-
ऋजुता लुकतुके
हुडको ही सरकारी क्षेत्रातील शहरी गृहनिर्माण प्रकल्पांना वित्तपुरवठा करणारी कंपनी आहे. पण, अलीकडेच परस्परविरोधी बातम्यांमुळे शेअरच्या किमती वर आणि खाली हेलकावे खाताना दिसत आहेत. फेब्रुवारी २०२५ मध्ये अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शहरी आवास योजनांच्या निधीत कपातीचं धोरण जाहीर केलं. शेअरच्या पडझडीचं हे सगळ्यात मोठं कारण होतं. पण, त्यानंतर एप्रिल २०२५ मध्ये या कंपनीसाठी काही सकारात्मक बातम्याही आल्या आहेत. (Hudco Share Price)
एकतर, एमएमआरडीनं या कंपनीकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे आणि त्यासाठी सहकार्य करारही केला आहे. तर महिन्याच्या शेवटी अर्थमंत्रालयाच्या प्रत्यक्ष कर विभागाने कंपनीला झिरो कूपर बाँड्सच्या सहाय्याने ५००० कोटी रुपयांपर्यंतचे पैसे उभे करायला परवानगी दिली आहे. या दोन बातम्यांनंतर आता शेअर सावरताना दिसत आहे. पण, तरीही आता दिसणारी शेअरमधील तेजी ही कितपत टिकणारी आहे? मागच्या महिनाभरात शेअर ११ अंशांनी किंवा साडेपाच टक्क्यांनी वर आला आहे. तर महिनाभर तेजी अनुभवल्यानंतर या आठवड्यात त्यात थोडीफार घसरण दिसून आली. शुक्रवारी ०.७६ टक्क्यांच्या मामुली पडझडीनंतर शेअर २२१.७७ वर बंद झाला आहे. पण, शेअरची पुढील वाटचाल महत्त्वाची असणार आहे. (Hudco Share Price)
(हेही वाचा – Bata India Share Price : बाटा इंडियाच्या शेअरमध्ये सहा महिने घसरण का होतेय?)
प्रधानमंत्री आवास योजनेसाठीच्या सरकारी निधीत कपात केल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पादरम्यान केल्यावर हुडकोच्या शेअरमध्ये घसरण सुरू झाली. शेअर काही मिनिटांतच सोमवारी १० टक्क्यांच्या घसरणीसह १९२ रुपयांवर पोहोचला. सुरुवातीला शेअरला लोअर सर्किटही लागलं होतं. पंतप्रधान आवास निधीसाठी नवीन आर्थिक वर्षांत केंद्राकडून आता १९,७९४ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. पूर्वी हा निधी ३०,१७१ कोटी रुपये इतका होता. या तरतुदीत यंदा ३४ टक्क्यांची तफावत असल्यामुळे गुंतवणुकदारांना हे मानवलं नाही. (Hudco Share Price)
शेअर बाजार विश्लेषकांनीही हुडकोबद्गल किरकोळ गुंतवणूकदारांना सावधानतेचा इशारा दिला आहे. बांधकाम उद्योगातील शेअरना सध्या फारशी मागणी नाही. त्याचाही फटका या शेअरला बसणार आहे. वार्षिक उच्चांकानंतर ४२ टक्क्यांहून जास्त पडझड झालेला हा शेअर सध्या सावरण्याचा प्रयत्न करत आहे. अशावेळी घाई घाईने यात गुंतवणूक करू नये असा इशारा मोतीलाल ओस्वाल संशोधन संस्थेच्या शिवांगी सारडा यांनी म्हटलं आहे. या शेअरमध्ये विक्रीचा प्रभाव दिसत असल्यामुळे नवीन खरेदीसाठी थोडी वाट बघावी असा सल्ला त्यांनी दिला आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात हुडकोने ३५३ रुपयांचा वार्षिक उच्चांक नोंदवला होता. पण, त्यानंतर शेअरमध्ये पडधड दिसून आली आहे. (Hudco Share Price)
(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर शेअर बाजारात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी वा गुंतवणुकीवर सल्ला देत नाही. लेखातील मतं जाणकारांची वैयक्तिक मतं आहेत.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community