Reuse Green Tea Bag : वापरलेल्या ग्रीन टी बॅग टाकून देताय, थांबा…

ग्रीन टीमध्ये अनेक गुणकारी पोषक तत्त्वे

108
Reuse Green Tea Bag : वापरलेल्या ग्रीन टी बॅग टाकून देताय, थांबा...
Reuse Green Tea Bag : वापरलेल्या ग्रीन टी बॅग टाकून देताय, थांबा...

हल्ली ग्रीन टी बरेच जण पितात. ग्रीन टीमध्ये अँण्टीऑक्सिडंटस् भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे अनेक आजारांपासून वाचण्यासाठी मदत मिळते. यामुळे चयापचय क्रियाही सुधारायला मदत होते. याकरिता अनेक महिला चाळीशीनंतर महिलांनी ग्रीन टी आवर्जून पितात.पोटावरील चरबी कमी करण्यासाठी ग्रीन टी पिणाऱ्यांची संख्याही हल्ली जास्त आहे. ग्रीन टी तयार करण्यासाठी टी बॅग्ज वापरल्या जातात. बरेच जण पाण्यात बुडवून वापरलेल्या या बॅग्ज फेकून देतात. या बॅगेत अनेक गुणकारी तत्त्वे असतात. वापरून झालेल्या या टी बॅग्ज वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येऊ शकतात. त्यामुळे त्या फेकून देण्याऐवजी त्यांचा योग्य पद्धतीने पुनर्वापर करता येऊ शकतो.

(हेही वाचाZepto Job Call : एका व्हायरल झालेल्या ट्विटमुळे विद्यार्थ्याला कंपनीच्या मालकांनीच मुलाखतीसाठी थेट बोलावलं)

– ग्रीन टी बॅग वापरून फेकून देण्याएवजी त्या सुकवून ठेवा. या सुकवलेल्या टी बॅग्ज कपाटात ठेवा.यामुळे कपाटाच्या आतील भागांना आलेला ओलसरपणा दूर व्हायला मदत होईल.ओलाव्यामुळे कपाटात येणारा कुबट वासही निघून जातो.

-वापरून झालेल्या ग्रीन टी बॅग्ज कापून त्यातील चहा पावडर झाडांना, छोट्या रोपट्यांना घाला. रोप लावलेल्या मातीच्या कुंडीत मिसळा.यामुळे झाडांना पोषण मिळेल. तुमच्या बागेतील हिरवळ टिकून राहायला मदत होईल.

– ग्रीन टी तयार करून झाल्यानंतर त्या टी बॅग कडक उन्हात व्यवस्थित वाळवा. त्यानंतर एका बाऊलमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे फ्रिजमधून येणारा दुर्गंध दूर व्हायला मदत होईल.

-नॉनस्टिक भांड्यांचा चिकटपणा निघत नसेल तर ही भांडी स्वच्छ करण्यासाठी ग्रीन टी बॅग अशा भांड्यांमध्ये ठेवून त्यात पाणी घाला. हे भांडं रात्रभर तसेच ठेवा त्यानंतर सकाळी नॉनस्टिक भांड्याचा सर्व चिकटपणा निघून गेलेला असेल. तेलकट, चिकट नॉनस्टिक भांडी स्वच्छ करण्याची एक सोपी ट्रिक आहे.

– डोळ्यांखालील काळी वर्तुळे किंवा डोळ्यांखाली सूज येत असेल, तर दररोज वापरलेल्या ग्रीन टी बॅग्ज थंड करून डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांखालची सूज आणि काळी वर्तुळे यापासून सुटका व्हायला मदत होईल.

– घामामुळे शरीराला दुर्गंध येतो. यासाठी आंघोळीच्या पाण्यात वापरलेल्या ग्रीन टी बॅग्ज घाला. या पाण्यामुळे उत्साह वाढून घामाचा दुर्गंध दूर होईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.