यात लिंबाचा रस आणि फूड कलर घाला.
- ते मिश्रण उकळताच गॅस बंद करा आणि त्यात तळलेली बुंदी घालून चांगलं ढवळून घ्या. नंतर पुन्हा अगदी मंद आचेवर गॅस सुरू करा आणि २ ते ३ मिनिटं बुंदी पाकात शिजवून घ्या.
मोतीचूरचे लाडू वळणे
- पाकातली बुंदी एका पसरट भांड्यात काढून घ्या. जेणेकरून ती थंड होईल. आता तुम्ही त्यात टरबुजाच्या बिया घालू शकता.
- बुंदीचं मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर त्या मिश्रणाचा एक छोटासा भाग घेऊन त्याचा गोल लाडू वळा. अशाप्रकारे सगळ्या बुंदीचे तुम्हाला हव्या त्या मापाचे गोल लाडू वळून घ्या.
- वर सांगितल्याप्रमाणे साहित्य घेतलं तर तुम्हाला त्यातून सुमारे १२ ते १५ लाडू तयार करता येतील.
- खास मेजवानी म्हणून हे मोतीचूरचे लाडू खा आणि खायला द्या! (Motichoor Ladoo recipe in marathi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community