जीवधन किल्ल्याचा आढावा
जीवधन किल्ला (jivdhan fort) ट्रेक आणि वानरलिंगी व्हॅली क्रॉसिंग हा रॅपलिंगसोबतच महाराष्ट्रातला सर्वांत कठीण पण सुरक्षित आणि साहसी ट्रेकपैकी एक आहे. महाराष्ट्रातल्या सह्याद्री पर्वतरांगेमधील जीवधन आणि वानरलिंगी हे व्हॅली क्रॉसिंग आणि रॅपलिंगसाठी रोमांचक संधी देतात.
इथल्या खडकाळ भूप्रदेशामुळे ही ठिकाणं ट्रेकचा थ्रिल शोधणाऱ्यांसाठी परिपूर्ण आहेत. तुम्ही अनुभवी असाल किंवा नवशिक्या असाल तरीही या रोमांचक व्हॅली क्रॉसिंगचा अनुभव हा, दोरीने लटकून खडकाळ दऱ्या पार करताना दिसणारी चित्तथरारक दृश्ये आणि थ्रिल अनुभवण्याची अतुलनीय भावना देतो. याव्यतिरिक्त जीवधन (jivdhan fort) आणि वानरलिंगीच्या उंच कड्यांच्यामधून रॅपलिंग करताना तुम्हाला तुमच्या कौशल्याची आणि धैर्याची चाचणी घेण्याची आणि रोमहर्षक नैसर्गिक दृश्य पाहण्याची संधी मिळते.
(हेही वाचा – Pakistan Train Hijack : २० सैनिकांची हत्या, १६ दहशतवादी ठार, १०४ ओलिसांची सुटका)
जीवधन इथे ट्रेकिंग करताना कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत?
उच्च दर्जाची सुरक्षा उपकरणं आणि आपल्या टीमसोबत प्रोटोकॉल पाळणं.
ट्रेकसाठी जाताना सोबत आणायच्या वस्तू
- ओळखपत्र
- चांगल्या ग्रीपचे शूज आणि फ्लोटर्सची अतिरिक्त जोडी
- पाणी (किमान २ लिटर) अनिवार्य
- कपड्यांची अतिरिक्त जोड
- तुमच्या फोनची बॅटरी पूर्णपणे चार्ज ठेवा
- डास प्रतिबंधक
- छोट्या भुकेसाठी बिस्किटे, प्लम केक इत्यादीसारखे तयार अन्नपदार्थ.
- तुमची औषधं, ग्लुकोन डी/इलेक्ट्रोल/एनर्झिल पावडर इत्यादी.
- सर्व वस्तू ठेवण्यासाठी एक हॅवर्सबॅक. ट्रेकिंग करताना तुमचे हात मोकळे असले पाहिजेत.
- सर्वांत महत्त्वाचं म्हणजे भरपूर उत्साह आणि टीम स्पिरिट असायला हवा.
(हेही वाचा – दुसरी लता मंगेशकर, Shreya Ghoshal चा जन्मदिन; जाणून घेऊया तिचा जीवन परिचय)
ट्रेनने :
जीवधन किल्ल्यापासून (jivdhan fort) सर्वांत जवळ असलेलं रेल्वे स्थानक पुणे हे आहे. मुंबईहून पुण्यापर्यंत ट्रेनने जाता येतं. त्यानंतर पुणे स्थानकावरून घाटघर नावाच्या पायथ्याजवळच्या गावाला जाण्यासाठी कॅब भाड्याने घेता येते किंवा बसनेही जाता येतं.
बसने :
मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी थेट बसेसही उपलब्ध आहेत. त्यानंतर पुण्याहून दुसरी बस किंवा भाड्याने टॅक्सी घेऊन घाटघर येथे जाता येतं.
खाजगी वाहनाने :
मुंबईहून थेट घाटघर येथे खाजगी वाहनाने जाता येतं. मुंबई ते घाटघरपर्यंतचं अंतर अंदाजे १६५ किलोमीटर एवढं आहे. राष्ट्रीय महामार्ग ४८ आणि राष्ट्रीय महामार्ग ६० मार्गे जाण्यासाठी सुमारे ४ तास एवढा वेळ लागतो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community