mango pickle recipe : उन्हाळ्यात आंब्याचं चटपटीत लोणचं खायला आवडतं ना? मग “अशाप्रकारे” बनवा आंब्याचे अनोखे लोणचे!

133
mango pickle recipe : उन्हाळ्यात आंब्याचं चटपटीत लोणचं खायला आवडतं ना? मग "अशाप्रकारे" बनवा आंब्याचे अनोखे लोणचे!

उन्हाळा आला म्हणजे घरोघरी लोणचे, पापड, फेण्या, कुरडया बनवायला हमखास सुरुवात होते. उन्हाळ्यात तयार करण्यात येणारे हे सगळे पदार्थ घरात वर्षभर साठवून ठेवले जातात आणि आवडीने खाल्ले जातात.

त्यातही लोणचं म्हटलं तरी लोणच्याचे कितीतरी प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यात आंबा, लिंबू, मिरची, लसूण, ओली हळद, गाजर, आवळा, करवंद, मिक्स लोणचं असे बरेच प्रकार तुम्हाला माहिती असतीलच. अशी सर्व प्रकारची लोणची तयार करून काचेच्या बरणीत वर्षभर साठवून त्यांचा आस्वाद घेता येतो. आज आम्ही तुमच्यासोबत आंब्याच्या चविष्ट लोणच्याची पारंपरिक रेसिपी शेअर करणार आहोत. चला तर मग पाहुयात… (mango pickle recipe)

(हेही वाचा – BCCI Working Committee : बीसीसीआय कार्यकारिणीत देवाजित साकिया सचिव तर प्रभतेज सिंग भाटिया यांची खजिनदार म्हणून बिनविरोध निवड)

साहित्य

  • कच्चे आंबे (हिरवे कच्चे आंबे जे खूप घट्ट असतील तेच निवडा)
  • मसाले – मोहरी, हिंग, कुस्करलेली हळद पावडर आणि मीठ.
  • लोणच्याचा मसाला – बाजारात अनेक ब्रँड्सचे लोणच्याचे मसाले उपलब्ध आहेत. त्यांपैकी तुम्ही कोणत्याही ब्रॅंडचा मसाला वापरू शकता.
  • गूळ – आंबट आंब्यांना संतुलित चव आणण्यासाठी एक प्रकारचा गोडवा हवा असतो म्हणून गूळ वापरतात.
  • तेल – कोणतंही तेल घेतलं तरी चालतं. (तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेलही वापरू शकता. (mango pickle recipe)

(हेही वाचा – Women’s Premier League : यंदा फेब्रुवारीतच होणार डब्ल्यूपीएल, ४ शहरांत सामने )

आंब्याचं लोणचं बनवण्याची पद्धत

धारदार चाकूने आंबे अर्धे कापून घ्या. त्यानंतर प्रत्येक अर्ध्या भागाच्या तुमच्या आवडीप्रमाणे चौकोनी लहान फोडी करून घ्या. आतली कोय काढून टाका.

त्यानंतर आंब्याच्या फोडी एका भांड्यात घेऊन त्यात मीठ आणि हळद घाला. चांगलं मिसळा आणि रात्रभर झाकून ठेवा. असं केल्याने फोडींचा आंबटपणा दूर होण्यास मदत होते. तसाच त्यांतला अतिरिक्त ओलावा निघून जातो. हळदीमुळे आंब्याच्या फोडी घट्ट होण्यासाठी मदत होते. तसंच हळदीच्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे लोणचं वर्षभर टिकून राहण्यासाठी मदत होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी आंब्याच्या फोडिंतून निघालेलं पाणी व्यवस्थित गाळून घ्या.

मग निथळलेल्या फोडी एका जुन्या किचन टॉवेलवर ८ तास व्यवस्थित पसरून ठेवा जेणेकरून उरलंसुरलं पाणीसुद्धा सुकून जाईल. या प्रक्रियेमुळे लोणचं जास्त काळ टिकण्यासाठी मदत होते. (mango pickle recipe)

त्यानंतर एका मध्यम कढईत तेल गरम करा. मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग घालून गॅस बंद करा आणि तेल पूर्णपणे थंड होऊ द्या. तेल थंड झाल्यानंतर तेलात गूळ घाला आणि लगेचच व्यवस्थित ढवळा.

मग तेलामध्ये आंब्याच्या फोडी, लोणच्याचा मसाला आणि चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण चांगलं मिसळून घ्या.

त्यानंतर मिक्स केलेलं हे लोणचं स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीत घाला. लोणचं बरणीमध्ये घट्ट दाबा आणि बरणी बंद करा.

बरणीच तोंड एका कापडाने घट्ट बांधून झाकून ठेवा. ती बरणी रात्रभर एखाद्या हवेशीर ठिकाणी तशीच ठेऊन द्या. सकाळपर्यंत काही अतिरिक्त तेल वर येऊ लागेल. तेव्हा लोणचं पुन्हा चांगलं मिसळा पूर्वीसारखं झाकून ठेवा. ही क्रिया तीन ते चार दिवस करत राहा. (mango pickle recipe)

आंब्याचं स्वादिष्ट लोणचं तीन ते चार दिवसांत खाण्यासाठी तयार असेल. हे तयार झालेलं लोणचं तुम्ही थंड कोरड्या जागी किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि वर्षभर चवीचवीने खाऊ शकता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.