-
ऋजुता लुकतुके
आयआरबी इन्फ्रा हा पायाभूत सुविधा उभारणी क्षेत्रातील एकेकाळी शेअर बाजार गाजवलेला शेअर आहे. पण, सध्या बाजारातील कामगिरी पाहिली, तर त्याची रया गेलेली दिसेल. मराठी उद्योजक विरेंद्र म्हैसकर यांनी १९९८ मध्ये या कंपनीची स्थापना केली. ‘बांधा आणि हस्तांतरित करा,’ या तत्त्वावर मोठमोठे रस्ते उभारणी प्रकल्प उभे करून ते सरकारला हस्तांतरित करण्याचं काम ही कंपनी करते. (IRB Infra Share Price)
अगदी मुंबई – पुणे एक्स्प्रेस हायवे, मुंबई – अहमदाबाद रस्ता अशी कामं या कंपनीने केली आहेत. पण, मागच्या वर्षभरातील शेअर बाजारातील कामगिरी पाहिली, तर हा शेअर तब्बल ३५ टक्क्यांनी पडला आहे. आताही वार्षिक उच्चांक ७८.१५ पासून हा शेअर दूरच आहे. सध्या आठवड्याभरात २.६३ टक्क्यांच्या घसरणीसह हा शेअर शुक्रवारी ४५.५० रुपयांवर बंद झाला आहे. (IRB Infra Share Price)
(हेही वाचा – Bata India Share Price : बाटा इंडियाच्या शेअरमध्ये सहा महिने घसरण का होतेय?)
आणि जाणकारांचीही या शेअरबद्दलची मतं सध्या तरी फारशी आश्वासक नाहीत. शेअर बाजार गुंतवणूक तज्ञ शरण लिलेन यांनी गुंतवणूकदारांना आयआरबी इन्फ्रापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. जोपर्यंत शेअर ५० रुपयांच्यावर स्थिरावत नाही, तोपर्यंत या शेअरमध्ये वरची हालचाल दिसणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. ‘लोअर हाय, लोअर बॉटम,’ अशी या शेअरची सध्याची स्थिती असल्याचं वर्णन त्यांनी केलं आहे. (IRB Infra Share Price)
म्हणजेच, शेअर आणखी खाली जाऊ शकतो असाच त्यांचा अंदाज आहे. शिवाय कंपनीला नवीन एखादा प्रकल्पही इतक्यात मिळालेला नाही. कोकणातील सिंधुदुर्ग इथं ग्रीनफिल्ड विमानतळ ही कंपनी उभारणार आहे. याशिवाय इतर कुठलीही मोठी बातमी कंपनीकडून सध्या मिळालेली नाही. (IRB Infra Share Price)
(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. तेव्हा गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर यात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरमध्ये खरेदी अथवा विक्रीचा कुठलाही सल्ला देत नाही.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community