आयपीएस अधिकाऱ्यांचा सुरुवातीचा मासिक पगार हा ₹५६,१०० असतो. हा पगार प्रवास भत्ता, महागाई भत्ता आणि निवास भत्ता वगळून देण्यात येतो. सर्व भत्ते धरून पगाराची रक्कम ₹२,२५,००० पर्यंत पोहोचू शकते. एका आयपीएस अधिकाऱ्याचा सुरुवातीचा पगार हा ₹५६,००० एवढा असला तरी अधिकारी जसजसे पदोन्नती करून वरिष्ठ होतात तसतसा त्यांचा पगार जास्तीत जास्त ₹२,२५,००० एवढ्या रकमेपर्यंत पोहोचू शकतो.
आयपीएस अधिकाऱ्याचा एका महिन्याचा मूळ पगार ₹६४,००० असतो, त्यांपैकी अधिकाऱ्याला दरमहा सुमारे ₹५४,००० एवढी रक्कम इन-हँड भरपाई म्हणून दिली जाते. नवीन वेतन रचनेमध्ये नागरी सेवा वेतन प्रणाली रद्द करण्यात आली आहे. त्याजागी वेतन पातळी एकत्रित करणारी नवीन वेतन रचना तयार करण्यात आली आहे. त्यानुसार खाली आयपीएस पगार घटक आणि आयपीएस पगाराचा दार महिन्याचा तपशील दिला आहे. (ips officer salary)
(हेही वाचा – Maharana Pratap Jayanti : महाराणा प्रताप यांची जयंती कधी असते? जाणून घ्या राणाजींचे कोट्स!)
- ग्रेड वेतन – ₹०
- पे बँड – ₹५६,१००
- घरभाडे भत्ता – ₹४,०००
- वाहतूक भत्ता – ₹३,०००
- महागाई भत्ता – ₹१,०००
- आयपीएस अधिकाऱ्याचा इन-हँड पगार – ₹५४,००० (अंदाजे)
- एकूण पगार – ₹६४,०००
- वजावट – ₹१०,००० (अंदाजे) (ips officer salary)
(हेही वाचा – Durgadi Fort: दुर्गाडी किल्ल्याची संरक्षण भिंत कोसळली; शिवप्रेमींमध्ये नाराजी)
७ व्या वेतन आयोगानुसार आयपीएस अधिकाऱ्याचा पगार
७ व्या वेतन आयोगानुसार १० व्या वेतन मॅट्रिक्स स्तरावर प्रशिक्षण टप्प्यामध्ये आयपीएस अधिकाऱ्याचा एकूण पगार हा सुमारे ₹५५,००० किंवा त्यापेक्षाही जास्त आहे. यूपीएससीच्या सूचनांप्रमाणे आयपीएस अधिकाऱ्याचं प्रशिक्षण सुरू होतं आणि नियुक्तीच्या दिवशी आयपीएस अधिकाऱ्याचा पगार सुरू होतो.
नियुक्तीच्या वेळी आयपीएस अधिकाऱ्याला ज्युनियर स्केल म्हणजेच वेतन पातळी १० वर ठेवलं जातं. आयपीएस अधिकाऱ्याचा पगार हा त्याला नियुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळा असू शकतो. (ips officer salary)
(हेही वाचा – kiwi fruit benefits : किवी फळ खाल्ल्याने शरीराला मिळतात अद्भुत फायदे; अनेक रोगांवर करता येते मात)
आयपीएस अधिकारी होण्याचे फायदे
घरभाडे भत्ता (एचआरए) : आयपीएस अधिकाऱ्याला कमी किमतीत भाडेमुक्त घर देण्यात येतं. हे घर म्हणजे सामान्यतः किंगसाईज बेडरूम आणि सर्व सुविधांसह सुसज्ज असलेला बंगला असतो.
महागाई भत्ता : महागाई निर्देशांकाच्या आधारावर दर सहा महिन्यांनी म्हणजेच प्रत्येक वर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये समायोजित केलेल्या देयकाचा एक भाग महागाई भत्ता (डीए) म्हणून दिला जातो.
कार्यालयीन वाहने : प्रत्येक अधिकाऱ्याला एक ते तीन कार्स आणि एक ड्रायव्हर दिला जातो.
सुरक्षा : प्रत्येक अधिकाऱ्याला तीन गृहरक्षक आणि दोन अंगरक्षक संरक्षण प्रदान करण्यासाठी दिले जातात.
विजेचं बिल : आयपीएस अधिकाऱ्यांसाठी वीजपुरवठा एकतर पूर्णपणे मोफत असतो किंवा त्यांच्या अधिकृत निवासस्थानासाठी लक्षणीयरीत्या अनुदानित केलेला असतो.
फोन बिल : आयपीएस अधिकाऱ्यांना तीन बीएसएनएल सिम कार्ड तसंच मोफत टॉकटाइम, एसएमएस आणि इंटरनेटसह घरासाठी लँडलाइन दिली जाते.
प्रवास भत्ता : आयपीएस अधिकाऱ्यांना अनेक राज्यांमध्ये त्यांच्या अधिकृत आणि कॅज्युअल ट्रिपसाठी, सर्किट होम, सरकारी बंगले किंवा विश्रामगृहांमध्ये सवलतीच्या दरात राहण्याची सोय मिळते.
घरगुती कर्मचारी : आयपीएस अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकृत निवासस्थानात किंवा सेवा निवासस्थानात त्यांची दैनंदिन कामं करण्यासाठी खाजगी घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही सोय असते. (ips officer salary)
अभ्यासासाठी रजा : नऊ वर्षांच्या सेवेनंतर आयपीएस अधिकारी २ ते ४ वर्षांसाठी अभ्यास करण्याकरीता रजा घेण्यास पात्र असतात. तसंच त्यांना परदेशात जाऊन अभ्यास करण्याची परवानगी देखील असते.
इतर फायदे : अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमांची मोफत तिकिटे देखील दिली जातात. त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या जिल्हा किंवा झोनमधल्या सर्व महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये ते उपस्थित राहू शकतात. ज्यांत पार्ट्या, संगीत कार्यक्रम, क्रिकेटचे सामने आणि इतर उपक्रमांचा समावेश आहे.
निवृत्तीनंतरचे फायदे : आयपीएस अधिकारी आजीवन पेन्शन आणि इतर फायदे मिळविण्यास पात्र आहेत. अचानक मृत्यू झाल्यास, तेच फायदे त्यांच्या पत्नींला दिले जातात. इतर फायद्यांमध्ये रजेचे रोखीकरण, सीजीएचएस वैद्यकीय सुविधा आणि ग्रॅच्युइटी यांचाही समावेश आहे. (ips officer salary)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community