
आयुर्वेदामध्ये आलं आणि मधाचं मिश्रण खाण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. आले आणि मधाचं मिश्रण खायला अगदी सोपं आहे.
आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे मध आणि आल्याचं मिश्रण हे सर्दी आणि खोकला यांसारख्या श्वसनाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी खूप पूर्वीपासून वापरलं जातं. मधासोबत आले खाल्ल्याने आल्याचे पुष्कळ फायदे शरीराला मिळतात. (Honey And Ginger Benefits)
मध आणि आले या दोन्हींचेही वेगवेगळे फायदे आहेत. जसं की, मधामध्ये अँटिऑक्सिडंट (Antioxidant) गुणधर्म असतात आणि आले हे अन्नपचनासाठी (Digestion) चांगलं असतं. त्यामुळे या दोघांचं मिश्रण खाल्ल्याने शरीराला अतिरिक्त फायदे मिळतात. ते फायदे कोणते ते पाहुयात…
(हेही वाचा – Iran-Israel conflict : अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने ; इराणकडून इस्राइल विरोधात युद्धाची घोषणा)
मध आणि आल्याच्या एकत्रित मिश्रणाने मिळणारे फायदे पुढीलप्रमाणे…
- खोकला आणि सर्दीसाठी नैसर्गिक घरगुती उपाय
- नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करते
- हृदयाचं आरोग्य सुधारतं
- शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते
- अन्नपचनास मदत मिळते
- मळमळ आणि उलट्या होण्यापासून रोखते
याव्यतिरिक्त आले आणि मधाच्या मिश्रणाचे असंख्य फायदे शरीराला मिळतात. विशेषतः श्वसनाच्या समस्या दूर करण्यासाठी या मिश्रणाचा उपयोग होतो. आल्याच्या आणि मधाच्या वेगवेगळ्या फायद्यांबद्दल जाणून घेतलं तर तुम्हांला त्यांच्या एकत्रित मिश्रणाने कसा फायदा मिळेल ते लक्षात येईल. (Honey And Ginger Benefits)
- मधामुळे श्वसनमार्गात अडथळा निर्माण करणारा श्लेष्मा पातळ होतो आणि श्वसनमार्ग मोकळा होतो. त्याचप्रमाणे आले हे श्वसनमार्गाची जळजळ कमी करण्यासाठी मदत करतं. म्हणूनच मध आणि आले हे दोन्ही एकत्र करून तयार केलेलं मिश्रण खोकला आणि सर्दीच्या लक्षणांवर प्रभावीपणे उपचार करतं.
- १ कप पाण्यामध्ये एक चमचा आले आणि मधाचं मिश्रण घालून ते उकळू द्या. हे पेय तयार करायला अगदी सोपं आहे. हे गरम पेय तुम्ही दिवसातून दोनदा घेतलं तर खोकला नक्कीच कमी होईल.
- आले आणि मध यांचं एकत्रित मिश्रण हे एक नैसर्गिक वेदनाशामक म्हणून ओळखलं जातं. याची चव थोडी उग्र वाटत असली तरी हे कफ पाडणारं प्रभावी औषध आहे. हे मिश्रण घेतल्याने खोकल्यामुळे छातीत होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होते.
हे मिश्रण सहसा सर्दीवर उपचार म्हणून वापरलं जातं, म्हणून खूप प्रसिद्ध आहे. पण सर्दी झाल्यानंतर सहसा घसा खवखवतो. त्यावेळी हे मिश्रण कामी येतं. या मिश्रणामुळे तुमचं सायनस उघडतं आणि श्वसनमार्गातून श्लेष्मा बाहेर पडण्यास मदत होते.
(हेही वाचा – ज्वालामुखी उद्रेकामुळे दिल्लीहून बालीला जाणारे Air India चे विमान परतले !)
- आले आणि मध यांचं मिश्रण हे हृदयाच्या आरोग्यासाठीही चांगलं आहे. रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखण्यासाठी आणि शरीरातलं कोलेस्टेरॉल (Cholesterol) कमी करण्यासाठी देखील आले आणि मध यांचं मिश्रण खूप उपयुक्त आहे. या मिश्रणामुळे रक्तवाहिन्या मोकळ्या होऊन शरीरातला रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहतो. त्यामुळे हृदयरोगाला (Heart Disease) प्रतिबंध निर्माण होतो.
- याव्यतिरिक्त मध, आले आणि लिंबू हे तीनही घटक आजाराशी लढण्यासाठी परिपूर्ण आहेत. हे घटक तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी देखील मदत करतात. दररोज एक कप आले, लिंबू आणि मध यांचा चहा प्यायल्याने किंवा फक्त एक चमचा मध आणि आले यांचं चाटण घेतल्याने तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
आल्याच्या अन्नपचन करण्याच्या गुणधर्मांमुळे मध आणि आल्याचे टॉनिक किंवा सिरप हेही पचनासाठी चांगले सहाय्यक आहे असं मानलं जातं. म्हणूनच कमकुवत पचनसंस्था असलेल्या लोकांसाठी या मिश्रणाचं एक चमचा सेवनही खूप उपयुक्त आहे. (Honey And Ginger Benefits)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community