किवी हे फळ दररोज खाल्ल्याने त्यात असलेल्या समृद्ध पोषक तत्वांमुळे तुमच्या शरीराला अनेक फायदे होऊ शकतात. त्यांपैकीच काही महत्त्वाचे फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग पाहुयात… (kiwi fruit benefits)
(हेही वाचा – Durgadi Fort: दुर्गाडी किल्ल्याची संरक्षण भिंत कोसळली; शिवप्रेमीमध्ये नाराजी)
दररोज किवी खाण्याचे फायदे पुढीलप्रमाणे :
पोषक तत्वांनी समृद्ध :
किवीमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. विशेषतः व्हिटॅमिन सी हे हिरव्या किवीमध्ये, प्रति १०० ग्रॅममध्ये सुमारे ७१ मिलीग्राम एवढं असतं, याव्यतिरिक्त त्यांत व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, फोलेट आणि पोटॅशियमसुद्धा जडत प्रमाणात असतं. त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते, त्वचेचं आरोग्य सुधारतं आणि रक्त गोठण्याच्या समस्या नाहीश्या होतात. किवीमुळे शरीराला फायबरही मिळतं. म्हणून अन्नपचनास मदत मिळते आणि आतड्यांचं आरोग्य वाढतं.
रोगप्रतिकारक शक्तीची वाढ होते :
किवीमध्ये व्हिटॅमिन सी चं प्रमाण जास्त असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे कोणत्याही आजाराचं संक्रमण टाळण्यास आणि सर्दीची तीव्रता कमी करण्यास मदत मिळते.
चयापचय क्रिया सुधारते :
किवीमध्ये अॅक्टिनिडिन असतं. ते एक प्रकारचं एंजाइम असतं ज्यामुळे शरीराचं पचन सुधारतं. किवीमध्ये असलेलं फायबर नियमित मल विसर्जन व्यवस्थित होतं आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करतं.
हृदयाचं आरोग्य वाढवतं :
किवीमध्ये असलेले फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स हे रक्तदाब कमी करून शरीरातली कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांच्या कार्यात सुधारणा होते. त्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीचे आजार नाहीसे होतात. (kiwi fruit benefits)
(हेही वाचा – Maharana Pratap Jayanti : महाराणा प्रताप यांची जयंती कधी असते? जाणून घ्या राणाजींचे कोट्स!)
चांगली झोप मिळण्यास मदत होते :
एका संशोधनात असं समजलं आहे की, झोपेच्या एक तास आधी दोन किवी खाल्ल्याने त्यात असलेल्या सेरोटोनिन आणि अँटीऑक्सिडंट्समुळे झोपेची सुरुवात, कालावधी आणि गुणवत्ता सुधारू शकते.
त्वचेचं आरोग्य सुधारते :
किवीमध्ये असलेलं व्हिटॅमिन सी आणि ई हे कोलेजन उत्पादनास समर्थन देतात. तसंच ते ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करतात. त्यामुळे त्वचेची लवचिकता सुधारते आणि वृद्धत्वाची चिन्हे कमी होण्यास मदत मिळते.
रक्तातल्या अतिरिक्त साखरेचं नियमन करते :
किवीमुळे रक्तातल्या साखरेची जलद वाढ होत नाही. त्यात असलेल्या फायबरमुळे रक्तातल्या साखरेचं नियमन करण्यास मदत मिळते.
किवीमध्ये अँटीऑक्सिडंट पॉवर असते :
किवीमध्ये पॉलीफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जे ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळ यांचा सामना करतात. त्यामुळे कर्करोग किंवा हृदयरोगासारख्या दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो. (kiwi fruit benefits)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community