
मुंबईतल्या जोगेश्वरी इथल्या लेण्या या हिंदूंनी बांधलेल्या सर्वात जुन्या दगडी मंदिरांपैकी एक आहेत. इतिहासकारांचा असा विश्वास आहे की, इ.स. ५०० साली वाकाटक राजा हरिसेनाच्या मृत्यूनंतरही अजिंठा लेण्यांमध्ये बरंच बांधकाम केलं गेलं होतं. अजिंठा इथल्या अनेक कारागीरांनी आपलं कौशल्य इतरत्र वापरता यावं असा विचार करून आपल्या कौशल्याने या लेण्या तयार केल्या.
असंही म्हटलं जातं की, त्या करागिरांमधले काही जण पश्चिमेकडच्या आधुनिक मध्य प्रदेशातल्या हिंदू संस्कृती असलेल्या राज्यात वास्तव्याला गेले असतील. म्हणूनच त्यानंतर त्यांनी जोगेश्वरी इथे या लेण्या तयार केल्या असतील. या लेण्यांमध्ये एकूण दहा गुहा आहेत. जोगेश्वरी इथल्या लेण्या या प्रदेशातल्या सर्वांत जुन्या हिंदू संस्कृतीच्या वारसदार असलेल्या गुहांपैकी एक आहेत. (Jogeshwari Caves)
(हेही वाचा – BMC : वरळीतील लाईट हॉटेल कॅफेच्या परिसरातील अनधिकृत बांधकामावर हातोडा)
१९०९ साली ब्रिटिश सरकारने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत या लेण्यांना वारसा स्थळ म्हणून घोषित केलं. नंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने ते महत्वाचं राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं. सध्या ते ASI द्वारे संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं गेलं आहे.
जरी या लेण्यांना राष्ट्रीय स्थळ म्हणून घोषित केलं गेलं असलं तरी, या १४०० वर्ष जुन्या गुहा संकुलाचे प्रत्यक्षात संरक्षण करण्यासाठी फारसं काम करण्यात आलेलं नाही. भारतातल्या संरक्षित स्मारकांमध्ये सामान्यतः १०० मीटरच्या आसपास प्रवेश निषिद्ध करण्यात येतो. जेणेकरून या संरचनेवर कोणतेही अतिक्रमण होऊ शकत नाही. पण या लेण्यांच्या बाबतीत असं काहीही नव्हतं. (Jogeshwari Caves)
इथल्या स्थानिक रहिवाशांच्या जमिनी आणि घर साफ होईपर्यंत या भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होते. पण आजसुद्धा या घरांचे ढिगारे अजूनही तसेच पडलेले आहेत आणि ते या ऐतिहासिक स्थळासाठी एक मोठा धोका ठरू शकतात.
माणसांना आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी दररोज करावा लागणारा संघर्ष आणि घरांची कमतरता पाहता, जुन्या इमारतींचे जमिनीचे मोठे तुकडे हे आजूबाजूला राहणाऱ्या समुदायांसाठी एक अडथळा आणि त्रासदायक म्हणून पाहिले जातात. म्हणूनच या राष्ट्रीय स्थळाचं संगोपन करण्यासाठी प्रयत्न करण्यात अपयश हे केवळ ASI चं नाही तर या स्थळाचे प्रमुख भागधारक असलेल्या स्थानिक समुदायांच्याही जबाबदारीच्या अभावाचं प्रतिबिंब आहे.
(हेही वाचा – Terrorist : पाकड्यांना भारताच्या सैनिकी कारवाईची भीती; बिळात जाऊन लपले दहशतवादी)
या गुहांमधली बहुतेक कोरीवकामं आणि शिल्पं नष्ट झाली असली तरी, या लेण्यांमध्ये नाजूकपणे कोरलेल्या आणि चित्रित केलेल्या शैव पंथाच्या काही पौराणिक कथा अजूनही पर्यटकांच्या नजरेत भरतात. या लेण्यांमध्ये हनुमान, महादेव, गणपती आणि जोगेश्वरी देवी (jogeshwari devi) यांची मंदिरं आहेत. अनेक भक्तगण पूजेसाठी नियमितपणे या लेण्यांना भेट देत राहतात.
जोगेश्वरी लेणी (Jogeshwari Caves) ही मुंबईतल्या सर्वांत नाजूक पुरातत्वीय स्थळांपैकी एक मानली जातात. पण मुंबईच्या शहरी विकासाने या लेण्यांना पूर्णपणे वेढलेलं आहे. एवढंच नाही तर या लेण्यांना टिकवून ठेवणं देखील अत्यंत कठीण केलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community