मायग्रेनपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही एखाद्या शांत आणि मंद प्रकाश असलेल्या खोलीमध्ये आराम करु शकता. याव्यतिरिक्त तुमच्या डोक्यावर किंवा मानेवर कोल्ड कॉम्प्रेस लावू शकता आणि आयबुप्रोफेन किंवा नेप्रोक्सेन यांसारख्या ओव्हर-द-काउंटर पेन किलर्सचा विचार करु शकता. एवढं करुनही जर तुमच्या वेदना कायम राहिल्या किंवा तीव्र असतील, तर कोणते उपचार करावे यांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. (migraine)
(हेही वाचा – Air India Plane Crash : एअर इंडिया मोठ्या विमानांचा वापर १५ टक्क्यांनी कमी करणार)
मायग्रेन (migraine) घालवण्यासाठी काही घरगुती उपाय :
- विश्रांती घ्या : विश्रांतीसाठी शांत आणि मंद प्रकाश असलेल्या जागी किंवा खोलीमध्ये बसा.
- कोल्ड कॉम्प्रेस वापरा : तुमच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावण्यासाठी आणि वेदना कमी होण्यासाठी तुमच्या कपाळावर किंवा मानेवर १० ते १५ मिनिटं कोल्ड कॉम्प्रेस म्हणजेच बर्फाचा पॅक किंवा थंड पाण्यात भिजवलेला एक टॉवेल लावा.
- हायड्रेटेड राहा : भरपूर पाणी प्या. कारण डिहायड्रेशन हे मायग्रेनला कारणीभूत ठरू शकतं. म्हणून स्वतःला नेहमी हायड्रेटेड ठेवा.
- कॅफिनचं वापर करू शकता : कमी प्रमाणात घेतलेलं हे कॅफिन मायग्रेनच्या वेदना कमी करण्यासाठी आणि पेन किलर्सचा प्रभाव वाढविण्यास मदत करू शकतं.
- शांत झोप घ्या : अनेक लोकांमध्ये असं दिसून आलं आहे की, शांत झोप घेतली तर मायग्रेनचं दुखणं कमी होऊ शकतं.
- मालिश करा : सौम्य मालिश केल्याने तणाव आणि वेदना कमी करण्यास नक्कीच मदत होऊ शकते.
- योग आणि व्यायाम करा : योग किंवा व्यायामामुळे तणाव कमी होण्यास मदत मिळू शकते. तणाव हा मायग्रेनला कारणीभूत ठरू शकतो.
- मॅग्नेशियमसमृद्ध आहार घ्या : मॅग्नेशियमची कमतरता ही मायग्रेनला कारणीभूत ठरू शकते. म्हणून मॅग्नेशियम असलेले पदार्थ जसं की, काजू, हिरव्या पालेभाज्या आणि कडधान्य यांचा आहारात समावेश करा.
- व्हिटॅमिन बी२ : व्हिटॅमिन बी२ हे शरीरात पुरेश्या प्रमाणात असेल तर पुनःपुन्हा होणारा मायग्रेनचा (migraine) त्रास कमी होऊ शकतो.
- विशिष्ट तेले : पेपरमिंट किंवा लैव्हेंडर सारखी काही विशिष्ट तेले ही मायग्रेनच्या वेदना आणि तणाव कमी करण्यास मदत करू शकतात. (migraine)
(हेही वाचा – High Protein Vegan Foods : कोणत्या शाकाहारी अन्नात सर्वात जास्त प्रथिने असतात ?)
मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी तुमच्या जीवन शैलीमध्ये कोणते बदल करायला हवेत?
- काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्याने, ताण किंवा झोपेचा अभाव यांसारखी कारणं मायग्रेनला कारणीभूत ठरतात. तुम्हाला कोणत्या कारणांमुळे मायग्रेनचा (migraine) त्रास होतो ते ओळखण्यासाठी तुम्ही एक डायरी तयार करून त्या नोंदी करून ठेऊ शकता. तुम्ही डायरीत केलेल्या नोंदीनुसार स्वतःची काळजी घेऊ शकता.
- ताण-तणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी प्राणायाम, योग किंवा ध्यान करणं यांसारख्या गोष्टींचा सराव करा.
- नियमितपणे झोपण्याचं आणि वेळेत उठण्याचं एक वेळापत्रक तयार करा. कारण तुम्ही तुमच्या झोपेच्या आणि उठण्याच्या वेळेत सातत्य राखल्यामुळे मायग्रेनची (migraine) समस्या टाळता येऊ शकते.
- तुमच्या आहाराच्या वेळा नियमित ठेवा. जेवण करणं वगळणं किंवा अनियमित वेळेत जेवण करणं हे मायग्रेचा त्रास होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं.
- डिहायड्रेशनमुळे मायग्रेन वाढू शकते. म्हणून भरपूर पाणी प्या आणि स्वतःला हायड्रेटेड ठेवा.
- काही लोकांना अल्कोहोल, जुने चीज, कोल्ड स्टोअरेज केलेलं मांस आणि काही इतर पदार्थ खाल्यामुळे मायग्रेनची समस्या होऊ शकते. त्यामुळे असे पदार्थ खाण्याचे टाळा.
- जर तुम्हांला मायग्रेनचा (migraine) त्रास तीव्र आणि वारंवार होत असेल किंवा घरगुती उपचारांमुळे काही फरक पडत नसेल तर त्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. (migraine)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community