Hind Copper Share Price : या सरकारी कंपनीसाठी आयात शुल्क वाढीची भीती सरली आहे का?

Hind Copper Share Price : हिंद कॉपरचा शेअर महिनाभरात साडेतीन टक्क्यांनी वाढला.

18
Hind Copper Share Price : या सरकारी कंपनीसाठी आयात शुल्क वाढीची भीती सरली आहे का?
  • ऋजुता लुकतुके

हिंद कॉपर ही सरकारी कंपनी तांबं खाणीतून बाहेर काढेपासून ते बाजारात ते विकण्याच्या रुपात आणण्यापर्यंतची प्रक्रिया अशी सगळी कामं करते. इतर धातू उत्पादक कंपन्यांप्रमाणेच या कंपनीलाही ट्रम्प प्रशासनाच्या आयात शुल्क वाढीचा फटका जानेवारी महिन्यात बसला. अगदी सप्टेंबर २०२४ पासून हा शेअर विविध कारणांनी घसरणीच्या फेऱ्यात अडकलेला होता. १८३ रुपयांचा नीच्चांक नोंदवल्यानंतर तो आता थोडाफार सावरताना दिसत आहे. वस्तूंचे भाव वाढत असल्याचं आणखी एक कारण त्याला आहे. जानेवारी २०२५ पासून धातूंचे दर हे असेच वाढत आहेत. धातू उत्पादक कंपन्यांना मात्र त्याचा फायदा मिळत आहे. (Hind Copper Share Price)

हिंद कॉपर कंपनी आपला भूतकाळ मागे टाकून नवीन तेजीसाठी सज्ज झाल्याचं संशोधन संस्थांचं म्हणणं आहे. तांबे उत्पादक या सरकारी कंपनीने गेल्या दोन वर्षांमध्ये कंपनीने १४० टक्के परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतला तर हा शेअर तब्बल १,०३५ टक्क्यांनी वाढला आहे. आताही हा शेअर पुन्हा एकदा चर्चेत आहे तो धातूच्या वाढलेल्या किमतीमुळेच. त्याचा या शेअरवर काय परिणाम होईल अशी उत्सुकता गुंतवणूकदारांना आहे. या आठवड्यात या शेअरमध्ये पाच दिवसांत ३ टक्क्यांची घसरण झाली आहे. पण, शुक्रवारी बाजार बंद होताना हा शेअर ०.७८ टक्क्यांच्या वाढीसह २०६ अंशांवर बंद झाला. (Hind Copper Share Price)

(हेही वाचा – Olectra Greentech Share Price : ओलेक्ट्रा ग्रीनटेक शेअरवर तज्ञांनी काय दिला सल्ला?)

New Project 2025 05 10T213309.677

ट्रम्प प्रशासनाकडून आयात शुल्कवाढी होण्याची शक्यता लक्षात घेऊन धातू व्यापाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यात आधीच तांब्याच्या किमती वाढवल्या आहेत. तो सिलसिला कायम राहिल्यामुळे धातूंच्या किमतींबरोबरच शेअरही चढत आहेत. न्यूयॉर्कच्या कॉमेक्स एक्सचेंजमध्ये तांब्याचा दर यावर्षीच्या उच्चांकावर आहे. तर तांब्याचा सगळ्यात मोठा उत्पादक देश चिलीने अलीकडे देशातून तांब्याची निर्यात काही काळासाठी थांबवली होती. त्यामुळे पुरवठा कमी होऊनही किंमती वाढत होत्या. (Hind Copper Share Price)

ट्रम्प प्रशासनाने तांब्यावरील आयात शुल्क २५ टक्क्यांनी वाढवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांतही या किमती वाढू शकतात. त्यामुळे हा शेअर अजूनही चलतीत असेल असाच जाणकारांचा होरा आहे. आनंद राठी, केईशी इंटरनॅशनल अशा संशोधन संस्थांनी हिंदुस्तान कॉपर लिमिटेड कंपनीचं लक्ष्य वाढवून गुंतवणुकदारांना खरेदीचा सल्ला दिला आहे. आनंद राठी यांनी लक्ष ४२० रुपये केलं आहे. (Hind Copper Share Price)

(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. गुंतवणूकदारांनी स्वत:च्या जोखमीवर गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी अथवा विक्रीचा कुठलाही सल्ला देत नाही.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.