घरी बनवलेले रसभरीत सुगंधी गुलाबजाम खाण्यात जी मजा येते त्याचं वर्णन करणं अशक्य आहे. बाहेरच्या दुकानांत मिळणारे गुलाबजाम तुम्ही बऱ्याचदा खाल्ले असतील, पण त्यांना घरच्या रेसिपीची सर येत नाही.
आज आम्ही तुमच्यासाठी गुलाबजामची फक्कड रेसिपी घेऊन आलो आहोत. गुलाबजाम तयार करणं कठीण वाटत असलं तरी प्रत्यक्षात ते अगदी सोपं आहे. चला तर मग पाहुयात… (gulab jamun recipe in marathi)
(हेही वाचा – “…तर आम्ही त्यांना जिथे असतील तिथेच ठोकणार”; परराष्ट्रमंत्री S Jaishankar यांचा स्पष्ट इशारा)
साहित्य
- १/२ कप मिल्क पावडर
- १/२ कप दूध
- १ टेबलस्पून तूप
- १/४ कप मैदा
- चिमूटभर खाण्याचा सोडा
- ३ ते ४ टेबलस्पून कोमट दूध (पीठ मळण्यासाठी)
- २ कप साखर (पाक तयार करण्यासाठी)
- १/२ टेबलस्पून लिंबाचा रस
- ३ ते ४ वेलच्या
- १ टेबलस्पून गुलाब पाणी
- २ ग्लास पाणी (gulab jamun recipe in marathi)
(हेही वाचा – Covid JN.1 Varient : भारतात नव्या व्हेरिएंटचे २५७ रुग्ण; काय आहे देश-विदेशातील सद्यस्थिती जाणून घ्या)
कृती
सर्वात आधी मिल्क पावडर पासून मावा तयार करून घ्या. त्यासाठी एका पॅन मध्ये एक टेबलस्पून तूप घाला. नंतर त्यात अर्धा कप दूध घाला. दूध आणि तूप चांगलं एकजीव झालं की त्यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घालून व्यवस्थित ढवळून घ्या. मंद आचेवर चमच्याने सतत ढवळत राहा. या मिश्रणचा थोडा घट्ट असा मावा तयार करून घ्या आणि तो थंड करण्यासाठी बाजूला ठेऊन द्या.
आता गुलाबजामसाठी लागणारा पाक तयार करा. त्यासाठी एका भांड्यात दोन ग्लास पाणी घेऊन गॅसवर उकळत ठेवा. त्यानंतर त्यात दोन कप साखर घाला. साखर पाण्यात विरघळली कि, त्यामध्ये वेलची पूड आणि गुलाब पाणी घाला. एक तारेचा पाक होईपर्यत उकळवून घ्या. पाक तयार झाल्यावर थंड होण्यासाठी बाजूला ठेऊन द्या.
आता थंड झालेल्या माव्यामध्ये पाव कप मैदा आणि चिमूटभर खाण्याचा सोडा घाला. त्यात कोमट दूध घालून या मिश्रणाचं मऊसर पीठ मळून घ्या. मग त्याचे छोटे छोटे गोळे तयार करा.
आता हे गोळे तळण्यासाठी एका कढईमध्ये तेल थोडंस गरम करून घ्या. ते गोळे मंद आचेवर सगळ्या बाजूंनी लालसर आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
हे तळून तयार झालेले गुलाबजाम कोमट झालेल्या पाकामध्ये सोडा. ते गुलाबजाम पाकामध्ये दोन ते तीन तास मुरवत ठेवा.
थोड्या थोड्या वेळाने गुलाबजाममध्ये चमचा फिरवून घ्या. जेणेकरून गुलाबजाममध्ये पाक छान मुरला जाईल.
चविष्ट गुलाबजाम खाण्यासाठी सर्व्ह करा आणि आनंद घ्या! (gulab jamun recipe in marathi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community