गाजर आणि बीटरूट या भाज्या सॅलड आणि ज्यूससाठी खूप उपयुक्त आहेत. (Beetroot-Carrot Juice) यामध्ये जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजे (Minerals) भरपूर प्रमाणात असतात. याव्यतिरिक्त ते वजन कमी करण्यास मदत करतात आणि आवश्यक पोषक आणि ऊर्जा प्रदान करतात.
(हेही वाचा – Bhaucha Dhakka : मुंबईतील भाऊचा धक्का येथे ६ जण बेशुद्ध पडले; त्यातील दोघांचा मृत्यू)
निरोगी रहाण्यासाठी गाजर आणि बीटरूटचा रस (Beetroot-Carrot Juice) हे पिणे उत्तम आहे. ते जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरने समृद्ध असतात. दररोज गाजर आणि बीटचा रस घेतल्याने आपल्या शरीराला फायबर मिळते. गाजर आणि बीटच्या रसाचे (Beetroot-Carrot Juice) शरीरासाठी काय काय फायदे होतात, ते आपण पाहू.
- गाजर आणि बीटरूटचा रस दररोज प्यायल्याने कालांतराने सहनशक्ती (Endurance) आणि कार्यक्षमता (Efficiency) सुधारण्यास मदत होते.
- गाजर आणि बीटाच्या रसामध्ये असलेले फायबर तुमचे पचन सुधारण्यास मदत करते. ते शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्यास देखील मदत करतात.
- गाजर आणि बीटरूट बीटा कॅरोटीनने समृद्ध असतात. जे अ जीवनसत्वाने (Vitamins) समृद्ध आहे. जे दृष्टी सुधारण्यास मदत करते. (Beetroot-Carrot Juice)