Madh Fort : मुंबईचं मढ आयलॅंड म्हणजे नैसर्गिक सौंदर्याचा खजिना; या शांत ठिकाणी येऊन व्हाल प्रसन्न

24
Madh Fort : मुंबईचं मढ आयलॅंड म्हणजे नैसर्गिक सौंदर्याचा खजिना; या शांत ठिकाणी येऊन व्हाल प्रसन्न

मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर वसलेलं मढ आयलँड हे शहराच्या गजबजलेल्या वातावरणातून सुटका मिळवून देतं. इथे अनेक कोळ्यांची आणि शेतकऱ्यांची गावं आहेत. हा संपूर्ण परिसर पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्वेला मालाड खाडीने वेढलेला आहे. येथे एरंगल बीच, दाना पानी बीच, सिल्व्हर बीच आणि अक्सा बीच असे काही समुद्रकिनारे आहेत. (Madh Fort)

मढ आयलँड इथे जाण्यासाठी मालाड स्टेशन इथून #२७१ आणि बोरीवली इथून #२६९ या बेस्ट बस सेवा उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त इथे ऑटोरिक्षानेही जाता येतं. तसंच वर्सोवा जेट्टीहून फेरी सेवा देखील उपलब्ध आहे. इथला दूरवर पसरलेला समुद्रकिनारा, ऐतिहासिक खुणा आणि अनेक प्रकल्प यांमुळे मढ आयलँड हे एखाद्या लपलेल्या खजिन्यासारखं आहे. हा खजिना शोधण्यासाठी अनेक निसर्गप्रेमी, इतिहासप्रेमी साहसी लोक या सुंदर बेटावर येत असतात. मढ आयलँडवर कोणकोणत्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत ते आज आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत… (Madh Fort)

(हेही वाचा – ‘Operation Sindoor’ स्थगित असतानाच भारतीय सैन्यदलाला आणखी ४० हजार कोटींची संरक्षण सामुग्री)

मढ किल्ला

इतिहासात रमलेला मढ आयलँडवरचा किल्ला हा इथलं एक विशिष्ट आकर्षण म्हणून उंच उभा आहे. १७व्या शतकातला पोर्तुगीजांच्या काळातल्या या भव्य किल्ल्यावरून अरबी समुद्राचं चित्तथरारक आणि रोमांचक दृश्यं दिसतं. मढ इथला किल्ला हा पोर्तुगीजांनी त्यांच्या काळात बांधला होता. पुढे फेब्रुवारी १७३९ साली मराठा साम्राज्याने तो किल्ला स्वराज्याच्या ताब्यात घेतला. (Madh Fort)

त्यानंतर १७७४ साली ब्रिटिशांनी सालसेट बेट, ठाणे किल्ला, वर्सोवा किल्ला आणि कारंजा बेटाचा किल्ला यांबरोबरच हा मढ इथला किल्लाही स्वतःच्या ताब्यात घेतला. आता इथे या किल्ल्याचे अवशेष पाहायला मिळतात. या किल्ल्याच्या भिंतींवरून फिरता येतं आणि आसपासचा नयनरम्य परिसर पाहता येतो. याव्यतिरिक्त मढ आयलँडवर साहसप्रेमी जेट स्कीइंग, पॅरासेलिंग, केळी बोट राईड्स आणि कायाकिंग सारख्या रोमांचक जलक्रीडांमध्ये सहभागी होऊ शकतात. (Madh Fort)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.