-
ऋजुता लुकतुके
कपिल शर्माने आता भारतात आघाडीचा कॉमेडियन म्हणून आपली जागा निश्चित केली आहे. सोनी टीव्हीवरील (Sony TV) कपिल शर्मा शोच्या यशानंतर आता नेटफ्लिक्सवर(Netflix) ‘द ग्रेट इंडियन कपिल शो,’ सादर करत तो जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे. त्या माध्यमातून त्याचा बँक बॅलन्सही चांगला फुगला आहे. सध्या ३०० कोटी रुपयांच्या मालमत्तेसह तो देशातील श्रीमंत कॉमेडियनपैकी एक आहे. २००७ मध्ये ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’चा तिसरा हंगाम त्याने गाजवला. तिथून मागे वळून पाहिलं नाही. (Kapil Sharma Net Worth)
कॉमेडी सर्कसचे काही शो गाजवल्यानंतर ‘स्टार या रॉकस्टार’ या रियालिटी शोमधून त्याने गायक म्हणूनही स्वत:ला सिद्ध केलं. स्टँडअप कॉमेडियन, कॉमेडियन, अभिनेता, गायक आणि निर्माता अशा वेगवेगळ्या भूमिकांत तो यशस्वी झाला आहे. बॉलिवूडमध्ये तीन हिंदी सिनेमांतही त्याने नशीब आजमावलं आहे. इंडियाटाईम्स वेबसाईटने सुरुवातीला एकदा कपिल शर्मावर बातमी केली होती, तेव्हा एका एपिसोडसाठी तो ५० लाख रुपयांचं मानधन घेत असल्याचं म्हटलं होतं. पण, आता प्रसिद्धी वाढल्यानंतर तो एका एपिसोडसाठी चक्क ५ कोटी रुपये घेत असल्याचं समजतंय. (Kapil Sharma Net Worth)
(हेही वाचा – Neurologist : न्यूरोलॉजी म्हणजे काय? मज्जासंस्थेच्या विकारावर कसे केले जातात उपचार?)
त्याची पहिली मिळकत ५०० रुपयांची होती. तिथपासून कपिल शर्माने (Kapil Sharma) ही मजल मारली आहे. त्याला आलिशान जीवनशैली आणि वेगवान गाड्यांचं वेड आहे. त्यामुळे मुंबईत त्याने १५ कोटी रुपयांचं एक वेगळ्या धाटणीचं घर विकत घेतलं आहे. शिवाय मुंबईबाहेर २५ कोटींचं एक फार्महाऊसही आहे. हे ठिकाण त्याचं आवडतं आहे. तर पंजाबमध्येही त्याने स्थावर मालमत्तेत मोठी गुंतवणूक केली आहे.
रेंजरोव्हर इव्होक (Range Rover Evoque) ही त्याची आवडती कार आहे. मर्सिडिझ बेंझ एस३५०, वोल्वो एक्ससी९० या त्याच्या लाडक्या गाड्या आहेत. तर त्याने स्वत:साठी साडेपाच कोटी रुपये खर्चून व्हॅनिटी व्हॅन तयार करून घेतली आहे. होंडा मोबिलो, मायक्रोमॅक्स आणि एचडीएफसी बँक असा जाहिरातींचा तो ब्रँड अँबेसिडर आहे. (Kapil Sharma Net Worth)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community