Health Tips : आहारात मिठाचा वापर जास्त करता का? ‘डब्ल्यूएचओ’ने दिला सल्ला

117
Health Tips : आहारात मिठाचा वापर जास्त करता का? 'डब्ल्यूएचओ'ने दिला सल्ला
Health Tips : आहारात मिठाचा वापर जास्त करता का? 'डब्ल्यूएचओ'ने दिला सल्ला

दिवसभरातील आहारात मिठाचा समावेश किती प्रमाणात करणे आवश्यक आहे, याविषयी जागतिक आरोग्य संघटनेने माहिती दिली आहे. शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने विचार करता आहारात मिठाचे प्रमाण जास्त असेल, तर ते आजारांचे कारण ठरू शकते. जाणून घेऊया, आहारात मिठाचा समावेश जास्त प्रमाणात केला, तर शरीरावर कोणते परिणाम होऊ शकतात.

शरीरात मिठाचे प्रमाण जास्त असेल, तर अवयवांवर परिणाम होतो. मिठाचा आरोग्यावर थेट परिणाम होतो. मिठामध्ये सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. आहारात सोडियम जास्त प्रमाणात घेतल्यास रक्तदाब वाढू शकतो. यामुळे स्ट्रोक किंवा ह्रदयविकाराचा धोका असू शकतो.

  • जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होतो, ज्यामुळे हाडे कमी वयातच कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे आहारात मीठाचे प्रमाण कमी असावे.
  • जेवणात मीठ जास्त प्रमाणात घालण्याचीही काही जणांना सवय असते. असे केल्याने जेवणाची चव वाढतेय, असे वाटत असले तरी शरीर फुगलेले दिसते. जास्त मीठ खाल्ल्याने पोटाच्या कर्करोगाच्या आजाराचा धोकाही वाढतो.
  • बाहेर विकत मिळणाऱ्या चिप्समध्येही मिठाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त असते. बटाटा चिप्समध्ये १७० मिलिग्रॅम सोडियम असते. जे शरीराच्या गरजेपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. त्यामुळे पॅकेट फूड शक्यतो टाळावे.

(हेही वाचा – Ganeshotsav 2023 : नागपूर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारला स्वयंचलित देखावा, वीर सावरकर यांना वाहिली आदरांजली)

एका दिवसांत किती मीठ खावे?

दररोज ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. प्रत्येक जेवणात फक्त एक छोटा चमचा मीठ असावे. यापेक्षा जास्त मीठ सेवन करणे आरोग्यासाठी हितकर नसते. बहुतेकांना प्रत्येक पदार्थासोबत मीठ घेण्याची सवय असते. ही सवयही आरोग्यासाठी घातक असल्याने ती टाळावी.

प्रोसेस फूड आणि रेडी टू इट खाणे टाळा…

रेडी टू इट पदार्थांमध्येही मिठाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळा. प्रक्रिया केलेले पदार्थही जास्त दिवस टिकून राहावेत याकरिता त्यामध्ये मिठाचा वापर जास्त प्रमाणात केलेला असतो. त्यामुळे असे पदार्थ खाण्याऐवजी फळे, भाज्या खाण्याची सवय लावून घ्या. मिठाचे प्रमाण आहारात कमी केल्याने आहारातील खनिजांची कमतरताही पूर्ण होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.