IREDA Share Price : आयआरईडीएचा शेअर महिनाभरात २८ टक्क्यांनी वर; ही उसळी कायम राहील का?

IREDA Share Price : तिमाही निकालातील चांगल्या कामगिरीची मदत शेअरला झाली आहे.

73
IREDA Share Price : आयआरईडीएचा शेअर महिनाभरात २८ टक्क्यांनी वर; ही उसळी कायम राहील का?
  • ऋजुता लुकतुके

इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी या सरकारी कंपनीच्या शेअरनी या महिन्यात जोरदार उसळी घेतली आहे. गुरुवारी कंपनीचे आर्थिक वर्ष २०२४च्या शेवटच्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले. यात जानेवारी ते मार्च २०२४ या कालावधीत कंपनीने गेल्या वर्षीच्या कालावधीत ४८ टक्के जास्त नफा कमावल्याचं स्पष्ट झालं. आधीच्या वर्षी शेवटच्या तिमाहीत कंपनीचा नफा ३३७ कोटी रुपये इतका होता. तो आता थेट ५०१.५५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या बातमीनंतर बुधवारी कंपनीचा शेअरही एकाच दिवशी ५ टक्क्यांनी वर आला. (IREDA Share Price)

कंपनीचा या तिमाहीतील महसूलही १,९०५ कोटींवर पोहोचला आहे. म्हणजेच महसूलातही ३६ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीने दिलेल्या कर्जांमध्येही या तिमाहीत २८ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यानंतर या आठवड्यातील शेवटच्या दिवशी म्हणजे गुरुवारी आयआरईडीएचा शेअर नफारुपी विक्रीमुळे जवळ जवळ पावणे दोन टक्क्यांनी खाली आला. ३ अंशांच्या घसरणीसह हा शेअर १७३.२३ वर बंद झाला. (IREDA Share Price)

(हेही वाचा – NBCC Share Price : पुनर्विकास प्रकल्पांच्या घोषणेनंतर एनबीसीसी कंपनीचा शेअर तेजीत)

New Project 2025 04 19T192128.239

आयआरईडीए ही सरकारी नवरत्न कंपनी आहे. आणि नवऊर्जा व पर्यावरणपूरक ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीत ही कंपनी येते. सरकारची या कंपनीतील हिस्सेदारी ७५ टक्के इतकी आहे. पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांना ही कंपनी वित्त पुरवठा करते. प्रकल्प उभारणी आणि उभारणीनंतर लागणारी सामुग्री यांच्या निर्मितीत ही कंपनी आर्थिक मदत करते. अलीकडेच कंपनीने या क्षेत्रासाठीचा वित्त पुरवठा करण्याची मर्यादा ५,००० कोटींनी वाढवून २९,००० कोटी रुपयांवर नेली आहे. याचा परिणाम कंपनीच्या कामगिरीवर दिसून येत आहे. (IREDA Share Price)

आयआरईडीएच्या शेअरमध्ये गेल्या ५ ते ६ महिन्यांत तब्बल २० टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे आता शेअरमध्ये आलेली तेजी कितपत टिकणारी असेल हा प्रश्नच आहे. पण, बाजारातील जाणकार मंडळी या शेअरबद्दल आशावादी आहेत. जिओजित फायनान्शिअलने या शेअरला खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. येत्या वर्षभरात शेअर २०० ते २२० पर्यंत जाईल असा त्यांचा अंदाज आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी भारताने ठेवलेलं उद्दिष्टं अजून खूप लांब आहे. त्या दृष्टीने प्रगती करण्यासाठी पर्यावरणपूरक ऊर्जा प्रकल्पांमधील गुंतवणूक वाढवावी लागणार आहे. तेच या कंपनीचं काम आहे. (IREDA Share Price)

(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर यात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट कुठल्याही शेअरमध्ये खरेदी – विक्रीचा सल्ला देत नाही.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.