
महाराष्ट्रीयन पारंपारिक दागिने हे त्यांच्या साध्या पण ठळक डिझाइनसाठी ओळखले जातात. त्यांच्या रचना अर्थपूर्ण आहेत आणि त्यांनी शतकानुशतके बहुतेक महाराष्ट्रीयन घराण्यांमध्ये असे दागिने वापरले जातात. त्यापैकीच काही प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रीयन दागिन्यांचे लोकप्रिय प्रकार खालीलप्रमाणे आहेत… (maharashtrian jewellery styles)
बकुळी हार :
बकुळी हार हा एक पारंपारिक हार आहे. हा हार पाच पाकळ्यांच्या साध्या फुलांच्या आकृतिबंधांनी तयार केला जातो. त्या फुलांना एका तारेत गुंफून एक सुंदर हार तयार होतो. अनेक बकुळी हार दोन किंवा त्याहून अधिक थरांमध्ये तयार करता येतात. या हाराची लांबी चोवीस ते अठ्ठावीस इंची असते. बकुळी हार हा एक सुंदर आणि प्रतीकात्मक दागिन्यांचा भाग आहे, जो महाराष्ट्रीयन संस्कृती आणि परंपरांमध्ये स्वतःचं एक विशेष स्थान राखतो. (maharashtrian jewellery styles)
(हेही वाचा – maharashtra nature park : १२५ पेक्षा जास्त पक्ष्याच्या प्रजाती असणार्या या महाराष्ट्र नेचर पार्कमध्ये लोक जातात हरवून!)
तनमणी हार :
या हाराच्या मधल्या पेंडेंटला स्थानिक कारागीर “खोड” असं म्हणतात. याच्या चारही बाजूंनी मोती बांधलेले असतात. हे बहुतेकदा हिरे, माणिक किंवा पाचू सारख्या मौल्यवान रत्नांनी सजवलेले असतात. हा हार त्याच्या बहुमुखी प्रतिभेसाठी ओळखला जातो. लग्नापासून ते सणांपर्यंत वेगवेगळ्या प्रसंगी तो वापरता येतो. (maharashtrian jewellery styles)
महाराष्ट्रीयन नथ :
नथ म्हणजे जगभरातील महिलांकडून वापरला जाणारा पारंपारिक असलेला नाकाचा दागिना आहे. नथ ही सामान्यतः मोठी असते. ती सोन्याच्या तारांनी बांधलेली असते आणि मध्यभागी मोती आणि माणिकांनी बांधलेली असते. नथ ही विशेष प्रसंगी किंवा पारंपारिक पोशाखाचा भाग म्हणून वापरली जाते. महाराष्ट्रीयन संस्कृतीत हा एक महत्त्वाचा दागिना आहे. (maharashtrian jewellery styles)
(हेही वाचा – blouse design : २०२५ सालच्या ‘या’ ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन्स आजमावून पाहा; लोक तुमच्याकडेच पाहत राहतील…)
बुगडी :
बुगडी ही कानाच्या वरच्या पाळ्यांवर घातली जातात. (maharashtrian jewellery styles)
कुडी :
कुडी म्हणजे साधारणपणे सात मोती किंवा सात माणिकांचा वर्तुळाकार आकार एकत्र बांधून तयार करण्यात येतात. (maharashtrian jewellery styles)
जोडवी :
महाराष्ट्रातल्या विवाहित महिला ही जोडवी वापरतात. जोडवी सामान्यतः चांदीपासून तयार करण्यात येतात. त्या अतिशय शुभ मानल्या जातात. तसंच त्या सौभाग्यवती स्त्रियांचं प्रतीक आहेत. (maharashtrian jewellery styles)
(हेही वाचा – Delhi-Shirdi Flight मध्ये प्रवासी मद्यधुंद; एअर होस्टेसचा विनयभंग)
मंगळसूत्र :
संस्कृत शब्दांपासून या दागिन्याचं नाव तयार झालं आहे. ‘मंगळा’ म्हणजे शुभ आणि ‘सूत्र’ म्हणजे धागा. मंगळसूत्राचं महत्त्व केवळ अलंकारापेक्षाही जास्त आहे. ते वैवाहिक बंधनाचं प्रतीक आहे. मंगळसूत्राचे काळे मणी नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि वैवाहिक जीवनाचे रक्षण करतात असे मानले जाते. (maharashtrian jewellery styles)
नोज पिन :
महाराष्ट्रात नाक टोचण्याचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे. ज्याची उत्पत्ती जगभरातील प्राचीन संस्कृतींमध्ये आहे. काही समाजांमध्ये, नाक टोचणे हे सामाजिक स्थिती, धार्मिक श्रद्धा आणि अगदी संस्कारांचं प्रतीक मानलं जातं. (maharashtrian jewellery styles)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community