marathi festival : महाराष्ट्रात कोणकोणते सण व उत्सव धुमधडाक्यात साजरे होतात? जाणून घ्या रंजक माहिती!

26
marathi festival : महाराष्ट्रात कोणकोणते सण व उत्सव धुमधडाक्यात साजरे होतात? जाणून घ्या रंजक माहिती!

महाराष्ट्र हे भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वांत मोठं राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रत्येक सणाचं एक वेगळं महत्त्व आहे. त्यांपैकीच काही महत्त्वाच्या सणांविषयी आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत…

महाराष्ट्रात साजरा केला जाणारा प्रत्येक सण हा महाराष्ट्र राज्याच्या संस्कृती आणि अध्यात्माचं ऐतिहासिक महत्त्व दर्शवतो. दरवर्षी इथे प्रत्येक संस्कृतीचं आणि समुदायांमधलं संयोजन पाहण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक येतात.

महाराष्ट्र राज्य हे भारताच्या मध्य द्वीपकल्पीय क्षेत्रात वसलेलं पश्चिम किनारी राज्यांपैकी एक राज्य आहे. इथले लोक अतिशय प्रेमळ आणि चांगल्या स्वभावाचे आहेत. ‘अतिथी देवो भव’ ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. (marathi festival)

(हेही वाचा – MG Windsor EV : मॉरिस गराजच्या विंडसर प्रो गाडीची भारतात डिलिव्हरी सुरू)

गणेश चतुर्थी

गणेश चतुर्थी हा महाराष्ट्रातला सर्वांत महत्त्वाचा आणि प्रसिद्ध सण आहे. हा सण संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीच्या दिवशी महादेव आणि माता पार्वती यांचे पुत्र गणपती यांचा जन्म झाला होता. त्यांचा जन्मोत्सव म्हणून गणेशोत्सव साजरा केला जातो. गणपती हे बुद्धी, ज्ञान आणि कलेचे अधिपती दैवत आहेत. म्हणूनच कोणतंही शुभकार्य हे श्री गणेशाची पूजा करूनच सुरू केलं जातं.

महाराष्ट्रामध्ये लोक श्री गणेशाच्या स्तोत्र पठणाने आपल्या दिवसाची सुरुवात करतात. गणेशोत्सव हा दहा दिवस साजरा केला जातो. या उत्सवात संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. घरातल्या स्त्रिया मोदक, पुरण पोळी, लाडू आणि वेगवेगळ्या प्रकारचे मिष्टान्न आणि अन्नपदार्थ तयार करून आपल्या लाडक्या बाप्पाला नैवेद्य दाखवतात.

गणेशोत्सव हा फक्त घरगुतीच नाही तर सार्वजनिकरित्याही साजरा केला जातो. ठिकठिकाणी मोठमोठी मंडळे या उत्सवाचं आयोजन करतात. या उत्सवात लहान मुलांच्या आणि मोठ्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा भरवल्या जातात. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सगळे भक्तगण मिरवणूक काढतात आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात. (marathi festival)

(हेही वाचा – अटारी-वाघा सीमेवर १२ दिवसांनी Beating Retreat Ceremony पुन्हा सुरू होईल, पण यावेळी…)

नवरात्र आणि विजयादशमी

नवरात्रोत्सव हा आई जगदंबेच्या सात्विक शक्तीच्या आगमनासाठी साजरा करण्यात येतो. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आई जगदंबेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.

त्यानंतर दहाव्या दिवशी विजयादशमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला होता. म्हणून दरवर्षी दूषप्रवृत्तीवर सत्प्रवृत्तीचा विजय म्हणून या दिवशी सकाळी शास्त्र आणि शस्त्रपूजन केलं जातं आणि रात्री रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जातं.

दिवाळी

दिवाळी हा महाराष्ट्रातल्या सर्वांत प्रसिद्ध आणि लोकप्रिय सणांपैकी एक सण आहे. दिवाळीला दीपोत्सव असंही म्हटलं जातं. दिवाळीमध्ये धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असे चार दिवस मिळून दिवाळी साजरी करतात.

