-
ऋजुता लुकतुके
एकूणच देशातील पोलाद उत्पादक कंपन्या सध्या अनिश्चिततेतून जात आहेत. जागतिक स्तरावर अमेरिकेकडून वाढत्या आयात शुल्काची भीती आणि देशांतर्गत उत्पादनावर होत असलेला प्रतिकूल परिणाम अशा आवर्तनातून हे क्षेत्र जात आहे. त्यामुळे आघाडीची जिंदाल स्टील अँड पॉवर कंपनीचा शेअर बघितलात तर एका आठवड्यात ४ टक्क्यांची घसरण आणि शेवटच्या एका दिवसांत त्यात ६ अंशांची उसळी असं दोलायमान वातावरण आहे. (Jindal Steel Share Price)
कंपनीचा अलीकडेच निफ्टी ५० मध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे या कंपनीची कामगिरी अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरते. या क्षेत्राच्या बाबतीत वाईट म्हणजे जगभरात पोलादाच्या किमतीत आणि मागणीतही मोठा उतार चढाव आहे. तेच शेअरच्या कामगिरीतही त्यामुळे प्रतित होत आहे. सध्या शुक्रवारी बाजार बंद होताना हा शेअर ८५८ रुपयांवर स्थिरावला आहे. (Jindal Steel Share Price)
(हेही वाचा – Firecrackers Ban : मुंबईत फटाके-रॉकेट विक्रीवर बंदी; नेमकी काय कारण? वाचा )
कंपनीचा वार्षिक ताळेबंद पाहिला तर महसूलाच्या बाबतीत कंपनीने मार्च २०२४ च्या तुलनेत मार्च २०२५ मध्ये महसूलात ३०० कोटी रुपयांची घट नोंदवली आहे. यामधल्या ९ महिन्यांत महसूल सतत वर खाली राहिला आहे. मार्च २०२५ मध्ये कंपनीने २९४ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. त्यामुळे या शेअरचं ईपीएस गुणोत्तर उणे ३.३५ रुपयांपर्यंत खाली घसरलं आहे. (Jindal Steel Share Price)
जिंदाल स्टील कंपनीच्या कामगिरीतील हे उतार चढाव नजीकच्या काळात थांबण्याची चिन्हं नाहीत. कारण, जागतिक स्तरावर धातू आणि खनिजांच्या उत्पादनातील अनिश्चितता वाढणार आहे. विशेष म्हणजे कंपनीची विक्री वाढूनही यंदा कंपनीला २९४ कोटींचा तोटा झाला. म्हणजे खर्चाचं गणित त्यांना बसवता आलेलं नाही. (Jindal Steel Share Price)
(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. गुंतवणूकदारांनी स्वत:च्या जोखमीवर गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी अथवा विक्रीचा कुठलाही सल्ला देत नाही.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community