happy vinayaka chaturthi : गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश आता मराठीमध्ये!

34
happy vinayaka chaturthi : गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश आता मराठीमध्ये!

गणेश चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणूनही ओळखलं जातं. या दिवशी गणेश जयंती साजरी केली जाते. गणेश चतुर्थीला घरात आणि अनेक ठिकाणी सार्वजनिक मंडळांमध्ये गणपतीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करून त्यांची पूजा केली जाते. देशभरात गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सवात गणपतीच्या आरत्या, प्रार्थना आणि व्रत-वैकल्य केले जातात. गणपतीची आरती केल्यानंतर प्रसाद म्हणून मोदक, मिठाई किंवा फळं वाटण्यात येतात. (happy vinayaka chaturthi)

(हेही वाचा – Operation Sindoor : एअरस्ट्राइकला ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव का दिले ?)

हा उत्सव दहा दिवस सुरू राहतो. शेवटच्या म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी मिरवणूक काढून गणपतीच्या मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याची परंपरा आहे. मुंबईत दरवर्षी साधारणपणे १,५०,००० मूर्तींचं विसर्जन केलं जातं. १८९३ साली महाराष्ट्रात स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. हिंदूंनी एकत्र येऊन परकियांच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे असा त्यामागचा हेतू होता. गणेशोत्सवादारम्यान सार्वजनिक ठिकाणी ग्रंथांचं वाचन, मेजवानी, क्रीडा आणि मार्शल आर्ट्स स्पर्धा आयोजित केल्या जातात. (happy vinayaka chaturthi)

(हेही वाचा – पाकमध्ये ‘डर का माहौल’ ! Operation Sindoor नंतर माजी लष्करप्रमुखांचे सूचक विधान)

गणेश चतुर्थीचा उत्सव हा संपूर्ण भारतीय उपखंडात विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि गोवा तसेच नेपाळसारख्या राज्यांमध्ये साजरा केला जातो. त्याबरोबरच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका, त्रिनिदाद आणि टोबॅगो, गयाना, सुरीनाम, कॅरिबियनचे इतर भाग, फिजी, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका, युनायटेड स्टेट्स आणि युरोप यासारख्या इतर देशांमध्येही गणेश चतुर्थी साजरी केली जाते. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार गणेश चतुर्थी ही दरवर्षी २२ ऑगस्ट ते २० सप्टेंबर दरम्यान येते. (happy vinayaka chaturthi)

(हेही वाचा – Operation Sindoor : पहलगाम हिंदू नरसंहाराचे राष्ट्राने घातले श्राद्ध; रणजित सावरकर यांची भावना)

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा : 
  • गणपती बाप्पा मोरया! या गणेश चतुर्थीला तुमच्या घरात आनंदाची व भरभराटीची लाट येवो हीच इच्छा..
  • तुम्हां सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा..!!
  • गणेश चतुर्थीच्या या दिवशी गणपती बाप्पा तुमच्या सर्व स्वप्नांना साकार करो आणि तुमचं आयुष्य आनंदाने भरो…
  • गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य सुख, समाधान, आणि यशाने भरुन जाऊ दे…
    गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
  • गणराजाच्या स्वागतासाठी सगळे जण व्हा तयार… तुमच्या घरात आनंद, प्रेम आणि शांती नांदो, चला गणेश चतुर्थीचा सण साजरा करू ना यार..
  • गणेश चतुर्थीच्या या पवित्र दिवशी बाप्पांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.
  • गणेशाची कृपा तुम्हाला सतत लाभो आणि तुमचे सर्व संकटे दूर होवोत. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • या गणेश चतुर्थीला गणपती बाप्पा तुम्हाला सुख-समृद्धी आणि भरभराट देवो हीच इच्छा…
    गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा..!!
  • गणेश चतुर्थीच्या पवित्र दिवशी, गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवातीचे संकेत देवो. तुमची सगळी संकटं दूर होवोत आणि तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदो!
  • या गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या मनातल्या सर्व सदिच्छा पूर्ण होवोत. तुमच्या जीवनात आनंद आणि शांतीचे वसंत पसरू देवो.
  • गणेश चतुर्थीच्या या मंगलमय प्रसंगी, तुमचं आयुष्य बाप्पाच्या कृपेने सुंदर विचारांनी आणि यशाने भरून जाओ हीच इच्छा..
    गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा..
  • गणपती बाप्पाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो…
    गणेश चतुर्थीच्या या पवित्र दिवशी तुमचं आयुष्य आनंदाने भरून जावो…
  • गणपती बाप्पा मोरया! सुख, समृद्धी आणि यश तुमच्या जीवनात कायम असो…
    या गणेशोत्सवात प्रेम, आनंद आणि शांती तुमच्या घरी वसो…
    गणेश चतुर्थीच्या खुप खूप शुभेच्छा!
  • गणेश चतुर्थीच्या या पवित्र उत्सवात विघ्नहर्ता तुमच्या आयुष्यातली सगळी विघ्न दूर करो आणि तुम्हाला यश, सुख आणि समृद्धी प्रदान मिळो… (happy vinayaka chaturthi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.