MG Windsor EV : मॉरिस गराजच्या विंडसर प्रो गाडीची भारतात डिलिव्हरी सुरू

MG Windsor EV : सुरुवातीला गाडीची किंमत १७.५ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

29
MG Windsor EV : मॉरिस गराजच्या विंडसर प्रो गाडीची भारतात डिलिव्हरी सुरू
  • ऋजुता लुकतुके

मॉरिस गराज कंपनीने अखेर भारतात आपल्या विंडसर गाडीचं नवीन इलेक्ट्रिक मॉडेल विंडसर प्रो लाँच केलं आहे. भारतात ही गाडी नोंदणीकृत ग्राहकांना मिळायला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि बंगळुरू या महानगरात पहिल्याच दिवशी प्रत्येकी १५० ग्राहकांना गाडीच्या चाव्या देण्यात आल्या. सुरुवातीला गाडीची किंमत १७.५ लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. गाडीची बॅटरी ग्राहकांना कंपनीकडून प्रती किलोमीटरमागे साडेतीन रुपये या दराने लीजवर मिळणार आहे. ही गाडी कॉम्पॅक्ट युटिलिटी व्हेहिकल अर्थात, सीयुव्ही प्रकारातील आहे. एक्साईट, एक्सक्लुजिव्ह तसंच इसेन्स या तीन प्रकारात ती ग्राहकांना उपलब्ध होईल. (MG Windsor EV)

विंडसर ईव्ही गाडीची विक्री सुरुवातीला चीनमध्ये सुरू झाली. वुलिंग क्लाऊड या नावाने तिथे ती विकली जात होती. क्लाऊड ईव्हीज कंपनीच्या डिझाईनवर आधारित हे डिझाईन होतं. भारतातही तेच डिझाईन असेल. गाडीचे दिवे मागून पुढून एलईडी आहेत. एलईडी दिव्यांच्या छोट्या माळेमुळे या गाडीला स्पोर्टी लुक प्राप्त झाला आहे. गाडीचं काचेचं छत हे खूपच मोठं म्हणजे एकावेळी ४ ते ५ जण उभे राहू शकतील असं आहे. (MG Windsor EV)

(हेही वाचा – अटारी-वाघा सीमेवर १२ दिवसांनी Beating Retreat Ceremony पुन्हा सुरू होईल, पण यावेळी…)

गाडीतील चालकाजवळचा डिस्प्ले ८.८ इंचांचा आहे. तर मागची सिट १३५ अंशांपर्यंत खाली जाऊ शकते. त्यामुळे ही गाडी खूपच आरामदायी आहे. चालक आणि सहप्रवाशाच्या सिट इलेक्ट्रिक पद्धतीने सरकवल्या जाऊ शकतात. एसी व्हेंटही गरजेनुसार एका बटनावर आपली वाऱ्याची दिशा बदलू शकतात. अँड्रॉईड आणि ॲपल कार प्लेसाठी वायरलेस जोडणी होऊ शकते. इन्फिनिटी साऊंड सिस्टिममध्ये ८ स्पीकर आहेत. वायरलेस फोन चार्जिंगची सोय तर गाडीत आहेच. (MG Windsor EV)

गाडीतील बॅटरी ३८ केडब्ल्यूएच क्षमतेची आहे. या बॅटरी इंजिनातून १३४ बीएचपी इतकी शक्ती निर्माण होऊ शकते. बॅटरी पूर्णपणे चार्ज केलेली असले तर ही गाडी ३३१ किमीचं अंतरही एका दमात कापू शकते. गाडी चालवताना तुम्हाला इको, इको प्लस, स्पोर्ट्स आणि नियमित असे चार मोड उपलब्ध आहेत. बॅटरी चार्ज करण्यासाठी मॉरिस गराज कंपनीने ग्राहकांना तीन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. प्राथमिक ३.३ केव्ही क्षमतेचा चार्जर १३.७ तासांत अख्खी बॅटरी चार्ज करतो. तर ७.४ आणि ५० केव्ही क्षमतेचा चार्जर अनुक्रमे ६.५ तास आणि ५५ मिनिटांत बॅटरी चार्ज करून देतो. (MG Windsor EV)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.