
मल्हारगड किल्ला (Malhargad Fort) हा मराठ्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला आहे. हा किल्ला म्हणजे १८ व्या शतकातलं महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटातल्या पुणे इथल्या सासवड जवळ असलेल्या सोनोरी गावात असलेलं एक स्मारक आहे. म्हणूनच मल्हारगडला सोनोरी किल्ला असंही म्हणतात. मल्हारगड हा सह्याद्री पर्वताच्या एका बाजूला असलेल्या किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे. सह्याद्री पर्वताच्या या भागाला भुलेश्वर पर्वतरांगा असं म्हणतात. या पर्वतरांगा पश्चिम घाटामध्ये पूर्व-पश्चिम दिशेने पसरलेल्या आहेत.
मल्हारगड किल्ला (Malhargad Fort) हा इतर डोंगरी किल्ल्यांप्रमाणेच ट्रेकिंग आणि जलद प्रवासासाठीही प्रसिद्ध आहे. दर आठवड्याच्या शेवटी इथे जवळपास राहणारे स्थानिक लोक या किल्ल्याला भेट द्यायला येतात. सोनोरी या मल्हारगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावामध्ये पानसे कुटुंबाचा वारसा असलेला एक राजवाडा देखील आहे. राजवाड्याचा बराचसा भाग भग्नावस्थेत असला तरी, मल्हारगड किल्ला हा पूर्णपणे शाबूत आहे. पर्यटक किल्ल्यावर ट्रेक करू शकतात. तसंच इथल्या राजवाड्याचा भागही पाहू शकतात. त्याचबरोबर सह्याद्री पर्वतरांगांचं मनमोहक दृश्य देखील अनुभवू शकतात.
(हेही वाचा – विद्यार्थ्याला Janeu काढायला लावणाऱ्या प्राचार्य आणि कर्मचाऱ्यावर केली ‘ही’ कारवाई)
पुणे इथल्या मल्हारगड किल्ल्याचा इतिहास
मल्हारगड किल्ला (Malhargad Fort) हा १७५७ ते १७६० सालादरम्यान कृष्णाजी माधवराव पानसे आणि पेशवे तोफखान्याचे प्रमुख भिवराव यशवंत यांनी बांधला होता. काही ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये माधवराव पेशवे यांनी या किल्ल्याला भेटी दिल्याचा उल्लेख आहे. मल्हारगड किल्ला मुळात सासवड-पुणे मार्गावर असलेल्या दिवे घाटावर निगराणी ठेवण्यासाठी बांधला गेला होता. हा मराठ्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला आहे.
पुणे इथल्या मल्हारगड किल्ल्याचं स्थापत्यशास्त्र
मल्हारगड किल्ला हा भुलेश्वर पर्वतरांगामधला डोंगर पठाराचा त्रिकोणी भाग व्यापतो. उंच दगडी तटबंदीने या किल्ल्याचा परिसर वेढला आहे. ज्यांमध्ये चौकोनी आकाराचा किल्ला, राजवाड्याचे काही अवशेष, दोन विहिरी, पाण्याची टाकी, महादेवांचं मंदिर आणि खंडोबांचं एक मंदिर आहे. ही मंदिरं लहान आहेत. एका वेळी ४ ते ५ लोक या मंदिरांत उभे राहू शकतात. सह्याद्री पर्वतरांगांमधल्या इतर किल्ल्यांच्या तुलनेने मल्हारगड हा किल्ला खूपच लहान आहे.
(हेही वाचा – Torna Fort : तोरणा किल्ला म्हणजे स्वराज्याचं तोरण! इतिहास, निसर्ग, अध्यात्म आणि साहसपूर्ण सहलीसाठी हा किल्ला आहे प्रसिद्ध…)
मल्हारगड किल्ल्याभोवती करण्यासारख्या इतर गोष्टी
मल्हारगड किल्ला (Malhargad Fort) हे एक पर्यटनस्थळ म्हणून उत्तम ठिकाण आहे. हा किल्ला पुणे शहराच्या जवळ असल्याने इथे येणारे पर्यटक किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी आणि आसपासचा परिसर एक्सप्लोर करण्यासाठी सोनोरी गावातून गाडी चालवून जाऊ शकतात. किंवा आपली वाहनं गावात पार्क करून डोंगरावरून किल्याच्या पायथ्याशी चढू शकतात.
मल्हारगड किल्ल्यापर्यंतचा ट्रेक हा एक सोपा ट्रेक आहे. सोनोरी आणि झेंडेवाडी या दोन्ही गावांमधून किल्ल्यावर चढाई करायला सुमारे ३० ते ४५ मिनिटं लागतात. हे ट्रेकरवर अवलंबून असते की, ते किती वेगाने पुढे जातात.
मल्हारगड किल्ल्याच्या (Malhargad Fort) माथ्यावरून सह्याद्री पर्वत, सिंहगड किल्ला, पुरंदर किल्ला, वज्रगड किल्ला, जेजुरी, पर्वती टेकड्या इत्यादींचं सुंदर दृश्य पाहता येतं. तसंच निसर्गरम्य परिसराचा आनंद घेता येतो आणि भरपूर फोटोही काढता येतात. पर्यटक किल्ल्याजवळ कॅम्पिंगही करू शकतात. त्यासाठी काम्पिंगचं साहित्य सोबत न्यावं लागेल.
या किल्ल्यावर अन्न आणि पाण्याची उपलब्धता ही एक समस्या असू शकते. म्हणून ट्रेकर्सनी पुरेसा नाश्ता आणि बाटलीबंद पाणी घेऊन जावे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community