घरातील शुभकार्यात आपले भक्कम स्थान निर्माण केलेली जिलेबी म्हणजेच प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ! महाराष्ट्रातील लग्नसमारंभात असणारी, गुजरातमध्ये पोहे आणि फापडा सोबत खाल्ली जाणारी आणि मध्यप्रदेशात रबडी सोबत खाल्ल्या जाणाऱ्या जिलेबीने खाद्यप्रेमींच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का जिलेबी हा पदार्थ मूळचा भारतीय नसून या वेड्यावाकड्या जिलेबीच्या जन्माची कथा तेवढीच रुचकर आहे.
जिलेबी हा पश्चिम आशियाई देशांतून आलेला पदार्थ आहे. नादिर शहा या इराणमधील राजाला जिलेबी प्रचंड आवडायची. त्याने भारतात जिलेबी आणली असे सांगितले जाते. तर, १३ व्या शतकात तुर्की मोहम्मद याने लिहिलेल्या पुस्तकात सुद्धा जिलेबी कशी तयार झाली याबाबत उल्लेख आढळतो.
१६०० मध्ये लिहिल्या गेलेल्या संस्कृत ग्रंथ गुण्यगुणाबोधिनी ग्रंथातही जिलेबीचा उल्लेख आढळतो. औद्योगिक क्रांतीला सुरूवात झाल्यावर दोन देशांमध्ये व्यापार सुरू झाला तेव्हा तुर्क देशातील लोकांनी ही जिलेबी भारतात आणली आणि आता कायमस्वरुपी ही जिलेबी भारताचीच झाली आहे. १६व्या शतकात रघुनाथ लिहिलेल्या भोजना कुतुहळा या पुस्तकामध्येही जिलेबीचा उल्लेख आढळतो.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जिलेबी ताकाचा मठ्ठा करून खाल्ली जाते. भारतातील प्रत्येक भागात जिलेबी विविध प्रकारे बनवली जाते.