-
ऋजुता लुकतुके
केटीएम कंपनीने २०२५ ची सुरुवात अतिशय आक्रमकपणे केली आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच कंपनीने आपली ॲडव्हेंचर मालिका लाँच केली आहे. आता याच मालिकेत आणखी एक नवीन बाईक दाखल करण्याच्या तयारीत कंपनी आहे. ३९० एसएमसी आर ही गाडी आता भारतीय रस्त्यांवर धावताना लवकरच तुम्हाला दिसणार आहे. तिच्याबद्दल बाईक प्रेमींमध्ये उत्सुकता आधीच निर्माण झाली आहे. कारण, भारतीय रस्त्यांवर या बाईकची चाचणी सुरू असल्यामुळे ती लोकांच्या नजरेला नियमितपणे पडत आहे. ॲडव्हेंचर मालिकेतील एक दिसायला काहीशी छोटी त्यामुळे सुटसुटीत अशी तिची प्रतिमा आधीच तयार झाली आहे. (KTM 390 SMC R)
कंपनीच्या ३९० एन्ड्युरो बाईकप्रमाणे या बाईकचं डिझाईन असेल. म्हणजेच पॅनलवर कमीत कमी पसारा असेल. सीट मोटोक्रॉस पद्धतीची असेल. बाईकची चाकं १७ इंचांची अलॉड व्हील्स असतील. गाडीचं इंजिन एक सिलिंडर असलेलं पण, ३९९ सीसी क्षमतेचं मजबूत इंजिन असेल. यातून ४५.३ अश्वशक्ती इतकी ताकद निर्माण होऊ शकेल. (KTM 390 SMC R)
(हेही वाचा – हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही; Raj Thackeray यांची भूमिका)
The KTM 390 SMC R has been spotted testing in India again!
With the frequency of test mules increasing, it seems the India launch is getting closer. While the 390 SMC R shares its design and underpinnings with its hardcore off-road sibling, it brings a more road-biased setup to… pic.twitter.com/OOhyHFrG5c
— PowerDrift (@PowerDrift) April 4, 2025
२०२५ च्या मध्यावर ही बाईक भारतात अधिकृतपणे लाँच होईल. या बाईकची स्पर्धा असेल ती रॉयल एनफिल्डच्या हिमालयन ७५० या येऊ घातलेल्या बाईकशी तसंच बीएमडब्ल्यू जी ३१० जीएस या बाईकशी. या बाईकची किंमत ३.५० ते ४ लाख रुपयांच्या दरम्यान असेल. या बाईकचं वजन १५४ किलोंचं आहे आणि पेट्रोलची टाकी ९ लीटरची आहे. (KTM 390 SMC R)
बाईकमध्ये चालकाच्या समोर एकच टीएफटी प्रकारचा डिस्प्ले असेल आणि त्यात सर्व प्रकारचे कंट्रोल दिलेले असतील. बाईकचं डिझाईन अत्यंत सोपं आणि साधं असेल यावर कंपनीचा कटाक्ष आहे. ही बाईक केटीएमच्या एन्ड्युरो आणि ॲडव्हेंचर श्रेणीतील बाईकचं चांगलं मिश्रण आहे. त्यामुळे तिची किंमतही या दोहोंतील मधली असेल असा अंदाज आहे. त्यामुळे केटीएमच्या परवडणाऱ्या बाईकच्या श्रेणीतील ही एक बाईक असेल. ३.५ लाखांपासून या बाईकची किंमत सुरू होईल असा अंदाज आहे. (KTM 390 SMC R)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community