Labrador Retriever : भारतात लॅब्रेडॉर रिट्रिव्हर पिल्लू किती रुपयांपासून मिळतं; जाणून घेऊया

Labrador Retriever : पिल्लाचे आई-वडील आणि त्याचं प्रजनन यावरून किंमत बदलते. 

32
Labrador Retriever : भारतात लॅब्रेडॉर रिट्रिव्हर पिल्लू किती रुपयांपासून मिळतं; जाणून घेऊया
  • ऋजुता लुकतुके

लॅब्रेडॉर रिट्रिव्हर हा जगभरात सर्वाधिक लोकप्रिय कुत्र्यांच्या जातींपैकी एक मानला जातो. त्यांचा सौम्य स्वभाव, बुद्धिमत्ता, खेळकरपणा आणि माणसांबरोबर जुळवून घेण्याचा स्वभाव यामुळे पाळीव प्राण्यांमध्ये त्यांना सर्वाधिक पसंती असते. भारतामध्ये लॅब्राडॉर रिट्रिव्हर पिल्लांची किंमत विविध घटकांवर अवलंबून बदलते आणि ती साधारणतः १५,००० ते ५०,००० रुपयांपर्यंत असते. काही वेळा ही किंमत १ लाख रुपयांच्या वरही जाऊ शकते. (Labrador Retriever)

(हेही वाचा – Bangladeshi Infiltrators : ऑपरेशन सिंदूरनंतर आता ‘पुश-बॅक’ ऑपरेशन सुरू; दिल्लीत पोलीस यंत्रणांची मोठी कारवाई)

किंमतीवर परिणाम करणारे मुख्य घटक जाणून घेऊया : 

वंशावळ आणि रक्तरेषा : केसीआय (Kennel Club of India) मध्ये नोंदणीकृत असलेल्या वंशावळीतून आलेल्या पिल्लांची किंमत सर्वाधिक असते. आहेत. जर पिल्लाचे आई-वडील किंवा पूर्वज चॅम्पियन शो डॉग्ज असतील, तर त्यांना ‘चॅम्पियन ब्लडलाईन’ म्हणतात आणि अशा पिल्लांची किंमत अगदी ५०,००० ते १,००,००० रुपयांपर्यंत असू शकते.

प्रजनकाची पत : प्रसिद्ध, अनुभवी आणि नैतिक पद्धतीने प्रजनन करणाऱ्या प्रजनकांकडून घेतलेली पिल्ले अधिक महाग असतात. हे प्रजनक पिल्लांचं आरोग्य, लसीकरण सामाजिक कौशल्य आणि योग्य आहारावर विशेष भर देतात.

पिल्लाची गुणवत्ता : अशा पिल्लांना शो-क्वालिटी लॅब्राडॉर म्हणतात. म्हणजे अशी पिल्लं जी या जातीच्या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त निकषांशी जुळतात – उंची, वजन, रंग, चालणे, डोळ्यांची ठेवण वगैरे. अशी पिल्लं प्रदर्शनात भाग घेऊ शकतात आणि त्यांची किंमत जास्त असते. पाळीव प्राणी म्हणून ठेवण्यासाठी असलेल्या ‘पेट क्वालिटी’ पिल्लांची किंमत तुलनेने कमी असते. (Labrador Retriever)

ठिकाण : शहरांनुसार किंमतीत फरक पडतो. उदाहरणार्थ, मुंबई, दिल्ली, बेंगळुरू या महानगरांमध्ये किंमती जास्त असतात कारण तिथे मागणी जास्त आणि जीवनमान महाग आहे.

रंग आणि उपलब्धता : लॅब्रेडॉर सहसा तीन मुख्य रंगांत मिळतात – काळा, सोनेरी/पिवळा आणि चॉकलेटी. चॉकलेट रंगाची पिल्लं क्वचित आढळतात आणि त्यामुळे त्यांची किंमत जास्त असते.

(हेही वाचा – Moto Razr 60 : मोटोरोला कंपनीचा नवीन फोल्डिंग फोन ४९,९९९ रुपयांमध्ये मिळणार)

शहर साधारण किंमत (रुपयांमध्ये)
बंगळुरू १५,००० ते ३२,०००
मुंबई १७,००० ते ६०,०००
कोलकाता १०,००० ते २८,०००
दिल्ली २०,००० ते ५४,०००
हैदराबाद १५,००० ते ४५,०००
चेन्नई २०,००० ते ५०,०००

 

(हेही वाचा – महत्त्वाच्या पालिकांसाठी महायुतीचा ‘नो रिस्क’ फॉर्म्युला; BJP स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम)

पाळीव प्राणी विकत घेताना काय काळजी घ्याची ते ही पाहूया : 
  • पिल्लं घेताना त्यांच्या आईवडिलांची माहिती मागवावी.
  • लसीकरण कार्ड आणि आरोग्य तपासणी अहवाल पहावा.
  • प्रजनकाने केसीआय प्रमाणपत्र दिले आहे का हे तपासावे.
  • पिल्लं किती सामाजिक आणि खेळकर आहेत हे पाहावे.
  • अनैतिक किंवा पपी मिल (puppy mill) प्रजनकांपासून पिल्लं घेणे टाळावे. (Labrador Retriever)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.