
-
ऋजुता लुकतुके
गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स ही कंपनी मागच्या वर्षभरात गुंतवणुकदारांना जोरदार परतावा देत आहे. कोलकातात्यातील ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजतेय ती तिला मिळालेल्या मोठमोठ्या ऑर्डरमुळे. त्याच्या जोरावर शेअर बाजारातही कंपनी चांगली कामगिरी करत आहे. जर्मनीतील रेहडर शिफमाखर आणि रिडेराय कोकेजी या कंपन्यांशी जीआरएसईने जहाज बांधणीसाठी मोठ्या आकाराचे सामंजस्य करार केले आहेत. (GRSE Share Price)
त्या जोरावर जीआरएसई कंपनीचे शेअर महिनाभरात तब्बल ७८ टक्क्यांनी म्हणजे १,४३४ रुपयांनी वर चढले आहेत. तर या आठवड्यातही पहिल्या तीन दिवसांत शेअरमध्ये ३२ टक्क्यांची वाढ झाली. त्यानंतर शुक्रवारच्या दिवशी शेअर १३८ अंशांनी घसरून ३,२६७ रुपयांवर बंद झाला आहे. आता महिनाभर शेअरमध्ये एवढी वाढ झालेली असताना पुढे या शेअरची दिशा समजून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. (GRSE Share Price)
(हेही वाचा – RVNL Share Price : रेल्वे विकास निगम शेअरमध्ये सध्या वाढ का होतेय?)
शेअर सध्या जास्त किमतीला विकला जातोय हे उधड आहे. त्यामुळे शेअरमध्ये सध्या अवास्तव खरेदी झाली आहे. नजिकच्या काळात त्याचा थोडाफार फटका या शेअरला बसू शकतो. पण, संशोधन संस्थांच्या मते ३,२०० रुपयांवर या शेअरला सपोर्टही मिळणार आहे. (GRSE Share Price)
एंजल वनचे टेक्निकल व डेरिव्हेटिव्ज विभागाचे प्रमुख ओशो कृष्णन यांनी नेमकं याच गोष्टीवर बोट ठेवलं आहे. मागच्या महिनाभरात शेअरमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. ‘सध्या तरी शेअर मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी काळजी नक्कीच घेतली पाहिजे. स्टॉपलॉस लावूनच ट्रेडिंग करणं महत्त्वाचं असेल. त्यामुळे नफा सुरक्षित राहील आणि तोटाही होणार नाही,’ असं कृष्णन यांनी म्हटलं आहे. तर आनंद राठी संस्थेतील तज्ञ जिगर पटेल यांनी या शेअरची रेंज ३,२०० ते ३,५०० रुपयांची असेल असं म्हटलं आहे. म्हणजे ३,२०० रुपये ही सध्याची खालची पातळी असेल. तर ३,५०० रुपयांवर शेअरला थोडा ब्रेक लागेल असंही त्याचं म्हणणं आहे. (GRSE Share Price)
(टिप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. आणि गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर यात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट गुंतवणूकदारांना शेअरमधील खरेदी अथवा विक्रीचा कुठलाही सल्ला देत नाही.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community