-
ऋजुता लुकतुके
अगदी तान्ह्या बाळांपासून ते शाळकरी मुलांपर्यंत, त्यांच्या वाढत्या वयात चप्पल किंवा बूटांच्या मापाचा अंदाज घेणं आई – वडिलांना नेहमीच कठीण जातं. वाढत्या वयाच्या नावाखाली कधी कधी खूपच मोठे बूट घेतले जातात. तर कधी एका आठवड्यात घेतलेली चप्पल किंवा बूट मुलांना लहान व्हायला लागतात. म्हणूनच लहान मुलांच्या बूटाची मापं आणि वाढीचं शास्त्र समजून घेऊया. (Kids Shoes)
लहान मुलांच्या पायाच्या मापाच्या एक माप वरचे बूट त्यांना घ्यावेत असं जाणकार सांगतात. याची दोन कारणं आहेत. एक तर मुलांचं माप वाढणारं असतं. दुसरं मुलांना चप्पल किंवा बूटांमुळे जखम होण्याची शक्यता कमी होते. अन्यथा नवीन बूट वापरताना सुरुवातीला बूट लागू शकतात. शास्त्राच्या मदतीने मुलांना किती कालावधीने नवीन बूट खरेदी करण्याची गरज पडेल हे सांगता येतं. त्यानुसार, दुकानातही अशी कोष्टकं लावलेली असतात. (Kids Shoes)
(हेही वाचा – Devendra Fadnavis and Raj Thackeray यांच्या भेटीनंतर संजय शिरसाट यांची खुली ऑफर !)
मूल नुकतं चालायला शिकलेलं असेल म्हणजे ते वय वर्ष १ ते ३ च्या दरम्यान असेल तर अशा मुलांच्या पायाचं माप दर २ ते ३ महिन्यांत अर्ध्या मापाने बदलतं. त्यामुळे ४ ते ६ महिन्यात अशा मुलाला नवीन चप्पल घेण्याची गरज भासू शकते. तर शिशू वर्गात जाणाऱ्या मुलांची शारीरिक वाढ झपाट्याने सुरू होते. अशावेळी वर्षातून तीनदा चपलेचं माप वाढू शकतं. किमान दोनदा तरी मुलांचं पायाचं माप बदलतं किंवा मोठं होतं. (Kids Shoes)
तुमच्या मुलाच्या पायाचा आकार मोजायचा असेल तर फूटवेअर दुकानात जाऊन तो मोजलेला जास्त बरा. तिथे मुलांसाठी खास उपकरण ठेवलेलं असतं. तिथे बायाच्या बोटापासून ते टाचेपर्यंत माप नीट घेता येतं. घरी आकार मोजायचा झाल्यास कागदावर मुलांच्या पायाचा आकार काढून घ्यावा. मग पायाच्या अंगठ्यापासून टाचेपर्यंतचं माप मोजावं. (Kids Shoes)
(हेही वाचा – Ertiga Price in Mumbai : मारुती इर्टिगाच्या किमतीत ‘या’ महिन्यात झाली इतकी वाढ)
तान्हं बाळ ते १२ वर्षांच्या मुलांची पायाची अंदाजे मापं ठरलेली आहेत. नुकतं जन्माला आलेलं बाळ ते ११ महिन्यांचं बाळ यांच्या पायाचं माप ० सी ते ४ सी पर्यंत असतं. पुढे वय वर्ष १ – ३ पर्यंत ४ सी ते ८ सी ही मापं मिळतात. चौथं वर्षं ते सहाव्या वर्षापर्यंत ९ सी ते १३ सी ही मापं मिळतात. तिथून पुढे म्हणजे सातव्या वर्षापासून १ वाय, २ वाय अशी मापं सुरू होतात. यातील सी हे अक्षर चाईल्डचं लघुरुप आहे. तर वाय हे अक्षर ईयरचं लघुरुप आहे. अनेकदा बाराव्या वर्षानंतर मुलांना मोठ्यांच्या चपला व्हायला सुरुवात होते. (Kids Shoes)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community