Health Tips : अशी घ्या डोळ्यांची काळजी 

सध्या स्क्रीन टाईममध्ये वाढ झाल्यामुळे डोळ्यांच्या दृष्टीवर खोलवर परिणाम झाला आहे. अंधुक दिसल्या कारणाने जर तुम्हाला चष्मा लागला असेल, तर यासाठी काही योगासने करणे आवश्यक आहे.

115
Health Tips : अशी घ्या डोळ्यांची काळजी 
Health Tips : अशी घ्या डोळ्यांची काळजी 

डोळे हा अत्यंत महत्त्वाचे आहेत. (Health Tips) डोळे नाजूक असले, तरी त्यांची योग्य काळजी घेतली नाही, तर गुंतागुंत होऊ शकते. दिवसभर लॅपटॉप किंवा मोबाईल वापरल्याने डोळ्यात दुखणे, पाणी येणे, लाल होणे किंवा अंधुक दिसणे होऊ शकते. त्यामुळे दृष्टी चांगली होणे फार आवश्यक आहे. सध्या स्क्रीन टाईममध्ये वाढ झाल्यामुळे डोळ्यांच्या दृष्टीवर खोलवर परिणाम झाला आहे. अंधुक दिसल्या कारणाने जर तुम्हाला चष्मा लागला असेल, तर यासाठी काही योगासने करणे आवश्यक आहे. (Health Tips)

(हेही वाचा – Israel-Palestine Conflict : सौदी अरेबियाने इस्रायलसोबतची चर्चा थांबवली; युद्धाचा परिणाम )

१. हलासनाचा सराव डोळ्यांच्या दृष्टीसाठी फायदेशीर आहे. या योगामुळे वजनही नियंत्रित राहते. शरीराला शक्ती मिळते. हलासनाचा सराव करण्यासाठी आधी पाठीवर झोपावे. श्वास घेताना, पाय वरच्या दिशेने उचलून डोक्याच्या मागे घ्या. अंगठ्याने जमिनीला स्पर्श करून हात जमिनीवर सरळ ठेवा आणि कंबर जमिनीला घट्ट ठेवा. काही वेळ या स्थितीत रहा आणि नंतर श्वास सोडा आणि सामान्य स्थितीत या. (Health Tips)

२. चक्रासन या योगामुळे कंबर मजबूत होते. दृष्टी सुधारते आणि वजन नियंत्रणात राहते. पचनाच्या विकारांपासून आराम मिळवण्यासाठी चक्रासनचा सरावही फायदेशीर आहे. चक्रासनासाठी, जमिनीवर पाठीवर झोपा, गुडघे वाकवा आणि टाच शक्य तितक्या नितंबाजवळ आणा. आपले हात कानाकडे वाढवा आणि आपले तळवे जमिनीवर ठेवा. पाय तसेच तळवे वापरून शरीराला वर उचला. खांद्याला समांतर पाय उघडताना वजन समान प्रमाणात वितरीत करून शरीराला वर खेचा. 30 सेकंद या आसनात राहा.

३. उष्ट्रासन हे आसन उंटाच्या मुद्रेत बसून केले जाते. योगतज्ञाच्या देखरेखीखाली उस्त्रासन करा. याचा सराव केल्याने पाठदुखीपासून आराम मिळतो. शरीराची लवचिकता सुधारते, थकवा दूर करते आणि दृष्टी सुधारते. यासाठी सर्वात आधी गुडघ्यावर बसा आणि श्वास घेताना मणक्याचा खालचा भाग पुढे दाबा. या दरम्यान, नाभीवर पूर्ण दाब जाणवला पाहिजे. पाठीमागे वाकताना पाठ वाकवा आणि मान सैल सोडा. 30 ते 60 सेकंद या स्थितीत रहा. (Health Tips)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.