येत्या दोन ते तीन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली जात आहे. नुकत्याच झालेल्या दिल्ली-एनसीआरमधील पावसाने ठिकठिकाणी रस्त्यांवर झाडे पडल्याने हजारो लोकांच्या कार आणि बाईकचे मोठे नुकसान झाले आहे. दर पावसाळ्यात वाहनांवर झाडे पडल्याने वाहनांचे नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत, तुमची कार किंवा बाइकचा असलेला विमा (इंश्योरन्स क्लेम) तुमचे नुकसान भरून काढते का? जाणून घ्या कार-बाईकवर झाड पडल्यास किंवा पावसामुळे नुकसान झाल्यास कसा करायचा इंश्योरन्स क्लेम…
जर वाहनाचा इंश्योरन्स असेल तरच
जर तुमचा मोटार वाहन विमा (कार/बाईक विमा) ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह मोटर इन्शुरन्स’ असेल, तर तुम्हाला सर्व प्रकारच्या नुकसान भरून काढण्यासाठी विमा दावा अर्थात इंश्योरन्स क्लेम मिळतो. या विम्यामध्ये वादळ, पाऊस, पूर, भूकंप, भूस्खलन अशा नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीसाठीही विमा संरक्षण देण्यात येते. त्यामुळे आता येणाऱ्या पावसात तुमच्या वाहनावर झाड पडले असेल किंवा कार/बाईक पाण्यात वाहून गेली असेल तर तुमच्या वाहनाची नुकसान भरपाई तुम्हाला या विम्याद्वारे मिळू शकते.
(हेही वाचा – मुंबईकरांनो! आता तुमच्या खिशाला लागणार कात्री, कारण…)
याशिवाय कॉम्प्रिहेन्सिव्ह मोटर इन्शुरन्स तुमच्याकडे असेल तर तुमचे वाहन चोरीला गेल्यास त्याची भरपाई देखील तुम्हाला मिळू शकते. तसेच, जर तुमच्या चुकीमुळे वाहनाचे नुकसान झाले तरी देखील ही पॉलिसी तुम्हाला नुकसान भरपाई देते. म्हणजेच, या विम्यामध्ये नैसर्गिक आपत्ती जसे की वाहन चोरी, आगीमुळे झालेले नुकसान, पुराचे पाणी, भूकंप, भूस्खलन, वादळ आदींमुळे झालेल्या नुकसानीचे संरक्षण मिळते.
असा करा तुमच्या वाहनाचा इंश्योरन्स क्लेम?
अशा परिस्थितीत तुमच्या वाहनाचे नुकसान झाले तर विम्याचा दावा करण्यासाठी या खालील स्टेप्स फॉलो करा.
1. प्रथम तुमच्या विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर दाव्यासाठी (इंश्योरन्स क्लेम) नोंदणी करा. तुमचा पॉलिसी क्रमांक तुमच्याकडे ठेवा जेणेकरून टेलिकॉलरशी संवाद साधणे सोपे होईल.
2. तुम्ही तुमच्या कारची नोंदणी जवळपासच्या कोणत्याही मेकॅनिकच्या दुकानातून करू शकता. या संदर्भात, तुम्ही तुमच्या विमा कंपनीच्या कस्टमर केअरला अधिक माहिती विचारू शकता.
3. विमा दावा घेण्यासाठी फॉर्म भरा. सर्व कागदपत्रे एकत्र जमा करून क्लेम फॉर्म सबमिट करा. तुम्हाला विमा कंपनीच्या वेबसाइटवर क्लेम फॉर्म मिळेल.
4. तुमचा क्लेम लागू केल्यानंतर, विमा कंपनी तो सर्वेक्षकाकडे पाठवेल. कोविड-19 नंतर काही कंपन्या व्हिडीओ सर्वेक्षणाची सुविधाही देतात.
5. वाहनाची तपासणी पूर्ण झाल्यावर तुमचा इंश्योरन्स क्लेम येईल.