Hormonal Imbalance : पीसीओएसमुळे वजन वाढलेय ? ‘हे’ व्यायाम केल्याने मिळतील फायदे

271
Hormonal Imbalance : पीसीओएसमुळे वजन वाढलाय ? 'हे' व्यायाम केल्याने मिळतील फायदे
Hormonal Imbalance : पीसीओएसमुळे वजन वाढलाय ? 'हे' व्यायाम केल्याने मिळतील फायदे

पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) हा महिलांना होणार एक आजार आहे, जो हार्मोन असंतुलित झाल्यामुळे होतो. (Hormonal Imbalance) त्यामुळे एकूणच आरोग्यावर परिणाम होतो. पीसीओएस हा आजार संपूर्णपणे नष्ट होत नाही; परंतु व्यायाम करणे, हा एक उत्तम उपाय आहे. व्यायाम केल्याने पीसीओएसचा त्रास बऱ्यापैकी कमी होऊ शकतो. पीसीओएस् असलेल्या महिलांना हार्मोन्सचे नियमन, वजन व्यवस्थापन आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यात मदत करण्यासाठी आम्ही हा लेख तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. (Hormonal Imbalance)

१. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी व्यायाम

वेगवान चालणे, जॉगिंग, सायकलिंग, पोहणे किंवा नृत्य हे व्यायाम केल्यावर कॅलरिज बर्न होतात.  हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि वजन नियंत्रित करण्यास देखील मदत होते. दर आठवड्याला किमान १५० मिनिटांचा एरोबिक व्यायाम करणे गरजेचे आहेत. (Hormonal Imbalance)

(हेही वाचा – Lionel Messi : लियोनेल मेस्सीला मानाचा बॅनल डोर पुरस्कार)

२. वेट लिफ्टिंग करणे

वेट लिफ्टिंग केल्याने, शरीरात जमा झालेली चरबी लगेच वितळू लागते. डंबेल्स आणि रेसिस्टन्स बेंडचा वापर करून तुम्ही घरच्या घरी वेट लिफ्टिंग करू शकता. लांजेस, सोक्टस, पुश-अप्स आणि प्लॅन्कचा व्यायाम दररोज केल्याने नवीन स्नायू तयार होतात. झोप छान लागते आणि पचनक्रिया सुधारते. (Hormonal Imbalance)

३. योग आणि व्यायाम

योगा, पायलेट्स किंवा स्ट्रेचिंग यांसारख्या व्यायामांमुळे शरीराची लवचिकता सुधारते, तणाव कमी होतो आणि विचार करणे सोपे होते. हे व्यायाम पीसीओएसशी संबंधित तणाव आणि हार्मोनल असंतुलन असल्यास ते संतुलित करण्यास मदत करू शकतात.

४. इंटरव्हल ट्रेनिंग

पीसीओएस असलेल्या महिलांसाठी हाय-इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग (HIIT) हे व्यायाम फायदेशीर ठरू शकते. प्रत्येकी ३० सेकंदांच्या व्यायामानंतर १ मिनिटांचा रेस्ट टाइम, अशा व्यायामाला हाय-इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग (HIIT) असे म्हणतात. हा व्यायाम केल्याने रक्तप्रवाह वाढतो आणि वजन लवकर कमी होते.

सर्व वैद्यकीय उपचार करून हे व्यायाम केल्यास लाभ होतो, असे तज्ञ सांगतात.  (Hormonal Imbalance)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.