दिवाळीच्या दिवसांत घरांची सजावट केली जाते. घरोघरी दारात रांगोळ्या काढल्या जातात आणि दिव्यांची रोषणाई देखील करण्यात येते. रात्री सगळे लोक फटाके फोडतात. याव्यतिरिक्त दिवाळीचा फराळ म्हणजे या उत्सवाचा अविभाज्य भाग आहे. दिवाळी नंतर तुलसीविवाह देखील मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. (marathi festival)

(हेही वाचा – Latur Birth Certificate Scam: लातूरमध्ये जन्म दाखल्यांचा मोठा घोटाळा उघडकीस ! २,२५७ बांगलादेशींची बनावट जन्म प्रमाणपत्रे रद्द)

जन्माष्टमी

जन्माष्टमीच्या दिवशी सगळीकडे भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतात. कृष्णाचा पाळणा सजवून रात्री बारा वाजता पाळणा हलवून पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे बालगोपाळ मिळून दहीहंडी फोडतात. श्रावण महिन्याच्या अष्टमीला श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणजेच जन्माष्टमी साजरी केली जाते.

गुढी पाडवा

चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला गुढी पाडवा साजरा केला जातो. असं म्हणतात की, ब्रह्मदेवाने याच दिवशी या सृष्टीची रचना केली होती. या दिवशी सकाळी लवकर उठून वैभवाचं आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून दारोदारी गुढी उभारून तिची पूजा केली जाते. गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. काही सामाजिक संस्था भव्य शोभायात्रेचं आयोजन करतात. या शोभायात्रेमध्ये अनेक चित्ररथ असतात. या चित्ररथांद्वारे हिंदू संस्कृतीचं दर्शन घडवलं जातं. हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडवा हा वर्षाचा पहिला दिवस असतो. म्हणूनच हा दिवस मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यात येतो.

राम नवमी

चैत्र महिन्याच्या नवमीला दुपारी भगवान श्रीरामाचा जन्म झाला होता. म्हणून त्यांचा जन्मदिवस हा राम नवमी म्हणून साजरा करतात. या दिवशी भगवान श्रीरामांना दुपारी बारा वाजता पाळण्यात घातलं जातं. त्यांची पूजा केली जाते. (marathi festival)

(हेही वाचा – “खगोलशास्त्र जगताला मोठा धक्का – ज्येष्ठ वैज्ञानिक Jayant Narlikar यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”)

नाग पंचमी

श्रावण महिन्याच्या पंचमीच्या दिवशी नाग पंचमी साजरी केली जाते. या दिवशी लोक नागदेवतेची पूजा करतात. या दिवशी नागोबाला दूध आणि लाह्यांचा प्रसाद अर्पण केला जातो.

नारळी पौर्णिमा

समुद्र हा महाराष्ट्रातल्या लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. खासकरून कोकण किनारपट्टीवर राहणारे लोक आणि आपले कोळी बांधव. कोळी बांधवांचा हा सर्वांत मोठा सण आहे. कोळी बांधव नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रदेवतेची पूजा करून नारळ अर्पण करतात. हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवसापासून नव्याने मासेमारीचा हंगाम सुरू होतो.

बैलपोळा

आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. बैल हा शेतकऱ्यांचा मित्र असतो. म्हणून महाराष्ट्रात शेतीसाठी शेतकऱ्यासोबत मेहनत करणाऱ्या बैलांसाठी कृतज्ञता म्हणून बैलपोळा साजरा केला जातो. या दिवशी बैलांना नांगराला बांधलं जात नाही. तर त्यांना सजवलं जातं. त्यांची पूजा केली जाते. खायला चांगला खाऊ दिला जातो आणि बैलांची मिरवणूक काढली जाते.

याव्यतिरिक्त महाराष्ट्रात मकर संक्रांत, होळी, गुरु पौर्णिमा, कोजागरी पौर्णिमा, रक्षाबंधन, महाशिवरात्री, आषाढी एकादशी असे कित्येक दिवस मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. (marathi festival)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.