Google Store India : भारतात गुगल पिक्सेल फोन आता मिळणार थेट गुगल स्टोअरमध्ये

Google Store India : गुगल कंपनीने पहिल्यांदाच थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. 

42
Google Store India : भारतात गुगल पिक्सेल फोन आता मिळणार थेट गुगल स्टोअरमध्ये
  • ऋजुता लुकतुके

गुगल कंपनीचा पिक्सेल स्मार्टफोन आता चांगला नावारुपाला आला आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी आपला हा फ्लॅगशिप फोन कंपनीकडून थेट ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी गुगल स्टोअर हे ऑनलाईन विक्री केंद्र सुरू केलं आहे. भारतात गुगल स्टोअरची स्थापना २९ मे रोजी झाली आहे. आतापर्यंत गुगलची इतर उत्पादनं आणि सेवा अशा पद्धतीने थेट गुगलकडून मिळत होती. पण, आता त्याल पिक्सेलचाही समावेश झाला आहे. पिक्सेल फोनची लोकप्रियता आणि उपलब्धता वाढण्यात यामुळे फायदा होईल, असं कंपनीला वाटतं. (Google Store India)

थेट गुगल स्टोअरमधून पिक्सेल फोन खरेदी करण्याचे फायदेही असतील. तुम्हाला फोनचे पैसे भरण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असतील. खास सवलतीही मिळतील. युपीआय, क्रेडिट आणि डेबिट कार्डाचा पर्याय तर ग्राहकांना मिळेलच. शिवाय तुम्हाला हा फोन हफ्त्यांमध्ये म्हणजे ईएमआयवर देखील मिळवता येईल. फोन खरेदीवर सवलती तसंच एक्सचेंज ऑफर आणि क्रेडिट गुणही मिळवता येतील. (Google Store India)

(हेही वाचा – Vedanta Hospital : वेदांता रुग्णालयाची सुरुवात कशी झाली ठाऊक आहे?)

गुगल कंपनीने नो कॉस्ट ईएमआयसाठी १५ बँकांशी भागिदारी करार केला आहे. या बँकांच्या क्रेडिट कार्डावर तुम्हाला ‘नो कॉस्ट ईएमआय,’ तत्त्वावर हा फोन मिळू शकेल. त्याचबरोबर कंपनी कॅशबॅक ऑफरही आणणार आहे. आता ज्यांच्याकडे पिक्सेल फोन आहे, त्यांच्यासाठी गुगल स्टोअरने एक्सचेंज ऑफर आणल्या आहेत. किंवा तुम्हाला तुमचा फोन अपग्रेड करूनही मिळू शकेल. गुगल कंपनीने अलीकडे भारतात मोठी गुंतवणूक केली आहे. पिक्सेल फोन भारतात बनवण्याबरोबरच गुगल पिक्सेलची सेवाकेंद्रही भारतात उभी राहिली आहेत. नवी दिल्ली, बंगळुरू आणि मुंबई इथं कंपनीची तीन मुख्य सेवा केंद्र आहेत. (Google Store India)

गुगल पिक्सेल फोन सध्या देशातील २,००० रिटेल दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. पण, आता ऑनलाईन गुगल स्टोअरमुळे फोन लगेच ग्राहकांना उपलब्ध होऊ शकेल. आणि दुरुस्ती तसंच देखभालीची चांगली सेवाही मिळू शकेल. कंपनीने अलीकडेच भारतात पिक्सेल ९ मालिका लाँच केली आहे. आणि त्या मागोमाग गुगल ऑनलाईन स्टोअर सुरू झाल्यामुळे ग्राहकांना अद्ययावत सेवा मिळणार आहे. पिक्सेल फोनचा भारतात प्रसार त्यामुळे शक्य होईल. (Google Store India)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.