Horniman Circle Garden चं नाव भारतीय स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देणार्‍या एका इंग्रजावरुन ठेवलं?

47
Horniman Circle Garden चं नाव भारतीय स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देणार्‍या एका इंग्रजावरुन ठेवलं?

हॉर्निमन सर्कल गार्डन्स हे दक्षिण मुंबई इथलं १.०१ हेक्टर म्हणजेच २.५ एकर एवढ्या क्षेत्रफळाचं एक मोठं उद्यान आहे. हे उद्यान मुंबईच्या फोर्ट नावाच्या भागात आहे. या उद्यानाच्या भोवताली भारताच्या प्रमुख बँकांची मुख्य कार्यालये आहेत. १८ व्या शतकामध्ये उद्यानाचा हा परिसर बॉम्बे ग्रीन म्हणून ओळखला जात असे. त्यानंतर तो एल्फिन्स्टन सर्कल म्हणून ओळखला गेला. १९४७ साली भारताने स्वातंत्र्य मिळवल्यानंतर भारतीय स्वातंत्र्यासाठी समर्थन देणारे ‘द बॉम्बे क्रॉनिकल’ नावाच्या वृत्तपत्राचे संपादक बेंजामिन हॉर्निमन यांच्या सन्मानार्थ या उद्यानाला त्यांचं देण्यात आलं होतं. (Horniman Circle Garden)

(हेही वाचा – पाकिस्तानकडून येणाऱ्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे तयार ; Wing Commander Vyomika Singh यांचा इशारा)

हॉर्निमन सर्कलचा इतिहास

हॉर्निमन सर्कलच्या आधी या उद्यानाला बॉम्बे ग्रीन म्हणून ओळखलं जायचं. १८४२ साली या परिसरात फक्त नारळाच्या कवचांचा आणि कचऱ्याचा ढिगारा होता. पावसाळ्यात हा परिसर ते दलदलीचा व्हायचा आणि इतर वेळी कठीण खडकासारखा असायचा. (Horniman Circle Garden)

मुंबईतल्या रहिवाशांमध्ये बॉम्बे ग्रीन हा परिसर खूप लोकप्रिय होता. असं म्हटलं जायचं की, किल्ल्यांच्या भिंतींमधला कोणताही भाग बॉम्बे ग्रीनएवढा संरक्षित नव्हता. ११ एप्रिल १८५२ सालच्या अहवालातही याची पुष्टी केली आहे. या परिसरातल्या आसपासच्या रहिवाश्यांनी हॉर्निमन सर्कल इथे कोणतीही इमारत उभारण्यात येऊ नये यासाठी तत्कालीन लंडन इथल्या संचालक न्यायालयाकडे एक याचिका दाखल केली होती. या याचिकेची एक प्रत मुंबईतल्या प्रत्येक फर्मला पाठवण्यात आली होती. (Horniman Circle Garden)

(हेही वाचा – भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचे समर्थन करतो; Operation Sindoor नंतर इस्रायलही आक्रमक)

जेम्स डग्लस यांनी लिहिलेल्या ‘बॉम्बे अँड वेस्टर्न इंडिया’ या पुस्तकामध्ये १८९३ सालच्या एका रात्रीच्या दृश्याचं वर्णन केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की, हिरव्यागार पसरलेल्या या परिसरात दिवसभर काम करून थकलेले मजूर, हमाल असे कामगार इथे बसून निवांत गाणी गात असत. स्थानिक लोक या मोठ्या भूभागाला ‘चौक’ असं संबोधत असत. या चौकाच्या मध्यभागी तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड कॉर्नवॉलिसचा एक पुतळा होता. हा पुतळा १८२२ साली मुंबईच्या रहिवाशांच्या प्रयत्नातून स्थापित करण्यात आला होता. या पुतळ्याच्या उजवीकडे आणि डावीकडे ज्ञान आणि सचोटीचे पुतळे होते. हे पुतळे १४ ऑक्टोबर १८२४ साली बसवले गेले होते. (Horniman Circle Garden)

१८३७ साली आलेल्या चक्रीवादळामुळे बॉम्बे ग्रीनच्या परिसरात कंबरेपर्यंत पाणी साचलं होतं. तत्कालीन पोलिस आयुक्त चार्ल्स फोर्जेट यांनी बॉम्बे ग्रीनला इमारतींनी वेढलेल्या एका सर्कलमध्ये रूपांतरित करण्याचा विचार केला. त्यांच्या या विचाराला तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन आणि सर बार्टल फ्रेर यांनीही पाठिंबा दिला. पुढे १८६९ साली उद्यान तयार करण्याची योजना आखण्यात आली आणि १८७२ साली सुव्यवस्थित पायवाटा आणि सभोवताली झाडे लावून उद्यान तयार करण्यात आलं. आधी उद्यानाच्या मध्यभागी एक शोभिवंत कारंजे ठेवण्यात आलं होतं. पण नंतर त्याची जागा आधुनिक आर्ट डेको लोखंडी पाईप डिझाइनने घेतली. टाउन हॉल आणि चर्चगेट स्ट्रीटशी जुळवून घेतलेलं नवीन सर्कल आधीच्या बॉम्बे ग्रीनच्या उत्तरेस तयार करण्यात आलं. सध्या एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईची इमारत हॉर्निमन सर्कल गार्डन्स आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे पाहत उभी आहे. जवळच नरिमन स्ट्रीटवर सेंट थॉमस कॅथेड्रल आहे. हे १७१८ साली तयार करण्यात आलेलं मुंबईतलं पहिलं अँग्लिकन चर्च आहे. (Horniman Circle Garden)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.